३६. यास्तव जेव्हा मूसा (अलै.) त्यांच्याजवळ आम्ही दिलेले उघड चमत्कार (मोजिजे) घेऊन पोहोचले, तेव्हा ते म्हणू लागले की ही तर केवळ बनावटी जादू आहे. आम्ही आपल्यापूर्वी होऊन गेलेल्यांच्या काळात असे कधी ऐकले नाही.
३७. आणि (हजरत) मूसा म्हणाले, माझा पालनकर्ता त्याला चांगल्या प्रकारे जाणतो, जो त्याच्याजवळचे मार्गदर्शन घेऊन येता। आणि ज्याच्यासाठी आखिरतचा चांगला परिणाम असतो. निःसंशय, अत्याचारी लोकांचे (कधीही) भले होणार नाही.
३८. आणि फिरऔन म्हणाला, हे दरबारी लोकांनो! मी तर आपल्याखेरीज दुसऱ्या कोणाला तुमचा उपास्य (माबूद) जाणत नाही. ऐक, हे हामान! तू माझ्यासाठी मातीला आगीत भाजव, मग माझ्यासाठी एक महाल तयार कर, यासाठी की मूसाच्या उपास्याला डोकावून पाहावे. मी तर त्याला खोट्या लोकांपैकीच समजत आहे.
४३. आणि आम्ही पूर्वीच्या काळातील लोकांना नष्ट केल्यानंतर मूसाला असा ग्रंथ प्रदान केला, जो लोकांसाठी प्रमाण, आणि मार्गदर्शन व (अल्लाहची) कृपा होऊन आला होता, यासाठी की त्यांनी बोध ग्रहण करावा.