Përkthimi i kuptimeve të Kuranit Fisnik - Përkthimi maratisht - Muhammed Shafi Ansari

Numri i faqes: 144:128 close

external-link copy
131 : 6

ذٰلِكَ اَنْ لَّمْ یَكُنْ رَّبُّكَ مُهْلِكَ الْقُرٰی بِظُلْمٍ وَّاَهْلُهَا غٰفِلُوْنَ ۟

१३१. (पैगंबर पाठविले गेले) कारण तुमचा पालनकर्ता एखाद्या वस्तीच्या लोकांना एखाद्या अत्याचारापायी नष्ट करीत नाही, जेव्हा तेथील रहिवाशी गाफील असावेत. info
التفاسير:

external-link copy
132 : 6

وَلِكُلٍّ دَرَجٰتٌ مِّمَّا عَمِلُوْا ؕ— وَمَا رَبُّكَ بِغَافِلٍ عَمَّا یَعْمَلُوْنَ ۟

१३२. आणि प्रत्येकासाठी त्याच्या कर्मानुसार अनेक दर्जे आहेत आणि तुमचा पालनकर्ता या कर्मांशी गाफील नाही जी ते करीत आहेत. info
التفاسير:

external-link copy
133 : 6

وَرَبُّكَ الْغَنِیُّ ذُو الرَّحْمَةِ ؕ— اِنْ یَّشَاْ یُذْهِبْكُمْ وَیَسْتَخْلِفْ مِنْ بَعْدِكُمْ مَّا یَشَآءُ كَمَاۤ اَنْشَاَكُمْ مِّنْ ذُرِّیَّةِ قَوْمٍ اٰخَرِیْنَ ۟ؕ

१३३. आणि तुमचा पालनकर्ता निःस्पृह दया करणारा आहे. जर त्याने इच्छिले तर तुमचा सर्वनाश करून टाकील आणि तुमच्यानंतर ज्याला इच्छिल तुमच्या जागी आणून ठेवील, जसे तुम्हाला अन्य एका जनसमूहाच्या वंशात निर्माण केले. info
التفاسير:

external-link copy
134 : 6

اِنَّ مَا تُوْعَدُوْنَ لَاٰتٍ ۙ— وَّمَاۤ اَنْتُمْ بِمُعْجِزِیْنَ ۟

१३४. ज्या गोष्टीचा तुम्हाला वायदा दिला जात आहे, ती निःसंशय घडून येणार आहे आणि तुम्ही विवश करू शकत नाही. info
التفاسير:

external-link copy
135 : 6

قُلْ یٰقَوْمِ اعْمَلُوْا عَلٰی مَكَانَتِكُمْ اِنِّیْ عَامِلٌ ۚ— فَسَوْفَ تَعْلَمُوْنَ ۙ— مَنْ تَكُوْنُ لَهٗ عَاقِبَةُ الدَّارِ ؕ— اِنَّهٗ لَا یُفْلِحُ الظّٰلِمُوْنَ ۟

१३५. तुम्ही सांगा, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! तुम्ही आपल्या ठिकाणी आपले कर्म करीत राहा, मीदेखील (आपल्या जागी) कर्म करीत आहे. तुम्हाला लवकरच माहीत पडेल की कोणाचा शेवट या जगानंतर (चांगला) होतो. निःसंशय अत्याचार करणारे कधीही सफल होणार नाहीत. info
التفاسير:

external-link copy
136 : 6

وَجَعَلُوْا لِلّٰهِ مِمَّا ذَرَاَ مِنَ الْحَرْثِ وَالْاَنْعَامِ نَصِیْبًا فَقَالُوْا هٰذَا لِلّٰهِ بِزَعْمِهِمْ وَهٰذَا لِشُرَكَآىِٕنَا ۚ— فَمَا كَانَ لِشُرَكَآىِٕهِمْ فَلَا یَصِلُ اِلَی اللّٰهِ ۚ— وَمَا كَانَ لِلّٰهِ فَهُوَ یَصِلُ اِلٰی شُرَكَآىِٕهِمْ ؕ— سَآءَ مَا یَحْكُمُوْنَ ۟

१३६. आणि अल्लाहने जी शेती आणि जनावरे निर्माण केलीत, त्यांनी त्यांच्यातून काही भाग अल्लाहचा ठरविला आणि आपल्या कल्पनेनुसार म्हणाले की हा हिस्सा अल्लाहचा आहे, आणि हा आमच्या उपास्य-देवतांचा, मग जो आमच्या दैवतांचा (हिस्सा) आहे, तो अल्लाहपर्यंत पोहचत नाही, मात्र जो अल्लाहचा आहे तो त्यांच्या दैवतांपर्यंत पोहोचतो. किती वाईट फैसला ते करतात! info
التفاسير:

external-link copy
137 : 6

وَكَذٰلِكَ زَیَّنَ لِكَثِیْرٍ مِّنَ الْمُشْرِكِیْنَ قَتْلَ اَوْلَادِهِمْ شُرَكَآؤُهُمْ لِیُرْدُوْهُمْ وَلِیَلْبِسُوْا عَلَیْهِمْ دِیْنَهُمْ ؕ— وَلَوْ شَآءَ اللّٰهُ مَا فَعَلُوْهُ فَذَرْهُمْ وَمَا یَفْتَرُوْنَ ۟

१३७. आणि अशा प्रकारे बहुतेक अनेकेश्वरवाद्यांकरिता त्यांच्या दैवतांनी त्यांना बरबाद करण्यासाठी आणि त्यांच्यावर त्यांचा धर्म संशयास्पद बनविण्यासाठी, त्यांच्या संततीच्या हत्येला सुशोभित बनविले आहे आणि अल्लाहने इच्छिले असते तर त्यांनी असे केले नसते तेव्हा तुम्ही त्यांना आणि त्यांच्या मनाने रचलेल्या गोष्टीला सोडून द्या. info
التفاسير: