Tradução dos significados do Nobre Qur’an. - Tradução marata - Muhammad Shafi Ansari

Número de página: 389:385 close

external-link copy
36 : 28

فَلَمَّا جَآءَهُمْ مُّوْسٰی بِاٰیٰتِنَا بَیِّنٰتٍ قَالُوْا مَا هٰذَاۤ اِلَّا سِحْرٌ مُّفْتَرًی وَّمَا سَمِعْنَا بِهٰذَا فِیْۤ اٰبَآىِٕنَا الْاَوَّلِیْنَ ۟

३६. यास्तव जेव्हा मूसा (अलै.) त्यांच्याजवळ आम्ही दिलेले उघड चमत्कार (मोजिजे) घेऊन पोहोचले, तेव्हा ते म्हणू लागले की ही तर केवळ बनावटी जादू आहे. आम्ही आपल्यापूर्वी होऊन गेलेल्यांच्या काळात असे कधी ऐकले नाही. info
التفاسير:

external-link copy
37 : 28

وَقَالَ مُوْسٰی رَبِّیْۤ اَعْلَمُ بِمَنْ جَآءَ بِالْهُدٰی مِنْ عِنْدِهٖ وَمَنْ تَكُوْنُ لَهٗ عَاقِبَةُ الدَّارِ ؕ— اِنَّهٗ لَا یُفْلِحُ الظّٰلِمُوْنَ ۟

३७. आणि (हजरत) मूसा म्हणाले, माझा पालनकर्ता त्याला चांगल्या प्रकारे जाणतो, जो त्याच्याजवळचे मार्गदर्शन घेऊन येता। आणि ज्याच्यासाठी आखिरतचा चांगला परिणाम असतो. निःसंशय, अत्याचारी लोकांचे (कधीही) भले होणार नाही. info
التفاسير:

external-link copy
38 : 28

وَقَالَ فِرْعَوْنُ یٰۤاَیُّهَا الْمَلَاُ مَا عَلِمْتُ لَكُمْ مِّنْ اِلٰهٍ غَیْرِیْ ۚ— فَاَوْقِدْ لِیْ یٰهَامٰنُ عَلَی الطِّیْنِ فَاجْعَلْ لِّیْ صَرْحًا لَّعَلِّیْۤ اَطَّلِعُ اِلٰۤی اِلٰهِ مُوْسٰی ۙ— وَاِنِّیْ لَاَظُنُّهٗ مِنَ الْكٰذِبِیْنَ ۟

३८. आणि फिरऔन म्हणाला, हे दरबारी लोकांनो! मी तर आपल्याखेरीज दुसऱ्या कोणाला तुमचा उपास्य (माबूद) जाणत नाही. ऐक, हे हामान! तू माझ्यासाठी मातीला आगीत भाजव, मग माझ्यासाठी एक महाल तयार कर, यासाठी की मूसाच्या उपास्याला डोकावून पाहावे. मी तर त्याला खोट्या लोकांपैकीच समजत आहे. info
التفاسير:

external-link copy
39 : 28

وَاسْتَكْبَرَ هُوَ وَجُنُوْدُهٗ فِی الْاَرْضِ بِغَیْرِ الْحَقِّ وَظَنُّوْۤا اَنَّهُمْ اِلَیْنَا لَا یُرْجَعُوْنَ ۟

३९. त्याने आणि त्याच्या सैन्याने नाहक देशात घमेंड केली, आणि असे समजून घेतले की आमच्याकडे परतविले जाणारच नाहीत. info
التفاسير:

external-link copy
40 : 28

فَاَخَذْنٰهُ وَجُنُوْدَهٗ فَنَبَذْنٰهُمْ فِی الْیَمِّ ۚ— فَانْظُرْ كَیْفَ كَانَ عَاقِبَةُ الظّٰلِمِیْنَ ۟

४०. शेवटी आम्ही त्याला आणि त्याच्या सैन्याला धरले आणि समुद्रात बुडवून टाकले. आता पाहा की त्या अत्याचारींचा अंत कसा झाला! info
التفاسير:

external-link copy
41 : 28

وَجَعَلْنٰهُمْ اَىِٕمَّةً یَّدْعُوْنَ اِلَی النَّارِ ۚ— وَیَوْمَ الْقِیٰمَةِ لَا یُنْصَرُوْنَ ۟

४१. आणि आम्ही त्यांना असे पेशवे बनविले की लोकांना जहन्नमकडे आमंत्रित करतील आणि कयामतच्या दिवशीही त्यांना मदत केली जाणार नाही. info
التفاسير:

external-link copy
42 : 28

وَاَتْبَعْنٰهُمْ فِیْ هٰذِهِ الدُّنْیَا لَعْنَةً ۚ— وَیَوْمَ الْقِیٰمَةِ هُمْ مِّنَ الْمَقْبُوْحِیْنَ ۟۠

४२. आणि आम्ही या जगात देखील त्यांच्या मागे आपली लानत (निर्भर्त्सना) लावली, आणि कयामतच्या दिवशीही ते वाईट अवस्था असणाऱ्या लोकांपैकी असतील. info
التفاسير:

external-link copy
43 : 28

وَلَقَدْ اٰتَیْنَا مُوْسَی الْكِتٰبَ مِنْ بَعْدِ مَاۤ اَهْلَكْنَا الْقُرُوْنَ الْاُوْلٰی بَصَآىِٕرَ لِلنَّاسِ وَهُدًی وَّرَحْمَةً لَّعَلَّهُمْ یَتَذَكَّرُوْنَ ۟

४३. आणि आम्ही पूर्वीच्या काळातील लोकांना नष्ट केल्यानंतर मूसाला असा ग्रंथ प्रदान केला, जो लोकांसाठी प्रमाण, आणि मार्गदर्शन व (अल्लाहची) कृपा होऊन आला होता, यासाठी की त्यांनी बोध ग्रहण करावा. info
التفاسير: