قۇرئان كەرىم مەنىلىرىنىڭ تەرجىمىسى - مارتىنچە تەرجىمىسى - مۇھەممەد شەپىيئ ئەنسارى

بەت نومۇرى:close

external-link copy
31 : 33

وَمَنْ یَّقْنُتْ مِنْكُنَّ لِلّٰهِ وَرَسُوْلِهٖ وَتَعْمَلْ صَالِحًا نُّؤْتِهَاۤ اَجْرَهَا مَرَّتَیْنِ ۙ— وَاَعْتَدْنَا لَهَا رِزْقًا كَرِیْمًا ۟

३१. आणि तुमच्यापैकी जो कोणी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचे आज्ञापालन करील आणि सत्कर्म करील तर आम्ही तिला दुप्पट मोबदला प्रदान करू आणि तिच्यासाठी आम्ही अति उत्तम आजिविका तयार करून ठेवली आहे. info
التفاسير:

external-link copy
32 : 33

یٰنِسَآءَ النَّبِیِّ لَسْتُنَّ كَاَحَدٍ مِّنَ النِّسَآءِ اِنِ اتَّقَیْتُنَّ فَلَا تَخْضَعْنَ بِالْقَوْلِ فَیَطْمَعَ الَّذِیْ فِیْ قَلْبِهٖ مَرَضٌ وَّقُلْنَ قَوْلًا مَّعْرُوْفًا ۟ۚ

३२. हे पैगंबरांच्या पत्नींनो! तुम्ही सर्वसाधारण स्त्रियांसारख्या नाहीत. जर तुम्ही अल्लाहचे भय राखणाऱ्या असाल तर कोमल स्वरात बोलत जाऊ नका की (ज्यामुळे) ज्याच्या मनात रोग असेल त्याने एखादा वाईट इरादा करावा, तथापि नियमाला अनुसरून बोलत राहा. info
التفاسير:

external-link copy
33 : 33

وَقَرْنَ فِیْ بُیُوْتِكُنَّ وَلَا تَبَرَّجْنَ تَبَرُّجَ الْجَاهِلِیَّةِ الْاُوْلٰی وَاَقِمْنَ الصَّلٰوةَ وَاٰتِیْنَ الزَّكٰوةَ وَاَطِعْنَ اللّٰهَ وَرَسُوْلَهٗ ؕ— اِنَّمَا یُرِیْدُ اللّٰهُ لِیُذْهِبَ عَنْكُمُ الرِّجْسَ اَهْلَ الْبَیْتِ وَیُطَهِّرَكُمْ تَطْهِیْرًا ۟ۚ

३३. आणि आपल्या घरांमध्ये स्थैर्यपूर्वक राहा, आणि पूर्वीच्या अज्ञानकाळाप्रमाणे आपल्या शृंगारा (सौंदर्या) चे प्रदर्शन करू नका आणि नमाज नियिमतपणे अदा करीत राहा आणि जकात (धर्मदान) देत राहा, आणि अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या आदेशाचे पालन करा. अल्लाह हेच इच्छितो की हे पैगंबरांच्या पत्नींनो! तुमच्यापासून त्याने प्रत्येक (प्रकारची) अपवित्रता दूर करावी, आणि तुम्हाला खूप पवित्र करावे. info
التفاسير:

external-link copy
34 : 33

وَاذْكُرْنَ مَا یُتْلٰی فِیْ بُیُوْتِكُنَّ مِنْ اٰیٰتِ اللّٰهِ وَالْحِكْمَةِ ؕ— اِنَّ اللّٰهَ كَانَ لَطِیْفًا خَبِیْرًا ۟۠

३४. आणि तुमच्या घरांमध्ये अल्लाहच्या ज्या आयती आणि पैगंबरांची वचने (हदीस) वाचली जातात, त्या स्मरणात असू द्या. निःसंशय अल्लाह मोठा सूक्ष्मदर्शी, माहितगार आहे. info
التفاسير:

external-link copy
35 : 33

اِنَّ الْمُسْلِمِیْنَ وَالْمُسْلِمٰتِ وَالْمُؤْمِنِیْنَ وَالْمُؤْمِنٰتِ وَالْقٰنِتِیْنَ وَالْقٰنِتٰتِ وَالصّٰدِقِیْنَ وَالصّٰدِقٰتِ وَالصّٰبِرِیْنَ وَالصّٰبِرٰتِ وَالْخٰشِعِیْنَ وَالْخٰشِعٰتِ وَالْمُتَصَدِّقِیْنَ وَالْمُتَصَدِّقٰتِ وَالصَّآىِٕمِیْنَ وَالصّٰٓىِٕمٰتِ وَالْحٰفِظِیْنَ فُرُوْجَهُمْ وَالْحٰفِظٰتِ وَالذّٰكِرِیْنَ اللّٰهَ كَثِیْرًا وَّالذّٰكِرٰتِ ۙ— اَعَدَّ اللّٰهُ لَهُمْ مَّغْفِرَةً وَّاَجْرًا عَظِیْمًا ۟

३५. निःसंशय, मुस्लिम पुरुष आणि मुस्लिम स्त्रिया, ईमान राखणारे पुरुष आणि ईमान राखणाऱ्या स्त्रिया, आज्ञापालन करणारे पुरुष आणि आज्ञापालन करणाऱ्या स्त्रिया, सत्यवचनी पुरुष आणि सत्यवचनी स्त्रिया, सहनशीलता राखणारे पुरुष आणि सहनशीलता राखणाऱ्या स्त्रिया (अल्लाहला) विनंती करणारे पुरुष आणि विनंती करणाऱ्या स्त्रिया, दान (सदका) करणारे पुरुष आणि दान करणाऱ्या स्त्रिया, रोजा (उपवास-व्रत) करणारे पुरुष आणि रोजा राखणाऱ्या स्त्रिया, आपल्या लज्जास्थाना (गुप्तांगा) चे रक्षण करणारे पुरुष आणि आपल्या लज्जास्थानाचे रक्षण करणाऱ्या स्त्रिया, अल्लाहचे अत्याधिक स्मरण करणारे पुरुष आणि अत्याधिक स्मरण करणाऱ्या स्त्रिया, या सर्वांसाठी अल्लाहने मोठी क्षमा आणि महान मोबदला तयार करून ठेवला आहे. info
التفاسير: