ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

external-link copy
56 : 33

اِنَّ اللّٰهَ وَمَلٰٓىِٕكَتَهٗ یُصَلُّوْنَ عَلَی النَّبِیِّ ؕ— یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْا صَلُّوْا عَلَیْهِ وَسَلِّمُوْا تَسْلِیْمًا ۟

५६. अल्लाह आणि त्याचे फरिश्ते या पैगंबरावर दरुद पाठवितात. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही (देखील) यांच्यावर दरुद पाठवा आणि जास्त सलाम (ही) पाठवत राहा. १ info

(१) या आयतीत पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या उच्च दर्जाविषयीचे वर्णन आहे. जो आकाशांमध्ये त्यांना लाभला आहे आणि तो असा की अल्लाह फरिश्त्यांमध्ये पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची स्तुती आणि महिमा वर्णन करतो आणि त्यांच्यावर शांती पाठवितो आणि फरिश्ते देखील पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याकरिता उच्च स्थानाची दुआ- प्रार्थना करतात. तसेच अल्लाहने धरतीवर राहणाऱ्यांना आदेश दिला की त्यांनीही पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर दरुद व सलाम पाठवावा. यासाठी की पैगंबरांची प्रशंसा आकाश व धरतीतही व्हावी.

التفاسير: