పవిత్ర ఖురాన్ యొక్క భావార్థాల అనువాదం - మరాఠి అనువాదం - ముహమ్మద్ షఫీ అన్సారీ

పేజీ నెంబరు:close

external-link copy
18 : 5

وَقَالَتِ الْیَهُوْدُ وَالنَّصٰرٰی نَحْنُ اَبْنٰٓؤُا اللّٰهِ وَاَحِبَّآؤُهٗ ؕ— قُلْ فَلِمَ یُعَذِّبُكُمْ بِذُنُوْبِكُمْ ؕ— بَلْ اَنْتُمْ بَشَرٌ مِّمَّنْ خَلَقَ ؕ— یَغْفِرُ لِمَنْ یَّشَآءُ وَیُعَذِّبُ مَنْ یَّشَآءُ ؕ— وَلِلّٰهِ مُلْكُ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ وَمَا بَیْنَهُمَا ؗ— وَاِلَیْهِ الْمَصِیْرُ ۟

१८. आणि यहूदी व ख्रिश्चन म्हणतात की आम्ही अल्लाहचे पुत्र आणि मित्र आहोत. तुम्ही सांगा की मग अल्लाह तुमच्या अपराधांपायी तुम्हाला शिक्षा का देतो? नव्हे, किंबहुना तुम्ही त्याच्या सृष्ट निर्मितीत एक मानव आहात. तो ज्याला इच्छितो, माफ करतो आणि ज्याला इच्छितो शिक्षा-यातना देतो. आकाशांची व जमिनीची आणि यांच्या दरम्यानची राज्यसत्ता केवळ अल्लाहचीच आहे, आणि त्याच्याचकडे परतावयाचे आहे. info
التفاسير:

external-link copy
19 : 5

یٰۤاَهْلَ الْكِتٰبِ قَدْ جَآءَكُمْ رَسُوْلُنَا یُبَیِّنُ لَكُمْ عَلٰی فَتْرَةٍ مِّنَ الرُّسُلِ اَنْ تَقُوْلُوْا مَا جَآءَنَا مِنْ بَشِیْرٍ وَّلَا نَذِیْرٍ ؗ— فَقَدْ جَآءَكُمْ بَشِیْرٌ وَّنَذِیْرٌ ؕ— وَاللّٰهُ عَلٰی كُلِّ شَیْءٍ قَدِیْرٌ ۟۠

१९. हे ग्रंथधारकांनो! पैगंबरांच्या आगमनात एक दीर्घ काळाच्या खंडानंतर आमचे रसूल (मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) येऊन पोहोचले आहेत, जे तुमच्यासाठी धर्म विधानांचे निवेदन करीत आहेत यासाठी की तुम्ही असे न म्हणावे की आमच्याजवळ कोणी शुभ समाचार देणारा आणि सचेत करणारा आला नाही. तेव्हा तुमच्याजवळ एक शुभ समाचार देणारा आणि सचेत करणारा (अंतिम रसूल) येऊन पोहोचला आहे. निःसंशय अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो. info
التفاسير:

external-link copy
20 : 5

وَاِذْ قَالَ مُوْسٰی لِقَوْمِهٖ یٰقَوْمِ اذْكُرُوْا نِعْمَةَ اللّٰهِ عَلَیْكُمْ اِذْ جَعَلَ فِیْكُمْ اَنْۢبِیَآءَ وَجَعَلَكُمْ مُّلُوْكًا ۗ— وَّاٰتٰىكُمْ مَّا لَمْ یُؤْتِ اَحَدًا مِّنَ الْعٰلَمِیْنَ ۟

२०. आणि स्मरण करा जेव्हा मूसा (अलैहिस्सलाम) यांनी आपल्या लोकांना म्हटले की हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! अल्लाहच्या त्या उपकाराची आठवण करा की त्याने तुमच्यामधून पैगंबर बनविले आणि तुम्हाला राज्य प्रदान केले आणि तुम्हाला ते प्रदान केले, जे साऱ्या जगात कोणालाही प्रदान केले नाही. info
التفاسير:

external-link copy
21 : 5

یٰقَوْمِ ادْخُلُوا الْاَرْضَ الْمُقَدَّسَةَ الَّتِیْ كَتَبَ اللّٰهُ لَكُمْ وَلَا تَرْتَدُّوْا عَلٰۤی اَدْبَارِكُمْ فَتَنْقَلِبُوْا خٰسِرِیْنَ ۟

२१. हे माझ्या लोकांनो! त्या पवित्र भूमीत दाखल व्हा, जी अल्लाहने तुमच्या नावे लिहून दिली आहे. आणि आपली पाठ दाखवू नका की ज्यामुळे मोठे हानिकारक व्हाल. info
التفاسير:

external-link copy
22 : 5

قَالُوْا یٰمُوْسٰۤی اِنَّ فِیْهَا قَوْمًا جَبَّارِیْنَ ۖۗ— وَاِنَّا لَنْ نَّدْخُلَهَا حَتّٰی یَخْرُجُوْا مِنْهَا ۚ— فَاِنْ یَّخْرُجُوْا مِنْهَا فَاِنَّا دٰخِلُوْنَ ۟

२२. त्यांनी उत्तर दिले, हे मूसा! तिथे तर शक्तिशाली लढवय्ये लोक आहेत. आणि जोपर्यंत ते तिथून निघून जात नाहीत, तोपर्यंत आम्ही कधीही जाणार नाहीत, मात्र जर ते तिथून निघून जातील तर मग आम्ही (आनंदाने) तेथे जाऊ. info
التفاسير:

external-link copy
23 : 5

قَالَ رَجُلٰنِ مِنَ الَّذِیْنَ یَخَافُوْنَ اَنْعَمَ اللّٰهُ عَلَیْهِمَا ادْخُلُوْا عَلَیْهِمُ الْبَابَ ۚ— فَاِذَا دَخَلْتُمُوْهُ فَاِنَّكُمْ غٰلِبُوْنَ ۚ۬— وَعَلَی اللّٰهِ فَتَوَكَّلُوْۤا اِنْ كُنْتُمْ مُّؤْمِنِیْنَ ۟

२३. परंतु जे अल्लाहचे भय बाळगत होते, त्यांच्यापैकी दोन मनुष्य म्हणाले, ज्यांच्यावर अल्लाहने कृपा देणगी केली, की तुम्ही त्यांच्यावर (आक्रमणासाठी) दरवाजातून दाखल व्हा, जेव्हा दाखल व्हाल तेव्हा तुम्हीच वरचढराहाल, आणि ईमान राखत असाल तर अल्लाहवरच भरोसा ठेवा. info
التفاسير: