పవిత్ర ఖురాన్ యొక్క భావార్థాల అనువాదం - మరాఠి అనువాదం - ముహమ్మద్ షఫీ అన్సారీ

పేజీ నెంబరు:close

external-link copy
96 : 5

اُحِلَّ لَكُمْ صَیْدُ الْبَحْرِ وَطَعَامُهٗ مَتَاعًا لَّكُمْ وَلِلسَّیَّارَةِ ۚ— وَحُرِّمَ عَلَیْكُمْ صَیْدُ الْبَرِّ مَا دُمْتُمْ حُرُمًا ؕ— وَاتَّقُوا اللّٰهَ الَّذِیْۤ اِلَیْهِ تُحْشَرُوْنَ ۟

९६. तुमच्यासाठी समुद्रातील (प्राण्याची) शिकार पकडणे व खाणे हलाल केले गेले आहे. तुमच्या वापरासाठी आणि प्रवाशांसाठी, आणि जोपर्यंत तुम्ही एहरामच्या अवस्थेत असाल, खुश्कीची शिकार हराम केली गेली आहे आणि अल्लाहचे भय राखा, ज्याच्याजवळ तुम्ही एकत्र केले जाल. info
التفاسير:

external-link copy
97 : 5

جَعَلَ اللّٰهُ الْكَعْبَةَ الْبَیْتَ الْحَرَامَ قِیٰمًا لِّلنَّاسِ وَالشَّهْرَ الْحَرَامَ وَالْهَدْیَ وَالْقَلَآىِٕدَ ؕ— ذٰلِكَ لِتَعْلَمُوْۤا اَنَّ اللّٰهَ یَعْلَمُ مَا فِی السَّمٰوٰتِ وَمَا فِی الْاَرْضِ وَاَنَّ اللّٰهَ بِكُلِّ شَیْءٍ عَلِیْمٌ ۟

९७. अल्लाहने काबागृहाला, जे आदर-सन्मानपूर्ण घर आहे, लोकांकरिता कायम राहण्याचे कारण बनविले आणि आदरणीय महिन्याला आणि हरममध्ये कुर्बानी दिल्या जाणाऱ्या जनावरांनाही आणि त्या जनावरांनाही, ज्यांच्या गळ्यात पट्टे असतील, हे अशासाठी की तुम्ही या गोष्टीवर विश्वास राखावा की निःसंशय अल्लाह आकाशांच्या व जमिनीच्या समस्त चीज-वस्तूंचे ज्ञान राखतो आणि निःसंशय अल्लाह प्रत्येक गोष्टीचे चांगल्या प्रकारे ज्ञान राखतो. info
التفاسير:

external-link copy
98 : 5

اِعْلَمُوْۤا اَنَّ اللّٰهَ شَدِیْدُ الْعِقَابِ وَاَنَّ اللّٰهَ غَفُوْرٌ رَّحِیْمٌ ۟ؕ

९८. तुम्ही जाणून असा की सर्वश्रेष्ठ अल्लाह शिक्षा यातनाही कठोर देणारा आहे आणि अल्लाह मोठा माफ करणारा आणि अतिशय दया करणाराही आहे. info
التفاسير:

external-link copy
99 : 5

مَا عَلَی الرَّسُوْلِ اِلَّا الْبَلٰغُ ؕ— وَاللّٰهُ یَعْلَمُ مَا تُبْدُوْنَ وَمَا تَكْتُمُوْنَ ۟

९९. पैगंबराचे कर्तव्य तर केवळ पोहचविण्याचे आहे आणि अल्लाह सर्व काही जाणतो, जे काही तुम्ही जाहीर करता आणि जे काही तुम्ही लपविता. info
التفاسير:

external-link copy
100 : 5

قُلْ لَّا یَسْتَوِی الْخَبِیْثُ وَالطَّیِّبُ وَلَوْ اَعْجَبَكَ كَثْرَةُ الْخَبِیْثِ ۚ— فَاتَّقُوا اللّٰهَ یٰۤاُولِی الْاَلْبَابِ لَعَلَّكُمْ تُفْلِحُوْنَ ۟۠

१००. तुम्ही सांगा की नापाक आणि पाक (गलिच्छ व स्वच्छ शुद्ध) समान नाहीत, मग तुम्हाला नापाकची विपुलता चांगली वाटत असली तरी, अल्लाहचे भय बाळगून राहा हे बुद्धिमानांनो! यासाठी की तुम्ही सफल व्हावे. info
التفاسير:

external-link copy
101 : 5

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْا لَا تَسْـَٔلُوْا عَنْ اَشْیَآءَ اِنْ تُبْدَ لَكُمْ تَسُؤْكُمْ ۚ— وَاِنْ تَسْـَٔلُوْا عَنْهَا حِیْنَ یُنَزَّلُ الْقُرْاٰنُ تُبْدَ لَكُمْ ؕ— عَفَا اللّٰهُ عَنْهَا ؕ— وَاللّٰهُ غَفُوْرٌ حَلِیْمٌ ۟

१०१. हे ईमान राखणाऱ्यांनो! अशी गोष्ट विचारू नका की जी जाहीर केली गेली तर तुम्हाला वाईट वाटेल आणि जर कुरआन उतरतेवेळी विचाराल तर तुम्हाला त्याचे उत्तर उघड दिले जाईल. यापूर्वी जे झाले ते अल्लाहने माफ केले आणि अल्लाह मोठा माफ करणारा सहनशील आहे. info
التفاسير:

external-link copy
102 : 5

قَدْ سَاَلَهَا قَوْمٌ مِّنْ قَبْلِكُمْ ثُمَّ اَصْبَحُوْا بِهَا كٰفِرِیْنَ ۟

१०२. तुमच्यापूर्वी काही लोकांनी असेच प्रश्न विचारले, नंतर त्याचे इन्कारी झाले. info
التفاسير:

external-link copy
103 : 5

مَا جَعَلَ اللّٰهُ مِنْ بَحِیْرَةٍ وَّلَا سَآىِٕبَةٍ وَّلَا وَصِیْلَةٍ وَّلَا حَامٍ ۙ— وَّلٰكِنَّ الَّذِیْنَ كَفَرُوْا یَفْتَرُوْنَ عَلَی اللّٰهِ الْكَذِبَ ؕ— وَاَكْثَرُهُمْ لَا یَعْقِلُوْنَ ۟

१०३. बहीरा, साएबा, वसीला आणि हाम वगैरेचा अल्लाहने आदेश दिला नाही, परंतु इन्कारी लोक अल्लाहवर मिथ्या आरोप ठेवतात, आणि त्यांच्यातले बहुतेक जण अक्कल बाळगत नाही. info
التفاسير: