४. तोच आहे ज्याने आकाशांना व जमिनीला सहा दिवसांत निर्माण केले, मग अर्श (सिंहासना) वर उंचावला तो चांगल्या प्रकारे जाणतो त्या गोष्टीला, जी जमिनीत जाते आणि जी तिच्यातून निघते, आणि जी आकाशातून खाली येते आणि जी चढून आकाशात जाते आणि तुम्ही कोठेही ्सा, तो तुमच्यासोबत आहे आणि तुम्ही जे काही करीत आहात, अल्लाह ते पाहात आहे.
७. अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरावर ईमान राखा आणि धनातून खर्च करा ज्यात अल्लाहने तुम्हाला (इतरांचा) वारस बनविले आहे तेव्हा तुमच्यापैकी जो कोणी ईमान राखेल आणि खर्च करेल तर अशांना फार मोठे पुण्य लाभेल.
८. तुम्ही अल्लाहवर ईमान का नाही राखत? वास्तविक पैगंबर स्वतः तुम्हाला आपल्या पालनकर्त्यावर ईमान राखण्याचे आवाहन करीत आहे आणि जर तुम्ही ईमान राखणारे असाल तर त्याने तुमच्याकडून दृढवचन घेतले आहे.
९. तो (अल्लाह) च आहे, जो आपल्या दासावर स्पष्ट आयती अवतरित करतो, यासाठी की त्याने तुम्हाला अंधाराकडून उजेडाकडे न्यावे. निःसंशय अल्लाह तुमच्यावर स्नेह, दया करणारा आहे.
१०. आणि तुम्हाला झाले तरी काय की तुम्ही अल्लाहच्या मार्गात खर्च नाही करीत? वास्तविक आकाशांच्या आणि धरतीच्या समस्त वस्तूंचा स्वामी (एकटा) अल्लाहच आहे. तुमच्यापैकी ज्या लोकांनी विजयापूर्वी अल्लाहच्या मार्गात दिले आहे आणि धर्मयुद्ध (जिहाद) केले आहे ते दुसऱ्यांच्या समान नाहीत किंबहुना त्यांच्यापेक्षा उच्च पदाचे आहेत, ज्यांनी विजय प्राप्तीनंतर दान दिले आणि जिहाद केले. होय भलाईचा वायदा तर अल्लाहचा त्या सर्वांशी आहे आणि जे काही तुम्ही करीत आहात, अल्लाह ते जाणतो.