పవిత్ర ఖురాన్ యొక్క భావార్థాల అనువాదం - మరాఠి అనువాదం - ముహమ్మద్ షఫీ అన్సారీ

పేజీ నెంబరు:close

external-link copy
109 : 5

یَوْمَ یَجْمَعُ اللّٰهُ الرُّسُلَ فَیَقُوْلُ مَاذَاۤ اُجِبْتُمْ ؕ— قَالُوْا لَا عِلْمَ لَنَا ؕ— اِنَّكَ اَنْتَ عَلَّامُ الْغُیُوْبِ ۟

१०९. ज्या (कयामतच्या) दिवशी अल्लाह समस्त पैगंबरांना एकत्र करील, मग विचारेल की तुम्हाला काय उत्तर मिळाले होते? ते म्हणतील, आम्हाला काहीच माहीत नाही. गैब (अपरोक्ष) जाणणारा तूच आहेस. info
التفاسير:

external-link copy
110 : 5

اِذْ قَالَ اللّٰهُ یٰعِیْسَی ابْنَ مَرْیَمَ اذْكُرْ نِعْمَتِیْ عَلَیْكَ وَعَلٰی وَالِدَتِكَ ۘ— اِذْ اَیَّدْتُّكَ بِرُوْحِ الْقُدُسِ ۫— تُكَلِّمُ النَّاسَ فِی الْمَهْدِ وَكَهْلًا ۚ— وَاِذْ عَلَّمْتُكَ الْكِتٰبَ وَالْحِكْمَةَ وَالتَّوْرٰىةَ وَالْاِنْجِیْلَ ۚ— وَاِذْ تَخْلُقُ مِنَ الطِّیْنِ كَهَیْـَٔةِ الطَّیْرِ بِاِذْنِیْ فَتَنْفُخُ فِیْهَا فَتَكُوْنُ طَیْرًا بِاِذْنِیْ وَتُبْرِئُ الْاَكْمَهَ وَالْاَبْرَصَ بِاِذْنِیْ ۚ— وَاِذْ تُخْرِجُ الْمَوْتٰی بِاِذْنِیْ ۚ— وَاِذْ كَفَفْتُ بَنِیْۤ اِسْرَآءِیْلَ عَنْكَ اِذْ جِئْتَهُمْ بِالْبَیِّنٰتِ فَقَالَ الَّذِیْنَ كَفَرُوْا مِنْهُمْ اِنْ هٰذَاۤ اِلَّا سِحْرٌ مُّبِیْنٌ ۟

११०. जेव्हा अल्लाह फर्माविल, हे मरियम-पुत्र ईसा! तुमच्यावर आणि तुमच्या मातेवर मी केलेल्या कृपा देणगीचे स्मरण करा. जेव्हा मी पवित्र आत्मा (जिब्रील) द्वारे तुमची मदत केली. तुम्ही पाळण्यात असताना व मोठ्या वयात लोकांशी संभाषण करीत राहिले आणि जेव्हा आम्ही ग्रंथ व हिकमत आणि तौरात व इंजीलचे ज्ञान दिले आणि जेव्हा तुम्ही माझ्या हुकूमाने पक्षीरूप पुतळा मातीने तयार करीत असत आणि त्यात फुंक मारीत असत, तेव्हा माझ्या हुकूमाने तो (जिवंत) पक्षी बनत असे, आणि तुम्ही माझ्या हुकूमाने जन्मजात आंधळ्याला आणि कोढी इसमाला चांगले करीत असत, आणि माझ्या हुकूमाने मेलेल्यांना (जिवंत करून) बाहेर काढीत असत आणि जेव्हा मी इस्राईलच्या पुत्रांना तुमच्यापासून रोखले. जेव्हा तुम्ही त्यांच्याजवळ मोजिजा घेऊन आले तेव्हा त्यांच्यातले इन्कारी लोक म्हणाले, की ही केवळ उघड जादू आहे. info
التفاسير:

external-link copy
111 : 5

وَاِذْ اَوْحَیْتُ اِلَی الْحَوَارِیّٖنَ اَنْ اٰمِنُوْا بِیْ وَبِرَسُوْلِیْ ۚ— قَالُوْۤا اٰمَنَّا وَاشْهَدْ بِاَنَّنَا مُسْلِمُوْنَ ۟

१११. आणि ज्याअर्थी मी हवारींना प्रेरित केले की तुम्ही माझ्यावर आणि माझ्या पैगंबरांवर ईमान राखा, तेव्हा ते म्हणाले, आम्ही ईमान राखले आणि तुम्ही साक्षी राहा की आम्ही पूर्णतः आज्ञाधारक आहोत. info
التفاسير:

external-link copy
112 : 5

اِذْ قَالَ الْحَوَارِیُّوْنَ یٰعِیْسَی ابْنَ مَرْیَمَ هَلْ یَسْتَطِیْعُ رَبُّكَ اَنْ یُّنَزِّلَ عَلَیْنَا مَآىِٕدَةً مِّنَ السَّمَآءِ ؕ— قَالَ اتَّقُوا اللّٰهَ اِنْ كُنْتُمْ مُّؤْمِنِیْنَ ۟

११२. स्मरण करा, जेव्हा हवारी म्हणाले की हे मरियम-पुत्र ईसा! काय तुमचा पालनकर्ता आमच्यावर आकाशातून (भोजनाची) एक थाळी उतरवू शकतो? ईसा म्हणाले, ईमान राखत असाल तर अल्लाहचे भय बाळगा. info
التفاسير:

external-link copy
113 : 5

قَالُوْا نُرِیْدُ اَنْ نَّاْكُلَ مِنْهَا وَتَطْمَىِٕنَّ قُلُوْبُنَا وَنَعْلَمَ اَنْ قَدْ صَدَقْتَنَا وَنَكُوْنَ عَلَیْهَا مِنَ الشّٰهِدِیْنَ ۟

११३. ते म्हणाले की आम्ही त्यातून खआऊ इच्छितो आणि आमच्या मनाला समाधान लाभावे आणि आमची खात्री व्हावी की तुम्ही आम्हाला खरे सांगितले आणि आम्ही त्यावर साक्षी राहावे. info
التفاسير: