పవిత్ర ఖురాన్ యొక్క భావార్థాల అనువాదం - మరాఠి అనువాదం - ముహమ్మద్ షఫీ అన్సారీ

పేజీ నెంబరు:close

external-link copy
78 : 5

لُعِنَ الَّذِیْنَ كَفَرُوْا مِنْ بَنِیْۤ اِسْرَآءِیْلَ عَلٰی لِسَانِ دَاوٗدَ وَعِیْسَی ابْنِ مَرْیَمَ ؕ— ذٰلِكَ بِمَا عَصَوْا وَّكَانُوْا یَعْتَدُوْنَ ۟

७८. इस्राईलच्या संततीमधील इन्कारी लोकांचा (हजरत) दाऊद आणि मरियम-पुत्र हजरत ईसा यांच्या तोंडून धिःक्कार केला गेला, या कारणाने की ते आज्ञा भंग करणारे होते आणि मर्यादेचे उल्लंघन करीत होते. info
التفاسير:

external-link copy
79 : 5

كَانُوْا لَا یَتَنَاهَوْنَ عَنْ مُّنْكَرٍ فَعَلُوْهُ ؕ— لَبِئْسَ مَا كَانُوْا یَفْعَلُوْنَ ۟

७९. ते आपसात एकमेकांना वाईट कामांपासून, जे ते करीत असत, रोखत नव्हते, निश्चितच जे काही ते करीत, अतिशय वाईट होते. info
التفاسير:

external-link copy
80 : 5

تَرٰی كَثِیْرًا مِّنْهُمْ یَتَوَلَّوْنَ الَّذِیْنَ كَفَرُوْا ؕ— لَبِئْسَ مَا قَدَّمَتْ لَهُمْ اَنْفُسُهُمْ اَنْ سَخِطَ اللّٰهُ عَلَیْهِمْ وَفِی الْعَذَابِ هُمْ خٰلِدُوْنَ ۟

८०. त्यांच्यातल्या अधिकांश लोकांना तुम्ही पाहाल की ते इन्कारी लोकांशी मैत्री करतात. जे काही त्यांनी आपल्या पुढे पाठविले आहे ते अतिशय वाईट आहे. (परिणामी) सर्वश्रेष्ठ अल्लाह त्यांच्याशी नाराज झाला आणि ते नेहमी अज़ाब (शिक्षा-यातने) मध्ये राहतील. info
التفاسير:

external-link copy
81 : 5

وَلَوْ كَانُوْا یُؤْمِنُوْنَ بِاللّٰهِ وَالنَّبِیِّ وَمَاۤ اُنْزِلَ اِلَیْهِ مَا اتَّخَذُوْهُمْ اَوْلِیَآءَ وَلٰكِنَّ كَثِیْرًا مِّنْهُمْ فٰسِقُوْنَ ۟

८१. जर त्यांनी अल्लाहवर, पैगंबरांवर आणि जे अवतरीत केले गेले आहे त्यावर ईमान राखले असते तर इन्कारी लोकांशी मैत्री केली नसती, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक लोक दुराचारी आहेत. info
التفاسير:

external-link copy
82 : 5

لَتَجِدَنَّ اَشَدَّ النَّاسِ عَدَاوَةً لِّلَّذِیْنَ اٰمَنُوا الْیَهُوْدَ وَالَّذِیْنَ اَشْرَكُوْا ۚ— وَلَتَجِدَنَّ اَقْرَبَهُمْ مَّوَدَّةً لِّلَّذِیْنَ اٰمَنُوا الَّذِیْنَ قَالُوْۤا اِنَّا نَصٰرٰی ؕ— ذٰلِكَ بِاَنَّ مِنْهُمْ قِسِّیْسِیْنَ وَرُهْبَانًا وَّاَنَّهُمْ لَا یَسْتَكْبِرُوْنَ ۟

८२. निःसंशय, तुम्हाला ईमानधारकांचे सक्त (कट्टर) वैरी यहूदी आणि अनेकेश्वरवादी आढळून येतील आणि ईमानधारकांचे सर्वाधिक निकटचे मित्र तुम्हाला जरूर त्यांच्यात आढळतील, जे स्वतःला ख्रिश्चन म्हणतात, हे अशासाठी की त्यांच्यात धर्मज्ञानी- विद्वान आणि संत-महात्मा आहेत, आणि या कारणास्तव की ते घमेंड करीत नाहीत. info
التفاسير:

external-link copy
83 : 5

وَاِذَا سَمِعُوْا مَاۤ اُنْزِلَ اِلَی الرَّسُوْلِ تَرٰۤی اَعْیُنَهُمْ تَفِیْضُ مِنَ الدَّمْعِ مِمَّا عَرَفُوْا مِنَ الْحَقِّ ۚ— یَقُوْلُوْنَ رَبَّنَاۤ اٰمَنَّا فَاكْتُبْنَا مَعَ الشّٰهِدِیْنَ ۟

८३. आणि जेव्हा ते पैगंबराकडे अवतरित झालेला संदेश ऐकतात, तेव्हा तुम्हाला त्यांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहताना दिसतील. या कारणाने की त्यांनी सत्य ओळखून घेतले. ते म्हणतात, हे आमच्या पालनकर्त्या! आम्ही ईमान राखले, तेव्हा तू आम्हालाही साक्ष देणाऱ्यांमध्ये लिहून घे. info
التفاسير: