แปล​ความหมาย​อัลกุรอาน​ - คำแปลภาษามราฐี - มุฮัมมัด ชะฟีอ์ อันศอรีย์

หมายเลข​หน้า​:close

external-link copy
257 : 2

اَللّٰهُ وَلِیُّ الَّذِیْنَ اٰمَنُوْا یُخْرِجُهُمْ مِّنَ الظُّلُمٰتِ اِلَی النُّوْرِ ؕ۬— وَالَّذِیْنَ كَفَرُوْۤا اَوْلِیٰٓـُٔهُمُ الطَّاغُوْتُ یُخْرِجُوْنَهُمْ مِّنَ النُّوْرِ اِلَی الظُّلُمٰتِ ؕ— اُولٰٓىِٕكَ اَصْحٰبُ النَّارِ ۚ— هُمْ فِیْهَا خٰلِدُوْنَ ۟۠

२५७. अल्लाह स्वतः ईमानधारकांचा संरक्षक (वली) आहे. तो त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो आणि काफिरांचे (इन्कारी लोकांचे) मित्र तर सैतान आहेत. ते त्यांना प्रकाशाकडून अंधाराकडे नेतात. हे लोक जहन्नमी आहेत, जे नेहमी त्यातच पडून राहतील. info
التفاسير:

external-link copy
258 : 2

اَلَمْ تَرَ اِلَی الَّذِیْ حَآجَّ اِبْرٰهٖمَ فِیْ رَبِّهٖۤ اَنْ اٰتٰىهُ اللّٰهُ الْمُلْكَ ۘ— اِذْ قَالَ اِبْرٰهٖمُ رَبِّیَ الَّذِیْ یُحْیٖ وَیُمِیْتُ ۙ— قَالَ اَنَا اُحْیٖ وَاُمِیْتُ ؕ— قَالَ اِبْرٰهٖمُ فَاِنَّ اللّٰهَ یَاْتِیْ بِالشَّمْسِ مِنَ الْمَشْرِقِ فَاْتِ بِهَا مِنَ الْمَغْرِبِ فَبُهِتَ الَّذِیْ كَفَرَ ؕ— وَاللّٰهُ لَا یَهْدِی الْقَوْمَ الظّٰلِمِیْنَ ۟ۚ

२५८. काय तुम्ही त्याला नाही पाहिले, ज्याने राज्य-सत्ता प्राप्त करून इब्राहीमशी, त्याच्या पालनकर्त्याबाबत भांडण केले. जेव्हा इब्राहीम म्हणाले की, माझा रब (पालनकर्ता) तर तो आहे जो जिवंत करतो आणि मारतो. तो म्हणू लागला, मीदेखील जिवंत करतो आणि मारतो. इब्राहीम म्हणाले, अल्लाह तर सूर्याला पूर्व दिशेकडून उगवतो तू त्याला पश्चिमेकडून उगव. आता मात्र तो काफिर निरुत्तर आणि थक्क झाला आणि अल्लाह अत्याचारी लोकांना सन्मार्ग दाखवित नाही. info
التفاسير:

external-link copy
259 : 2

اَوْ كَالَّذِیْ مَرَّ عَلٰی قَرْیَةٍ وَّهِیَ خَاوِیَةٌ عَلٰی عُرُوْشِهَا ۚ— قَالَ اَنّٰی یُحْیٖ هٰذِهِ اللّٰهُ بَعْدَ مَوْتِهَا ۚ— فَاَمَاتَهُ اللّٰهُ مِائَةَ عَامٍ ثُمَّ بَعَثَهٗ ؕ— قَالَ كَمْ لَبِثْتَ ؕ— قَالَ لَبِثْتُ یَوْمًا اَوْ بَعْضَ یَوْمٍ ؕ— قَالَ بَلْ لَّبِثْتَ مِائَةَ عَامٍ فَانْظُرْ اِلٰی طَعَامِكَ وَشَرَابِكَ لَمْ یَتَسَنَّهْ ۚ— وَانْظُرْ اِلٰی حِمَارِكَ۫— وَلِنَجْعَلَكَ اٰیَةً لِّلنَّاسِ وَانْظُرْ اِلَی الْعِظَامِ كَیْفَ نُنْشِزُهَا ثُمَّ نَكْسُوْهَا لَحْمًا ؕ— فَلَمَّا تَبَیَّنَ لَهٗ ۙ— قَالَ اَعْلَمُ اَنَّ اللّٰهَ عَلٰی كُلِّ شَیْءٍ قَدِیْرٌ ۟

२५९. किंवा त्या माणसासारखे, ज्याचे जाणे एका वस्तीवरून झाले, जी आपल्या छतासमेत पालथी पडली होती. तो म्हणू लागला, त्याच्या मृत्युनंतर अल्लाह त्याला कशा प्रकारे जिवंत करील, तेव्हा अल्लाहने त्याला शंभर वर्षांकरिता मृत्यु दिला. मग नंतर त्याला (जिवंत करून) उठविले. अल्लाहने विचारले, ‘‘किती काळ तू मेलेल्या अवस्थेत होतास?’’ त्याने उत्तर दिले की एक दिवस किंवा दिवसाचा काही हिस्सा. अल्लाहने फमार्विले, ‘‘किंबहुना तू शंभर वर्षांपर्यंत (मृतावस्थेत) राहिला, मग आता तू आपल्या खाण्या-पिण्याच्या वस्तूंकडे पाहा की त्या मुळीच खराब झाल्या नाहीत आणि आपल्या गाढवाकडेही पाहा. आम्ही तुला लोकांकरिता निशाणी बनवितो. तू पाहा की आम्ही कशा प्रकारे हाडे उभी करतो, मग त्यांवर मांस चढवितो.’’ जेव्हा त्याला हे सर्व स्पष्ट करून आले, तेव्हा तो म्हणू लागला, मी चांगले जाणून घेतले की सर्वश्रेष्ठ अल्लाह सर्व काही जाणणारा आहे. info
التفاسير: