Përkthimi i kuptimeve të Kuranit Fisnik - Përkthimi maratisht - Muhammed Shafi Ansari

Numri i faqes:close

external-link copy
102 : 6

ذٰلِكُمُ اللّٰهُ رَبُّكُمْ ۚ— لَاۤ اِلٰهَ اِلَّا هُوَ ۚ— خَالِقُ كُلِّ شَیْءٍ فَاعْبُدُوْهُ ۚ— وَهُوَ عَلٰی كُلِّ شَیْءٍ وَّكِیْلٌ ۟

१०२. तोच अल्लाह तुमचा पालनकर्ता आहे, त्याच्याखेरीज कोणीही उपास्य (माबूद) नाही, प्रत्येक चीज-वस्तूचा रचयिता, यास्तव फक्त त्याचीच उपासना करा आणि तो प्रत्येक गोष्टीची देखभाल ठेवणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
103 : 6

لَا تُدْرِكُهُ الْاَبْصَارُ ؗ— وَهُوَ یُدْرِكُ الْاَبْصَارَ ۚ— وَهُوَ اللَّطِیْفُ الْخَبِیْرُ ۟

१०३. डोळे त्याला पाहू शकत नाहीत आणि तो सर्व नजरा पाहतो आणि तो अतिसूक्ष्मदर्शी, भेद जाणणारा खबर राखणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
104 : 6

قَدْ جَآءَكُمْ بَصَآىِٕرُ مِنْ رَّبِّكُمْ ۚ— فَمَنْ اَبْصَرَ فَلِنَفْسِهٖ ۚ— وَمَنْ عَمِیَ فَعَلَیْهَا ؕ— وَمَاۤ اَنَا عَلَیْكُمْ بِحَفِیْظٍ ۟

१०४. तुमच्या पालनकर्त्यातर्फे तुमच्याजवळ प्रमाण घेऊन पोहोचले आहे तेव्हा जो पाहील, आपल्या भल्याकरिता (पाहील) आणि जो आंधळा बनून राहील, तो आपले अहित ( नुकसान) करून घेईल आणि मी तुमचा रक्षक नाही. info
التفاسير:

external-link copy
105 : 6

وَكَذٰلِكَ نُصَرِّفُ الْاٰیٰتِ وَلِیَقُوْلُوْا دَرَسْتَ وَلِنُبَیِّنَهٗ لِقَوْمٍ یَّعْلَمُوْنَ ۟

१०५. अशा प्रकारे आम्ही (पवित्र कुरआनाच्या) आयतींना पुन्हा पुन्हा सांगात आहोत, यासाठी की त्यांनी सांगावे की तुम्ही वाचून ऐकविले त्या लोकांकरिता जे जाणतात आम्ही ते चांगल्या प्रकारे स्पष्ट करून सांगावे. info
التفاسير:

external-link copy
106 : 6

اِتَّبِعْ مَاۤ اُوْحِیَ اِلَیْكَ مِنْ رَّبِّكَ ۚ— لَاۤ اِلٰهَ اِلَّا هُوَ ۚ— وَاَعْرِضْ عَنِ الْمُشْرِكِیْنَ ۟

१०६. तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या आदेशा (वहयी) चे अनुसरण करा की अल्लाहशिवाय कोणीही उपास्य (माबूद) नाही आणि अनेकेश्वरवाद्यांपासून विमुख व्हा. info
التفاسير:

external-link copy
107 : 6

وَلَوْ شَآءَ اللّٰهُ مَاۤ اَشْرَكُوْا ؕ— وَمَا جَعَلْنٰكَ عَلَیْهِمْ حَفِیْظًا ۚ— وَمَاۤ اَنْتَ عَلَیْهِمْ بِوَكِیْلٍ ۟

१०७. आणि अल्लाहने इच्छिले असते तर यांनी इतरांना अल्लाहचे सहभागी ठरविले नसते आणि आम्ही तुम्हाला या लोकांवर देखरेख ठेवणारा बनविले नाही, आणि ना तुम्ही त्यांच्यावर अधिकार राखणारे आहात. info
التفاسير:

external-link copy
108 : 6

وَلَا تَسُبُّوا الَّذِیْنَ یَدْعُوْنَ مِنْ دُوْنِ اللّٰهِ فَیَسُبُّوا اللّٰهَ عَدْوًا بِغَیْرِ عِلْمٍ ؕ— كَذٰلِكَ زَیَّنَّا لِكُلِّ اُمَّةٍ عَمَلَهُمْ ۪— ثُمَّ اِلٰی رَبِّهِمْ مَّرْجِعُهُمْ فَیُنَبِّئُهُمْ بِمَا كَانُوْا یَعْمَلُوْنَ ۟

१०८. आणि जे लोक अल्लाहशिवाय दुसऱ्यांना पुकारतात त्यांना अपशब्द वापरू नका, अन्यथा शत्रू बनून अजाणतेपणी तेदेखील अल्लाहसाठी अपशब्द वापरतील. अशा प्रकारे आम्ही प्रत्येक जनसमूहासाठी त्यांचे कर्म सुशोभित बनविले आहे, मग त्यांना आपल्या पालनकर्त्याकडेच परतायचे आहे. यास्तव तो त्यांना त्याबाबत सूचित करील जे काही ते करीत राहिले. info
التفاسير:

external-link copy
109 : 6

وَاَقْسَمُوْا بِاللّٰهِ جَهْدَ اَیْمَانِهِمْ لَىِٕنْ جَآءَتْهُمْ اٰیَةٌ لَّیُؤْمِنُنَّ بِهَا ؕ— قُلْ اِنَّمَا الْاٰیٰتُ عِنْدَ اللّٰهِ وَمَا یُشْعِرُكُمْ ۙ— اَنَّهَاۤ اِذَا جَآءَتْ لَا یُؤْمِنُوْنَ ۟

१०९. आणि त्यांनी जोरदारपणे अल्लाहची शपथ घेतली की त्यांच्याजवळ एखादी निशाणी आली तर खात्रीने मानतील. तुम्ही सांगा की निशाण्या अल्लाहजवळ आहेत आणि तुम्हाला काय माहीत की त्या निशाण्या येऊन पोहचतील, तरीही ते मानणार नाहीत. info
التفاسير:

external-link copy
110 : 6

وَنُقَلِّبُ اَفْـِٕدَتَهُمْ وَاَبْصَارَهُمْ كَمَا لَمْ یُؤْمِنُوْا بِهٖۤ اَوَّلَ مَرَّةٍ وَّنَذَرُهُمْ فِیْ طُغْیَانِهِمْ یَعْمَهُوْنَ ۟۠

११०. आणि आम्ही त्यांची मने व डोळे फिरवून टाकू जसे त्यांनी पूर्वी यावर ईमान राखले नाही आणि त्यांना त्यांच्या विद्रोहा (च्या अंधारा) त असेच भटकत ठेवू. info
التفاسير: