แปล​ความหมาย​อัลกุรอาน​ - คำแปลภาษามราฐี - มุฮัมมัด ชะฟีอ์ อันศอรีย์

หมายเลข​หน้า​:close

external-link copy
94 : 2

قُلْ اِنْ كَانَتْ لَكُمُ الدَّارُ الْاٰخِرَةُ عِنْدَ اللّٰهِ خَالِصَةً مِّنْ دُوْنِ النَّاسِ فَتَمَنَّوُا الْمَوْتَ اِنْ كُنْتُمْ صٰدِقِیْنَ ۟

९४. (तुम्ही त्यांना) सांगा की जर अल्लाहजवळ आखिरतचे घर तुमच्यासाठीच आहे, अन्य कोणासाठी नाही तर या, आपली सत्यता सिद्ध करण्यासाठी मृत्युची याचना करा. info
التفاسير:

external-link copy
95 : 2

وَلَنْ یَّتَمَنَّوْهُ اَبَدًا بِمَا قَدَّمَتْ اَیْدِیْهِمْ ؕ— وَاللّٰهُ عَلِیْمٌۢ بِالظّٰلِمِیْنَ ۟

९५. परंतु आपल्या कर्मांचा विचार करता, ते कधीही मृत्युची याचना करणार नाहीत आणि अल्लाह अत्याचारी लोकांना चांगल्या प्रकारे ओळखतो. info
التفاسير:

external-link copy
96 : 2

وَلَتَجِدَنَّهُمْ اَحْرَصَ النَّاسِ عَلٰی حَیٰوةٍ ۛۚ— وَمِنَ الَّذِیْنَ اَشْرَكُوْا ۛۚ— یَوَدُّ اَحَدُهُمْ لَوْ یُعَمَّرُ اَلْفَ سَنَةٍ ۚ— وَمَا هُوَ بِمُزَحْزِحِهٖ مِنَ الْعَذَابِ اَنْ یُّعَمَّرَ ؕ— وَاللّٰهُ بَصِیْرٌ بِمَا یَعْمَلُوْنَ ۟۠

९६. किंबहुना (हे पैगंबर!) ऐहिक जीवनाची सर्वांत जास्त आसक्ती राखणारे तुम्हाला तेच आढळून येतील. जीवनाचा लोभ राखण्यात हे मूर्तीपूजकांपेक्षाही जास्तच आहेत. त्यांच्यापैकी प्रत्येकजण हजार वर्षांचे आयुष्य इच्छितो. वास्तविक हे दीर्घायुष्य दिले जाणेही त्यांना अज़ाब (शिक्षा-यातनां) पासून वाचवू शकत नाही. अल्लाह त्यांचे कर्म चांगल्या प्रकारे पाहत आहे. info
التفاسير:

external-link copy
97 : 2

قُلْ مَنْ كَانَ عَدُوًّا لِّجِبْرِیْلَ فَاِنَّهٗ نَزَّلَهٗ عَلٰی قَلْبِكَ بِاِذْنِ اللّٰهِ مُصَدِّقًا لِّمَا بَیْنَ یَدَیْهِ وَهُدًی وَّبُشْرٰی لِلْمُؤْمِنِیْنَ ۟

९७. (हे पैगंबर!) तुम्ही सांगा की जो जिब्रीलचा शत्रू असेल, ज्याने तुमच्या हृदयावर अल्लाहचा संदेश उतरविला आहे, जो संदेश त्याच्या जवळच्या ग्रंथाची सत्यता सिद्ध करणारा आणि ईमानधारकांना मार्गदर्शन आणि शुभ-समाचार देणारा आहे (तर अल्लाहदेखील त्यांचा शत्रू आहे). info
التفاسير:

external-link copy
98 : 2

مَنْ كَانَ عَدُوًّا لِّلّٰهِ وَمَلٰٓىِٕكَتِهٖ وَرُسُلِهٖ وَجِبْرِیْلَ وَمِیْكٰىلَ فَاِنَّ اللّٰهَ عَدُوٌّ لِّلْكٰفِرِیْنَ ۟

९८. जो मनुष्य अल्लाहचा आणि त्याच्या फरिश्त्यांचा आणि त्याच्या पैगंबरांचा व जिब्रील आणि मिकाईलचा शत्रू असेल तर अशा अधर्मी लोकांचा शत्रू स्वतः अल्लाह आहे. info
التفاسير:

external-link copy
99 : 2

وَلَقَدْ اَنْزَلْنَاۤ اِلَیْكَ اٰیٰتٍۢ بَیِّنٰتٍ ۚ— وَمَا یَكْفُرُ بِهَاۤ اِلَّا الْفٰسِقُوْنَ ۟

९९. आणि निःसंशय, आम्ही तुमच्याकडे स्पष्ट निशाण्या पाठविल्या आहेत. ज्यांचा इन्कार, दुराचारी लोकांशिवाय अन्य कोणी करत नाही. info
التفاسير:

external-link copy
100 : 2

اَوَكُلَّمَا عٰهَدُوْا عَهْدًا نَّبَذَهٗ فَرِیْقٌ مِّنْهُمْ ؕ— بَلْ اَكْثَرُهُمْ لَا یُؤْمِنُوْنَ ۟

१००. हे लोक, जेव्हा जेव्हा एखादा वचन-करार करतात, तेव्हा त्यांच्यातला एक न एक गट त्याचा भंग करतो. किंबहुना त्यांच्यापैकी अधिकांश लोक बेईमान (ईमान नसलेले) आहेत. info
التفاسير:

external-link copy
101 : 2

وَلَمَّا جَآءَهُمْ رَسُوْلٌ مِّنْ عِنْدِ اللّٰهِ مُصَدِّقٌ لِّمَا مَعَهُمْ نَبَذَ فَرِیْقٌ مِّنَ الَّذِیْنَ اُوْتُوا الْكِتٰبَ ۙۗ— كِتٰبَ اللّٰهِ وَرَآءَ ظُهُوْرِهِمْ كَاَنَّهُمْ لَا یَعْلَمُوْنَ ۟ؗ

१०१. आणि जेव्हादेखील त्यांच्याजवळ अल्लाहचा एखादा रसूल (पैगंबर) त्यांच्या ग्रंथाची पुष्टी करण्यास आला, तेव्हा त्या ग्रंथधारकांच्या एका गटाने अल्लाहच्या ग्रंथाला अशा प्रकारे पाठीमागे टाकले, जणू जाणत नव्हते. info
التفاسير: