قۇرئان كەرىم مەنىلىرىنىڭ تەرجىمىسى - مارتىنچە تەرجىمىسى - مۇھەممەد شەپىيئ ئەنسارى

بەت نومۇرى:close

external-link copy
44 : 33

تَحِیَّتُهُمْ یَوْمَ یَلْقَوْنَهٗ سَلٰمٌ ۖۚ— وَّاَعَدَّ لَهُمْ اَجْرًا كَرِیْمًا ۟

४४. ज्या दिवशी हे अल्लाहला भेटतील, त्यांचे स्वागत सलामद्वारे होईल, त्यांच्यासाठी अल्लाहने मान-सन्मानपूर्ण मोबदला तयार करून ठेवला आहे. info
التفاسير:

external-link copy
45 : 33

یٰۤاَیُّهَا النَّبِیُّ اِنَّاۤ اَرْسَلْنٰكَ شَاهِدًا وَّمُبَشِّرًا وَّنَذِیْرًا ۟ۙ

४५. हे पैगंबर! निःसंशय, आम्हीच तुम्हाला (रसूल) साक्षी, खूशखबर देणारा आणि खबरदार करणारा बनवून पाठविले आहे. info
التفاسير:

external-link copy
46 : 33

وَّدَاعِیًا اِلَی اللّٰهِ بِاِذْنِهٖ وَسِرَاجًا مُّنِیْرًا ۟

४६. आणि अल्लाहच्या आदेशाने त्याच्याकडे बोलविणारा आणि उज्ज्वल (प्रकाशमान) दीप बनवून. info
التفاسير:

external-link copy
47 : 33

وَبَشِّرِ الْمُؤْمِنِیْنَ بِاَنَّ لَهُمْ مِّنَ اللّٰهِ فَضْلًا كَبِیْرًا ۟

४७. आणि तुम्ही ईमान राखणाऱ्या लोकांना ही शुभवार्ता ऐकवा की त्यांच्याकरिता अल्लाहकडून फार मोठा अनुग्रह आहे. info
التفاسير:

external-link copy
48 : 33

وَلَا تُطِعِ الْكٰفِرِیْنَ وَالْمُنٰفِقِیْنَ وَدَعْ اَذٰىهُمْ وَتَوَكَّلْ عَلَی اللّٰهِ ؕ— وَكَفٰی بِاللّٰهِ وَكِیْلًا ۟

४८. आणि काफिरांचे व ढोंगी मुसलमानांचे म्हणणे मानू नका, आणि जे दुःख (त्यांच्याकडून) पोहोचेल त्याची चिंता करू नका. अल्लाहवर भरवसा राखा, अल्लाह काम बनविण्यासाठी पुरेसा आहे. info
التفاسير:

external-link copy
49 : 33

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْۤا اِذَا نَكَحْتُمُ الْمُؤْمِنٰتِ ثُمَّ طَلَّقْتُمُوْهُنَّ مِنْ قَبْلِ اَنْ تَمَسُّوْهُنَّ فَمَا لَكُمْ عَلَیْهِنَّ مِنْ عِدَّةٍ تَعْتَدُّوْنَهَا ۚ— فَمَتِّعُوْهُنَّ وَسَرِّحُوْهُنَّ سَرَاحًا جَمِیْلًا ۟

४९. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुम्ही ईमान राखणाऱ्या स्त्रियांशी विवाह कराल, मग त्यांना हात लावण्यापूर्वी तलाक (घटस्फोट) द्याल, तर त्यांच्यावर तुमचा कसलाही (अधिकार) इद्दत (तलाकनंतर निर्धारित वेळेपर्यंतची प्रतिबंधित मुदती) चा नाही, जिची तुम्ही गणना करावी.१ तेव्हा तुम्ही त्यांना काही न काही द्या आणि भल्या रितीने त्यांना निरोप द्या. info

(१) विवाहनंतर ज्या स्त्रियांशी सहवास (समागम) केला गेला असेल आणि त्या अजून तरुण असतील, अशा स्त्रियांना तलाक दिला गेल्यास त्यांची ‘इद्दत’ तीन मासिक पाळी होय. (अल बकरा-२२८) इथे त्या स्त्रियांचा नियम सांगितला जात आहे, ज्यांचा विवाह तर झाला परंतु पती-पत्नीच्या दरम्यान समागम झाला नाही, त्यांना तलाक मिळाल्यास कसलीही इद्दत नाही. अर्थात अशी समागम न झालेली तलाक दिली गेलेली स्त्री इद्दत अवधी पार न पाडता त्वरित कुठे विवाह करू इच्छिल तर करू शकते. परंतु समागमपूर्वच पती मरण पावल्यास तिला चार महिने दहा दिवसांचा इद्दत अवधी पार पाडावा लागेल.

التفاسير:

external-link copy
50 : 33

یٰۤاَیُّهَا النَّبِیُّ اِنَّاۤ اَحْلَلْنَا لَكَ اَزْوَاجَكَ الّٰتِیْۤ اٰتَیْتَ اُجُوْرَهُنَّ وَمَا مَلَكَتْ یَمِیْنُكَ مِمَّاۤ اَفَآءَ اللّٰهُ عَلَیْكَ وَبَنٰتِ عَمِّكَ وَبَنٰتِ عَمّٰتِكَ وَبَنٰتِ خَالِكَ وَبَنٰتِ خٰلٰتِكَ الّٰتِیْ هَاجَرْنَ مَعَكَ ؗ— وَامْرَاَةً مُّؤْمِنَةً اِنْ وَّهَبَتْ نَفْسَهَا لِلنَّبِیِّ اِنْ اَرَادَ النَّبِیُّ اَنْ یَّسْتَنْكِحَهَا ۗ— خَالِصَةً لَّكَ مِنْ دُوْنِ الْمُؤْمِنِیْنَ ؕ— قَدْ عَلِمْنَا مَا فَرَضْنَا عَلَیْهِمْ فِیْۤ اَزْوَاجِهِمْ وَمَا مَلَكَتْ اَیْمَانُهُمْ لِكَیْلَا یَكُوْنَ عَلَیْكَ حَرَجٌ ؕ— وَكَانَ اللّٰهُ غَفُوْرًا رَّحِیْمًا ۟

५०. हे पैगंबर (स.)! आम्ही तुमच्यासाठी तुमच्या त्या पत्न्या हलाल (वैध) केल्या आहेत, ज्यांना तुम्ही त्यांचे महर (स्त्रीधन) देऊन टाकले आहे आणि त्या दासी देखील, ज्यांना अल्लाहने युद्धात तुम्हाला प्रदान केल्या आहेत आणि तुमच्या काकाच्या कन्या, आत्याच्या कन्या, तुमच्या मामाच्या कन्या आणि तुमच्या मावशीच्या कन्या देखील, ज्यांनी तुमच्यासोबत हिजरत (स्वदेशत्याग) केली आहे आणि ती ईमानधारक स्त्री जी स्वतःला पैगंबरांना दान करील, हे त्या स्थितीत की स्वतः जर पैगंबरही तिच्याशी विवाह करू इच्छितील. हे विशेषतः तुमच्यासाठीच आहे आणि इतर ईमानधारकांसाठी नाही. आम्ही त्याला चांगल्या प्रकारे जाणतो जे आम्ही त्यांच्यावर त्यांच्या पत्न्या आणि दासींविषयी (चे आदेश) निर्धारित केले आहेत. हे यासाठी की तुमच्यावर एखादी अडचण उद्‌भवू नये. अल्लाह मोठा माफ करणारा आणि मोठा दया करणारा आहे. info
التفاسير: