పవిత్ర ఖురాన్ యొక్క భావార్థాల అనువాదం - మరాఠి అనువాదం - ముహమ్మద్ షఫీ అన్సారీ

పేజీ నెంబరు:close

external-link copy
10 : 5

وَالَّذِیْنَ كَفَرُوْا وَكَذَّبُوْا بِاٰیٰتِنَاۤ اُولٰٓىِٕكَ اَصْحٰبُ الْجَحِیْمِ ۟

१०. आणि ज्यांनी ईमान राखले नाही आणि आमच्या आदेशांना खोटे ठरविले तेच जहन्नमी आहेत. info
التفاسير:

external-link copy
11 : 5

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوا اذْكُرُوْا نِعْمَتَ اللّٰهِ عَلَیْكُمْ اِذْ هَمَّ قَوْمٌ اَنْ یَّبْسُطُوْۤا اِلَیْكُمْ اَیْدِیَهُمْ فَكَفَّ اَیْدِیَهُمْ عَنْكُمْ ۚ— وَاتَّقُوا اللّٰهَ ؕ— وَعَلَی اللّٰهِ فَلْیَتَوَكَّلِ الْمُؤْمِنُوْنَ ۟۠

११. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहने तुमच्यावर जे उपकार केले आहेत, त्यांचे स्मरण करा, जेव्हा एका जनसमूहाने तुमच्यावर अत्याचार करू इच्छिले, तेव्हा अल्लाहने त्यांच्या हातांना तुमच्यापर्यंत पोहचण्यापासून रोखले, आणि अल्लाहचे भय बाळगून राहा आणि ईमान राखणाऱ्यांनी तर सर्वश्रेष्ठ अल्लाहवरच भरोसा ठेवला पाहिजे. info
التفاسير:

external-link copy
12 : 5

وَلَقَدْ اَخَذَ اللّٰهُ مِیْثَاقَ بَنِیْۤ اِسْرَآءِیْلَ ۚ— وَبَعَثْنَا مِنْهُمُ اثْنَیْ عَشَرَ نَقِیْبًا ؕ— وَقَالَ اللّٰهُ اِنِّیْ مَعَكُمْ ؕ— لَىِٕنْ اَقَمْتُمُ الصَّلٰوةَ وَاٰتَیْتُمُ الزَّكٰوةَ وَاٰمَنْتُمْ بِرُسُلِیْ وَعَزَّرْتُمُوْهُمْ وَاَقْرَضْتُمُ اللّٰهَ قَرْضًا حَسَنًا لَّاُكَفِّرَنَّ عَنْكُمْ سَیِّاٰتِكُمْ وَلَاُدْخِلَنَّكُمْ جَنّٰتٍ تَجْرِیْ مِنْ تَحْتِهَا الْاَنْهٰرُ ۚ— فَمَنْ كَفَرَ بَعْدَ ذٰلِكَ مِنْكُمْ فَقَدْ ضَلَّ سَوَآءَ السَّبِیْلِ ۟

१२. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहने इस्राईलच्या पुत्रांकडून वचन-करार घेतला आणि त्यांच्यातूनच बारा सरदार आम्ही नियुक्त केले, आणि अल्लाहने फर्माविले, मी निश्चितच तुमच्यासोबत आहे, जर तुम्ही नमाज कायम राखाल आणि जकात देत राहाल आणि माझ्या पैगंबरांना मानत राहाल आणि त्यांची मदत करीत राहाल आणि अल्लाहला उत्तम कर्ज देत राहाल तर निःसंशय मी तुमचे अपराध माफ करीन आणि तुम्हाला अशा जन्नतींमध्ये दाखल करीन, ज्यांच्या खाली नहरी (प्रवाह) वाहत आहे. आता या वायद्यानंतरही तुमच्यापैकी जो इन्कार करील तर निःसंशय तो सरळ मार्गापासून दूर भटकला. info
التفاسير:

external-link copy
13 : 5

فَبِمَا نَقْضِهِمْ مِّیْثَاقَهُمْ لَعَنّٰهُمْ وَجَعَلْنَا قُلُوْبَهُمْ قٰسِیَةً ۚ— یُحَرِّفُوْنَ الْكَلِمَ عَنْ مَّوَاضِعِهٖ ۙ— وَنَسُوْا حَظًّا مِّمَّا ذُكِّرُوْا بِهٖ ۚ— وَلَا تَزَالُ تَطَّلِعُ عَلٰی خَآىِٕنَةٍ مِّنْهُمْ اِلَّا قَلِیْلًا مِّنْهُمْ فَاعْفُ عَنْهُمْ وَاصْفَحْ ؕ— اِنَّ اللّٰهَ یُحِبُّ الْمُحْسِنِیْنَ ۟

१३. मग जेव्हा त्यांनी वचन-कराराचा भंग केला, तेव्हा आम्ही त्यांच्यावर धिःक्काराचा मारा केला आणि त्यांची मने कठोर केलीत की ते अल्लाहच्या वाणीला तिच्या स्थानापासून बदलून टाकतात आणि जो उपदेश त्यांना दिला गेला, त्याचा फार मोठा भाग ते विसरले. त्यांच्या बेईमानी व दगाबाजीची एक न एक खबर तुम्हाला मिळत राहील. परंतु थोडेसे (लोक) असेही नाहीत, तरीही तुम्ही त्यांना माफ करीत राहा. आणि माफ करीत राहा. निःसंशय अल्लाह उपकार करणाऱ्यांना पसंत करतो. info
التفاسير: