(१) अर्थात हा विचार की केवळ तोंडी बोलून ईमान राखल्यानंतर, कसोटी न घेताच सोडले जाईल, उचित नाही, किंबहुना त्यांना प्राण वित्ताची हानी आणि इतर कसोट्यांद्वारे पारखले जाईल, यासाठी की खऱ्या खोट्याची, सत्य असत्याची सच्चा ईमानधारकाची व दांभिक ईमान दर्शविणाऱ्याची माहिती व्हावी.
(१) याचा अर्थ तोच आहे जो ‘मन् अमि-ल सालिहन् फ़लिनफ़सिही’ (सूरह जासिया - १५) चा आहे. म्हणजे जो सत्कर्म करील, त्याचा फायदा त्यालाच मिळेल अन्यथा अल्लाहला माणसांच्या कर्माची काहीच आवश्यकता नाही. साऱ्या जगाचे लोक जरी अल्लाहचे भय बाळगणारे होतील, तरी त्याच्या राज्यात कसलीही वाढहोणार नाही आणि सर्वच्या सर्व त्याची अवज्ञा करणारे झाले तरीही त्याच्या राज्यात कणभर कमी होणार नाही. शब्दांच्या आधारे यात काफिरांशी जिहाद (धर्मयुद्ध) करण्याचाही आदेश आहे की ते सुद्धा एक प्रकारचे सत्कर्म होय.