Terjemahan makna Alquran Alkarim - Terjemahan Berbahasa Marathi - Muhammad Syafi' Ansari

Al-'Ankabūt

external-link copy
1 : 29

الٓمّٓ ۟ۚ

१. अलिफ - लाम - मीम. info
التفاسير:

external-link copy
2 : 29

اَحَسِبَ النَّاسُ اَنْ یُّتْرَكُوْۤا اَنْ یَّقُوْلُوْۤا اٰمَنَّا وَهُمْ لَا یُفْتَنُوْنَ ۟

२. काय लोकांनी असे समजून घेतले आहे की त्यांच्या केवळ या बोलण्यावर की आम्ही ईमान राखले आहे, त्यांना परीक्षा घेतल्याविना असेच सोडून दिले जाईल?१ info

(१) अर्थात हा विचार की केवळ तोंडी बोलून ईमान राखल्यानंतर, कसोटी न घेताच सोडले जाईल, उचित नाही, किंबहुना त्यांना प्राण वित्ताची हानी आणि इतर कसोट्यांद्वारे पारखले जाईल, यासाठी की खऱ्या खोट्याची, सत्य असत्याची सच्चा ईमानधारकाची व दांभिक ईमान दर्शविणाऱ्याची माहिती व्हावी.

التفاسير:

external-link copy
3 : 29

وَلَقَدْ فَتَنَّا الَّذِیْنَ مِنْ قَبْلِهِمْ فَلَیَعْلَمَنَّ اللّٰهُ الَّذِیْنَ صَدَقُوْا وَلَیَعْلَمَنَّ الْكٰذِبِیْنَ ۟

३. त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांचीही आम्ही चांगल्या प्रकारे कसोटी घेतली. निःसंशय, अल्लाह त्यांनाही जाणून घेईल, जे खरे बोलतात, आणि त्यांनाही जाणून घेईल जे खोटारडे आहेत. info
التفاسير:

external-link copy
4 : 29

اَمْ حَسِبَ الَّذِیْنَ یَعْمَلُوْنَ السَّیِّاٰتِ اَنْ یَّسْبِقُوْنَا ؕ— سَآءَ مَا یَحْكُمُوْنَ ۟

४. काय जे लोक दुष्कर्म करीत आहेत, त्यांनी असे समजून घेतले आहेत की ते आमच्या काबूतून बाहेर जातील? कसा वाईट विचार हे लोक करीत आहेत! info
التفاسير:

external-link copy
5 : 29

مَنْ كَانَ یَرْجُوْا لِقَآءَ اللّٰهِ فَاِنَّ اَجَلَ اللّٰهِ لَاٰتٍ ؕ— وَهُوَ السَّمِیْعُ الْعَلِیْمُ ۟

५. ज्याला अल्लाहच्या भेटीची अपेक्षा असेल, तर अल्लाहची निर्धारित केलेली वेळ निश्चितच येणार आहे. तो सर्व काही ऐकणारा, सर्व काही जाणणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
6 : 29

وَمَنْ جٰهَدَ فَاِنَّمَا یُجَاهِدُ لِنَفْسِهٖ ؕ— اِنَّ اللّٰهَ لَغَنِیٌّ عَنِ الْعٰلَمِیْنَ ۟

६. आणि प्रत्येक प्रयत्न करणारा आपल्या स्वतःच्याच भल्याकरिता प्रयत्न करतो. निःसंशय अल्लाह समस्त जगवाल्यांपासून निःस्पृह आहे. १ info

(१) याचा अर्थ तोच आहे जो ‘मन्‌ अमि-ल सालिहन्‌ फ़लिनफ़सिही’ (सूरह जासिया - १५) चा आहे. म्हणजे जो सत्कर्म करील, त्याचा फायदा त्यालाच मिळेल अन्यथा अल्लाहला माणसांच्या कर्माची काहीच आवश्यकता नाही. साऱ्या जगाचे लोक जरी अल्लाहचे भय बाळगणारे होतील, तरी त्याच्या राज्यात कसलीही वाढहोणार नाही आणि सर्वच्या सर्व त्याची अवज्ञा करणारे झाले तरीही त्याच्या राज्यात कणभर कमी होणार नाही. शब्दांच्या आधारे यात काफिरांशी जिहाद (धर्मयुद्ध) करण्याचाही आदेश आहे की ते सुद्धा एक प्रकारचे सत्कर्म होय.

التفاسير: