(१) जेव्हा स्त्रियांसाठी पडद्याचा आदेश अवतरला तेव्हा घरात उपस्थित जवळचे किंवा नेहमी ये-जा करणाऱ्या नातेवाईकांबाबत विचारले गेले की त्यांच्यासमोर पडदा केला जावा किंवा नाही? या आयतीत त्या नातेवाईकांचे वर्णन आहे, ज्यांच्यासमोर पडदा करण्याची गरज नाही. याचे सविस्तर वर्णन ‘सूरह नूर’च्या आयत क्र. ३१ मध्ये दिले गेले आहे. तेही पाहावे.
(१) या आयतीत पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या उच्च दर्जाविषयीचे वर्णन आहे. जो आकाशांमध्ये त्यांना लाभला आहे आणि तो असा की अल्लाह फरिश्त्यांमध्ये पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची स्तुती आणि महिमा वर्णन करतो आणि त्यांच्यावर शांती पाठवितो आणि फरिश्ते देखील पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याकरिता उच्च स्थानाची दुआ- प्रार्थना करतात. तसेच अल्लाहने धरतीवर राहणाऱ्यांना आदेश दिला की त्यांनीही पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर दरुद व सलाम पाठवावा. यासाठी की पैगंबरांची प्रशंसा आकाश व धरतीतही व्हावी.