(१) विवाहनंतर ज्या स्त्रियांशी सहवास (समागम) केला गेला असेल आणि त्या अजून तरुण असतील, अशा स्त्रियांना तलाक दिला गेल्यास त्यांची ‘इद्दत’ तीन मासिक पाळी होय. (अल बकरा-२२८) इथे त्या स्त्रियांचा नियम सांगितला जात आहे, ज्यांचा विवाह तर झाला परंतु पती-पत्नीच्या दरम्यान समागम झाला नाही, त्यांना तलाक मिळाल्यास कसलीही इद्दत नाही. अर्थात अशी समागम न झालेली तलाक दिली गेलेली स्त्री इद्दत अवधी पार न पाडता त्वरित कुठे विवाह करू इच्छिल तर करू शकते. परंतु समागमपूर्वच पती मरण पावल्यास तिला चार महिने दहा दिवसांचा इद्दत अवधी पार पाडावा लागेल.