పవిత్ర ఖురాన్ యొక్క భావార్థాల అనువాదం - మరాఠి అనువాదం - ముహమ్మద్ షఫీ అన్సారీ

పేజీ నెంబరు:close

external-link copy
46 : 5

وَقَفَّیْنَا عَلٰۤی اٰثَارِهِمْ بِعِیْسَی ابْنِ مَرْیَمَ مُصَدِّقًا لِّمَا بَیْنَ یَدَیْهِ مِنَ التَّوْرٰىةِ ۪— وَاٰتَیْنٰهُ الْاِنْجِیْلَ فِیْهِ هُدًی وَّنُوْرٌ ۙ— وَّمُصَدِّقًا لِّمَا بَیْنَ یَدَیْهِ مِنَ التَّوْرٰىةِ وَهُدًی وَّمَوْعِظَةً لِّلْمُتَّقِیْنَ ۟ؕ

४६. आणि आम्ही त्यांच्यामागे मरियम-पुत्र ईसाला पाठविले, जे आपल्या पूर्वीचा ग्रंथ तौरात सत्य असल्याचे सांगत होते आणि आम्ही त्यांना इंजील (हा ग्रंथ) प्रदान केला. ज्यात नूर (दिव्य प्रकाश) आणि मार्गदर्शन होते आणि तो आपल्या पूर्वीचा ग्रंथ तौरात सत्य असल्याचे सांगत होता आणि ते स्पष्ट मार्गदर्शन आणि शिकवण होती, अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता. info
التفاسير:

external-link copy
47 : 5

وَلْیَحْكُمْ اَهْلُ الْاِنْجِیْلِ بِمَاۤ اَنْزَلَ اللّٰهُ فِیْهِ ؕ— وَمَنْ لَّمْ یَحْكُمْ بِمَاۤ اَنْزَلَ اللّٰهُ فَاُولٰٓىِٕكَ هُمُ الْفٰسِقُوْنَ ۟

४७. आणि इंजील बाळगणाऱ्यांकरिता हे बंधनकारक ठरते की जे काही अल्लाहने इंजीलमध्ये अवतरीत केले आहे, त्याच्याचनुसार फैसला करावा आणि जो मनुष्यदेखील अल्लाहने अवतरीत केल्यानुसार फैसला करणार नाही किंवा मानणार नाही तर असे लोक दुराचारी आहेत. info
التفاسير:

external-link copy
48 : 5

وَاَنْزَلْنَاۤ اِلَیْكَ الْكِتٰبَ بِالْحَقِّ مُصَدِّقًا لِّمَا بَیْنَ یَدَیْهِ مِنَ الْكِتٰبِ وَمُهَیْمِنًا عَلَیْهِ فَاحْكُمْ بَیْنَهُمْ بِمَاۤ اَنْزَلَ اللّٰهُ وَلَا تَتَّبِعْ اَهْوَآءَهُمْ عَمَّا جَآءَكَ مِنَ الْحَقِّ ؕ— لِكُلٍّ جَعَلْنَا مِنْكُمْ شِرْعَةً وَّمِنْهَاجًا ؕ— وَلَوْ شَآءَ اللّٰهُ لَجَعَلَكُمْ اُمَّةً وَّاحِدَةً وَّلٰكِنْ لِّیَبْلُوَكُمْ فِیْ مَاۤ اٰتٰىكُمْ فَاسْتَبِقُوا الْخَیْرٰتِ ؕ— اِلَی اللّٰهِ مَرْجِعُكُمْ جَمِیْعًا فَیُنَبِّئُكُمْ بِمَا كُنْتُمْ فِیْهِ تَخْتَلِفُوْنَ ۟ۙ

४८. आणि आम्ही तुमच्याकडे हा सत्यपूर्ण ग्रंथ अवतरीत केला आहे, जो आपल्या पूर्वीच्या समस्त आसमानी ग्रंथांची सत्यता दर्शवितो आणि त्यांचा संरक्षक आहे. यास्तव तुम्ही त्यांच्या दरम्यान, अल्लाहने अवतरीत केलेल्या ग्रंथानुसार फैसाला करा, या सत्याकडे पाठ फिरवून त्यांच्या इच्छा आकांक्षांवर जाऊ नका. तुमच्यापैकी प्रत्येकासाठी आम्ही एक शरीअत (धर्मशास्त्र) आणि मार्ग निर्धारीत केला आहे. अल्लाहने इच्छिले असते तर तुम्हा सर्वांचा एकच जनसमूह (उम्मत) बनविला असता. परंतु तो असे इच्छितो की, जे काही तुम्हाला दिले आहे, त्यात तुमची कसोटी घ्यावी, तेव्हा तुम्ही चांगल्या मोबदल्याच्या दिशेने त्वरा करा, तुम्हा सर्वांना अल्लाहच्याचकडे परत जायचे आहे. मग तो तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट दाखवून देईल, ज्यासंदर्भात तुम्ही मतभेद राखता. info
التفاسير:

external-link copy
49 : 5

وَاَنِ احْكُمْ بَیْنَهُمْ بِمَاۤ اَنْزَلَ اللّٰهُ وَلَا تَتَّبِعْ اَهْوَآءَهُمْ وَاحْذَرْهُمْ اَنْ یَّفْتِنُوْكَ عَنْ بَعْضِ مَاۤ اَنْزَلَ اللّٰهُ اِلَیْكَ ؕ— فَاِنْ تَوَلَّوْا فَاعْلَمْ اَنَّمَا یُرِیْدُ اللّٰهُ اَنْ یُّصِیْبَهُمْ بِبَعْضِ ذُنُوْبِهِمْ ؕ— وَاِنَّ كَثِیْرًا مِّنَ النَّاسِ لَفٰسِقُوْنَ ۟

४९. आणि तुम्ही त्यांच्या तंट्यात अल्लाहने अवतरीत केलेल्या वहयीनुसार फैसला करा. त्यांच्या इच्छा अभिलाषांचे अनुसरण करू नका आणि त्यांच्यापासून सावध राहा की कदाचित हे तुम्हाला अल्लाहच्या अवतरीत केलेल्या एखाद्या आदेशापासून डळमळीत न करावेत. जर हे तोंड फिरवतील तर खात्रीने अल्लाहचा हाच इरादा आहे की त्यांना त्यांच्या काही अपराधांची शिक्षा देऊनच टाकावी आणि अधिकांश लोक अवज्ञाकारी असतात. info
التفاسير:

external-link copy
50 : 5

اَفَحُكْمَ الْجَاهِلِیَّةِ یَبْغُوْنَ ؕ— وَمَنْ اَحْسَنُ مِنَ اللّٰهِ حُكْمًا لِّقَوْمٍ یُّوْقِنُوْنَ ۟۠

५०. काय हे लोक पुनश्च अज्ञानतापूर्ण फैसला इच्छितात? आणि ईमान राखणाऱ्यांकरिता अल्लाहपेक्षा उत्तम फैसला करणारा आणि आदेश करणारा आणखी कोण असू शकतो? info
التفاسير: