ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

លេខ​ទំព័រ:close

external-link copy
55 : 33

لَا جُنَاحَ عَلَیْهِنَّ فِیْۤ اٰبَآىِٕهِنَّ وَلَاۤ اَبْنَآىِٕهِنَّ وَلَاۤ اِخْوَانِهِنَّ وَلَاۤ اَبْنَآءِ اِخْوَانِهِنَّ وَلَاۤ اَبْنَآءِ اَخَوٰتِهِنَّ وَلَا نِسَآىِٕهِنَّ وَلَا مَا مَلَكَتْ اَیْمَانُهُنَّ ۚ— وَاتَّقِیْنَ اللّٰهَ ؕ— اِنَّ اللّٰهَ كَانَ عَلٰی كُلِّ شَیْءٍ شَهِیْدًا ۟

५५. त्या स्त्रियांवर कसलाही गुन्हा नाही त्या आपल्या पित्यांच्या, आपल्या पुत्रांच्या आणि भावांच्या, आपल्या पुतण्यांच्या, भाच्यांच्या आणि आपल्या (परिचित) स्त्रियांच्या आणि ज्यांच्या त्या मालक आहेत त्यां (दास दासीं) च्या समोर असाव्यात.१ स्त्रियांनो! अल्लाहचे भय बाळगत राहा, अल्लाह निःसंशय, प्रत्येक गोष्टीवर साक्षी आहे. info

(१) जेव्हा स्त्रियांसाठी पडद्याचा आदेश अवतरला तेव्हा घरात उपस्थित जवळचे किंवा नेहमी ये-जा करणाऱ्या नातेवाईकांबाबत विचारले गेले की त्यांच्यासमोर पडदा केला जावा किंवा नाही? या आयतीत त्या नातेवाईकांचे वर्णन आहे, ज्यांच्यासमोर पडदा करण्याची गरज नाही. याचे सविस्तर वर्णन ‘सूरह नूर’च्या आयत क्र. ३१ मध्ये दिले गेले आहे. तेही पाहावे.

التفاسير:

external-link copy
56 : 33

اِنَّ اللّٰهَ وَمَلٰٓىِٕكَتَهٗ یُصَلُّوْنَ عَلَی النَّبِیِّ ؕ— یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْا صَلُّوْا عَلَیْهِ وَسَلِّمُوْا تَسْلِیْمًا ۟

५६. अल्लाह आणि त्याचे फरिश्ते या पैगंबरावर दरुद पाठवितात. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही (देखील) यांच्यावर दरुद पाठवा आणि जास्त सलाम (ही) पाठवत राहा. १ info

(१) या आयतीत पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या उच्च दर्जाविषयीचे वर्णन आहे. जो आकाशांमध्ये त्यांना लाभला आहे आणि तो असा की अल्लाह फरिश्त्यांमध्ये पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची स्तुती आणि महिमा वर्णन करतो आणि त्यांच्यावर शांती पाठवितो आणि फरिश्ते देखील पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याकरिता उच्च स्थानाची दुआ- प्रार्थना करतात. तसेच अल्लाहने धरतीवर राहणाऱ्यांना आदेश दिला की त्यांनीही पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर दरुद व सलाम पाठवावा. यासाठी की पैगंबरांची प्रशंसा आकाश व धरतीतही व्हावी.

التفاسير:

external-link copy
57 : 33

اِنَّ الَّذِیْنَ یُؤْذُوْنَ اللّٰهَ وَرَسُوْلَهٗ لَعَنَهُمُ اللّٰهُ فِی الدُّنْیَا وَالْاٰخِرَةِ وَاَعَدَّ لَهُمْ عَذَابًا مُّهِیْنًا ۟

५७. जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबराला दुःख- त्रास देतात, त्यांच्यावर या जगात व आखिरतमध्ये अल्लाहतर्फे धिःक्कार आहे आणि त्यांच्यासाठी मोठा अपमानित करणारा अज़ाब (शिक्षा-यातना) आहे. info
التفاسير:

external-link copy
58 : 33

وَالَّذِیْنَ یُؤْذُوْنَ الْمُؤْمِنِیْنَ وَالْمُؤْمِنٰتِ بِغَیْرِ مَا اكْتَسَبُوْا فَقَدِ احْتَمَلُوْا بُهْتَانًا وَّاِثْمًا مُّبِیْنًا ۟۠

५८. आणि जे लोक ईमान राखणाऱ्या पुरुष व स्त्रियांना अशा एखाद्या अपराधाबद्दल दुःख - त्रास देतात, जो त्यांच्याकडून घडला नसेल तर ते फार मोठा आरोप आणि खुल्या अपराधाचे ओझे उचलतात. info
التفاسير:

external-link copy
59 : 33

یٰۤاَیُّهَا النَّبِیُّ قُلْ لِّاَزْوَاجِكَ وَبَنٰتِكَ وَنِسَآءِ الْمُؤْمِنِیْنَ یُدْنِیْنَ عَلَیْهِنَّ مِنْ جَلَابِیْبِهِنَّ ؕ— ذٰلِكَ اَدْنٰۤی اَنْ یُّعْرَفْنَ فَلَا یُؤْذَیْنَ ؕ— وَكَانَ اللّٰهُ غَفُوْرًا رَّحِیْمًا ۟

५९. हे पैगंबर! आपल्या पत्नींना आणि आपल्या कन्यांना आणि ईमान राखणाऱ्यांच्या स्त्रियांना सांगा की त्यांनी आपल्या अंगावर आपल्या चादरी टाकून घेत जावे. अशाने त्या त्वरित ओळखल्या जातील, मग त्यांना त्रास पोहचविला जाणार नाही, आणि अल्लाह मोठा माफ करणारा आणि दया करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
60 : 33

لَىِٕنْ لَّمْ یَنْتَهِ الْمُنٰفِقُوْنَ وَالَّذِیْنَ فِیْ قُلُوْبِهِمْ مَّرَضٌ وَّالْمُرْجِفُوْنَ فِی الْمَدِیْنَةِ لَنُغْرِیَنَّكَ بِهِمْ ثُمَّ لَا یُجَاوِرُوْنَكَ فِیْهَاۤ اِلَّا قَلِیْلًا ۟ۚۛ

६०. जर (अजूनही) हे मुनाफिक (ईमानधारक असल्याचे ढोंग करणारे) आणि ते, ज्यांच्या मनात रोग आहे आणि मदीनाचे ते रहिवाशी जे खोट्या अफवा उडवितात, थांबले नाहीत तर आम्ही तुम्हाला त्यांच्या (नाशा) वर लावून देऊ, मग तर ते काही दिवसच तुमच्यासोबत या (शहरा) त राहू शकतील. info
التفاسير:

external-link copy
61 : 33

مَّلْعُوْنِیْنَ ۛۚ— اَیْنَمَا ثُقِفُوْۤا اُخِذُوْا وَقُتِّلُوْا تَقْتِیْلًا ۟

६१. त्यांच्यावर धिःक्काराचा वर्षाव केला गेला, ज्या ज्या ठिकाणी सापडावेत, धरले जावेत आणि खूप तुकडे तुकडे केले जावेत. info
التفاسير:

external-link copy
62 : 33

سُنَّةَ اللّٰهِ فِی الَّذِیْنَ خَلَوْا مِنْ قَبْلُ ۚ— وَلَنْ تَجِدَ لِسُنَّةِ اللّٰهِ تَبْدِیْلًا ۟

६२. त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांसाठीही अल्लाहचा हाच नियम लागू राहिला आणि तुम्हाला अल्लाहच्या विधी-नियमात केव्हाही बदल आढळणार नाही. info
التفاسير: