పవిత్ర ఖురాన్ యొక్క భావార్థాల అనువాదం - మరాఠి అనువాదం - ముహమ్మద్ షఫీ అన్సారీ

పేజీ నెంబరు:close

external-link copy
65 : 5

وَلَوْ اَنَّ اَهْلَ الْكِتٰبِ اٰمَنُوْا وَاتَّقَوْا لَكَفَّرْنَا عَنْهُمْ سَیِّاٰتِهِمْ وَلَاَدْخَلْنٰهُمْ جَنّٰتِ النَّعِیْمِ ۟

६५. आणि जर या ग्रंथधारकांनी ईमान राखले असते आणि अल्लाहचे भय बाळगले असते तर आम्ही त्यांच्या दुष्कृत्यांवर पडदा टाकला असता आणि निश्चितच त्यांना कृपा देणग्यांनी भरलेल्या जन्नतमध्ये दाखल केले असते. info
التفاسير:

external-link copy
66 : 5

وَلَوْ اَنَّهُمْ اَقَامُوا التَّوْرٰىةَ وَالْاِنْجِیْلَ وَمَاۤ اُنْزِلَ اِلَیْهِمْ مِّنْ رَّبِّهِمْ لَاَكَلُوْا مِنْ فَوْقِهِمْ وَمِنْ تَحْتِ اَرْجُلِهِمْ ؕ— مِنْهُمْ اُمَّةٌ مُّقْتَصِدَةٌ ؕ— وَكَثِیْرٌ مِّنْهُمْ سَآءَ مَا یَعْمَلُوْنَ ۟۠

६६. जर त्यांनी तौरात आणि इंजील आणि त्या धर्मशास्त्रांचे पालन केले असते जे त्यांच्याकडे, त्यांच्या पालनकर्त्यातर्फे उतरविले गेलेत तर त्यांना आपल्या वरूनही आणि पायाखालूनही भरपूर (अन्नसामग्री) खायला लाभले असते. त्याच्याताला एक समूह मधल्या मार्गावर आहे, मात्र अधिकांश दुराचारी आहेत. info
التفاسير:

external-link copy
67 : 5

یٰۤاَیُّهَا الرَّسُوْلُ بَلِّغْ مَاۤ اُنْزِلَ اِلَیْكَ مِنْ رَّبِّكَ ؕ— وَاِنْ لَّمْ تَفْعَلْ فَمَا بَلَّغْتَ رِسَالَتَهٗ ؕ— وَاللّٰهُ یَعْصِمُكَ مِنَ النَّاسِ ؕ— اِنَّ اللّٰهَ لَا یَهْدِی الْقَوْمَ الْكٰفِرِیْنَ ۟

६७. हे पैगंबर! तुमच्याकडे, तुमच्या पालनकर्त्यातर्फे जो (संदेश) उतरविला गेला आहे, तो लोकांपर्यंत पोहचवा. जर तुम्ही असे केले नाही, तर त्याच्या संदेशाचा हक्क अदा केला नाही आणि अल्लाह लोकांपासून तुमचे रक्षण करील निःसंशय अल्लाह इन्कारी लोकांना मार्गदर्शन करीत नाही. info
التفاسير:

external-link copy
68 : 5

قُلْ یٰۤاَهْلَ الْكِتٰبِ لَسْتُمْ عَلٰی شَیْءٍ حَتّٰی تُقِیْمُوا التَّوْرٰىةَ وَالْاِنْجِیْلَ وَمَاۤ اُنْزِلَ اِلَیْكُمْ مِّنْ رَّبِّكُمْ ؕ— وَلَیَزِیْدَنَّ كَثِیْرًا مِّنْهُمْ مَّاۤ اُنْزِلَ اِلَیْكَ مِنْ رَّبِّكَ طُغْیَانًا وَّكُفْرًا ۚ— فَلَا تَاْسَ عَلَی الْقَوْمِ الْكٰفِرِیْنَ ۟

६८. तुम्ही सांगा की, हे ग्रंथधारकांनो! तुम्हाला कसलाही आधार नाही, जोपर्यंत तौरात आणि इंजील आणि जेदेखील (धर्मशास्त्र) तुमच्या पालनकर्त्यातर्फे तुमच्याकडे उतरविले गेले आहे, त्याचे पालन न कराल आणि तुमच्याकडे जे (पवित्र कुरआन) तुमच्या पालनकर्त्यातर्फे अवतरीत केले गेले आहे, ते यांच्यातल्या बहुतेक लोकांच्या हट्ट आणि इन्कारास वाढविल. तेव्हा या इन्कारी लोकांबद्दल तुम्ही दुःख करू नका. info
التفاسير:

external-link copy
69 : 5

اِنَّ الَّذِیْنَ اٰمَنُوْا وَالَّذِیْنَ هَادُوْا وَالصّٰبِـُٔوْنَ وَالنَّصٰرٰی مَنْ اٰمَنَ بِاللّٰهِ وَالْیَوْمِ الْاٰخِرِ وَعَمِلَ صَالِحًا فَلَا خَوْفٌ عَلَیْهِمْ وَلَا هُمْ یَحْزَنُوْنَ ۟

६९. ईमानधारक, यहूदी, ताऱ्यांचे उपासक आणि ख्रिश्चनांपैकी जोदेखील अल्लाह आणि अंतिम दिवसा (कयामत) वर ईमान राखील आणि सत्कर्म करीत राहील तर अशा लोकांना, ना कसले भय राहील, ना ते दुःखी होतील. info
التفاسير:

external-link copy
70 : 5

لَقَدْ اَخَذْنَا مِیْثَاقَ بَنِیْۤ اِسْرَآءِیْلَ وَاَرْسَلْنَاۤ اِلَیْهِمْ رُسُلًا ؕ— كُلَّمَا جَآءَهُمْ رَسُوْلٌۢ بِمَا لَا تَهْوٰۤی اَنْفُسُهُمْ ۙ— فَرِیْقًا كَذَّبُوْا وَفَرِیْقًا یَّقْتُلُوْنَ ۟ۗ

७०. आम्ही इस्राईलच्या पुत्रां (यहूदीं) कडून वायदा घेतला आणि त्यांच्याकडे पैगंबरांना पाठविले, जेव्हा एखादा पैगंबर त्यांच्याजवळ असा आदेश घेऊन आला ज्याला त्यांचे मन स्वीकारत नव्हते तर त्यांनी एका गटाला खोटे ठरविले आणि एका गटाची हत्या करीत राहिले. info
التفاسير: