పవిత్ర ఖురాన్ యొక్క భావార్థాల అనువాదం - మరాఠి అనువాదం - ముహమ్మద్ షఫీ అన్సారీ

పేజీ నెంబరు:close

external-link copy
37 : 5

یُرِیْدُوْنَ اَنْ یَّخْرُجُوْا مِنَ النَّارِ وَمَا هُمْ بِخٰرِجِیْنَ مِنْهَا ؗ— وَلَهُمْ عَذَابٌ مُّقِیْمٌ ۟

३७. ते जहन्नममधून बाहेर पडण्याची खूप इच्छा करतील, परंतु त्यातून कधीच बाहेर पडू शकणार नाहीत. त्यांच्यासाठी तर निरंतर अज़ाब आहे. info
التفاسير:

external-link copy
38 : 5

وَالسَّارِقُ وَالسَّارِقَةُ فَاقْطَعُوْۤا اَیْدِیَهُمَا جَزَآءً بِمَا كَسَبَا نَكَالًا مِّنَ اللّٰهِ ؕ— وَاللّٰهُ عَزِیْزٌ حَكِیْمٌ ۟

३८. चोरी करणारा व चोरी करणारीचे हात कापून टाका. हे त्याच्या दुष्कर्माचे फळ आणि अल्लाहतर्फे शिक्षा आहे आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह शक्तिशाली आणि हिकमतशाली आहे. info
التفاسير:

external-link copy
39 : 5

فَمَنْ تَابَ مِنْ بَعْدِ ظُلْمِهٖ وَاَصْلَحَ فَاِنَّ اللّٰهَ یَتُوْبُ عَلَیْهِ ؕ— اِنَّ اللّٰهَ غَفُوْرٌ رَّحِیْمٌ ۟

३९. जो मनुष्य अपराधानंतर (अल्लाहकडे) क्षमा याचना करील, आणि आपले आचरण सुधारेल तर अल्लाह त्याची तौबा (क्षमा याचना) कबूल करतो. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाह माफ करणारा, दया करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
40 : 5

اَلَمْ تَعْلَمْ اَنَّ اللّٰهَ لَهٗ مُلْكُ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ؕ— یُعَذِّبُ مَنْ یَّشَآءُ وَیَغْفِرُ لِمَنْ یَّشَآءُ ؕ— وَاللّٰهُ عَلٰی كُلِّ شَیْءٍ قَدِیْرٌ ۟

४०. काय तुम्ही नाही जाणत की आकाशआंची व जमिनीची राज्य सत्ता केवळ अल्लाहकरिताच आहे? तो ज्याला इच्छितो अज़ाब (शिक्षा-यातना) देतो, आणि ज्याला इच्छितो माफ करतो. अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो. info
التفاسير:

external-link copy
41 : 5

یٰۤاَیُّهَا الرَّسُوْلُ لَا یَحْزُنْكَ الَّذِیْنَ یُسَارِعُوْنَ فِی الْكُفْرِ مِنَ الَّذِیْنَ قَالُوْۤا اٰمَنَّا بِاَفْوَاهِهِمْ وَلَمْ تُؤْمِنْ قُلُوْبُهُمْ ۛۚ— وَمِنَ الَّذِیْنَ هَادُوْا ۛۚ— سَمّٰعُوْنَ لِلْكَذِبِ سَمّٰعُوْنَ لِقَوْمٍ اٰخَرِیْنَ ۙ— لَمْ یَاْتُوْكَ ؕ— یُحَرِّفُوْنَ الْكَلِمَ مِنْ بَعْدِ مَوَاضِعِهٖ ۚ— یَقُوْلُوْنَ اِنْ اُوْتِیْتُمْ هٰذَا فَخُذُوْهُ وَاِنْ لَّمْ تُؤْتَوْهُ فَاحْذَرُوْا ؕ— وَمَنْ یُّرِدِ اللّٰهُ فِتْنَتَهٗ فَلَنْ تَمْلِكَ لَهٗ مِنَ اللّٰهِ شَیْـًٔا ؕ— اُولٰٓىِٕكَ الَّذِیْنَ لَمْ یُرِدِ اللّٰهُ اَنْ یُّطَهِّرَ قُلُوْبَهُمْ ؕ— لَهُمْ فِی الدُّنْیَا خِزْیٌ ۙ— وَّلَهُمْ فِی الْاٰخِرَةِ عَذَابٌ عَظِیْمٌ ۟

४१. हे पैगंबर! तुम्ही त्यांच्यासाठी दुःखी होऊ नका जे इन्कार करण्यात धाव घेत आहेत, जे आपल्या तोंडाने म्हणाले की आम्ही ईमान राखले आणि त्यांच्या मनाने ईमान राखले नाही आणि जे यहूदी झाले, त्यांच्यातले काही खोटे बोलण्याचे अभ्यस्त आणि दुसऱ्या लोकांचे गुप्तहेर आहेत, जे तुमच्याजवळ आले नाहीत. ते वाणीला (वचनाला) मूळ स्थानापासून हटवून तिचा अर्थ बदलून टाकतात आणि असे सांगतात की जर तुम्हाला हा आदेश मिळाला तर कबूल करा आणि न मिळाल्यास अलग राहा. जर अल्लाह एखाद्यास भटकत ठेवू इच्छिल तर त्याच्यासाठी अल्लाहवर तुम्हाला किंचितही अधिकार नाही. अशाच लोकांच्या हृदयांना अल्लाह पाक (पवित्र) करू इच्छित नाही. याच लोकांसाठी या जगात अपमान आणि आखिरतमध्ये मोठा जबरदस्त अज़ाब आहे. info
التفاسير: