قرآن کریم کے معانی کا ترجمہ - مراٹھی ترجمہ - محمد شفیع انصاری

صفحہ نمبر:close

external-link copy
4 : 57

هُوَ الَّذِیْ خَلَقَ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضَ فِیْ سِتَّةِ اَیَّامٍ ثُمَّ اسْتَوٰی عَلَی الْعَرْشِ ؕ— یَعْلَمُ مَا یَلِجُ فِی الْاَرْضِ وَمَا یَخْرُجُ مِنْهَا وَمَا یَنْزِلُ مِنَ السَّمَآءِ وَمَا یَعْرُجُ فِیْهَا ؕ— وَهُوَ مَعَكُمْ اَیْنَ مَا كُنْتُمْ ؕ— وَاللّٰهُ بِمَا تَعْمَلُوْنَ بَصِیْرٌ ۟

४. तोच आहे ज्याने आकाशांना व जमिनीला सहा दिवसांत निर्माण केले, मग अर्श (सिंहासना) वर उंचावला तो चांगल्या प्रकारे जाणतो त्या गोष्टीला, जी जमिनीत जाते आणि जी तिच्यातून निघते, आणि जी आकाशातून खाली येते आणि जी चढून आकाशात जाते आणि तुम्ही कोठेही ्‌सा, तो तुमच्यासोबत आहे आणि तुम्ही जे काही करीत आहात, अल्लाह ते पाहात आहे. info
التفاسير:

external-link copy
5 : 57

لَهٗ مُلْكُ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ؕ— وَاِلَی اللّٰهِ تُرْجَعُ الْاُمُوْرُ ۟

५. आकाशांची व धरतीची राज्यसत्ता त्याचीच आहे आणि समस्त कार्य त्याच्याचकडे परतविली जातात. info
التفاسير:

external-link copy
6 : 57

یُوْلِجُ الَّیْلَ فِی النَّهَارِ وَیُوْلِجُ النَّهَارَ فِی الَّیْلِ ؕ— وَهُوَ عَلِیْمٌۢ بِذَاتِ الصُّدُوْرِ ۟

६. तोच रात्रीला दिवसात दाखल करतो आणि तोच दिवसाला रात्रीत दाखल करतो आणि छाती (मना) मध्ये लपलेल्या गोष्टींचे तो पूर्ण ज्ञान राखणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
7 : 57

اٰمِنُوْا بِاللّٰهِ وَرَسُوْلِهٖ وَاَنْفِقُوْا مِمَّا جَعَلَكُمْ مُّسْتَخْلَفِیْنَ فِیْهِ ؕ— فَالَّذِیْنَ اٰمَنُوْا مِنْكُمْ وَاَنْفَقُوْا لَهُمْ اَجْرٌ كَبِیْرٌ ۟

७. अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरावर ईमान राखा आणि धनातून खर्च करा ज्यात अल्लाहने तुम्हाला (इतरांचा) वारस बनविले आहे तेव्हा तुमच्यापैकी जो कोणी ईमान राखेल आणि खर्च करेल तर अशांना फार मोठे पुण्य लाभेल. info
التفاسير:

external-link copy
8 : 57

وَمَا لَكُمْ لَا تُؤْمِنُوْنَ بِاللّٰهِ ۚ— وَالرَّسُوْلُ یَدْعُوْكُمْ لِتُؤْمِنُوْا بِرَبِّكُمْ وَقَدْ اَخَذَ مِیْثَاقَكُمْ اِنْ كُنْتُمْ مُّؤْمِنِیْنَ ۟

८. तुम्ही अल्लाहवर ईमान का नाही राखत? वास्तविक पैगंबर स्वतः तुम्हाला आपल्या पालनकर्त्यावर ईमान राखण्याचे आवाहन करीत आहे आणि जर तुम्ही ईमान राखणारे असाल तर त्याने तुमच्याकडून दृढवचन घेतले आहे. info
التفاسير:

external-link copy
9 : 57

هُوَ الَّذِیْ یُنَزِّلُ عَلٰی عَبْدِهٖۤ اٰیٰتٍۢ بَیِّنٰتٍ لِّیُخْرِجَكُمْ مِّنَ الظُّلُمٰتِ اِلَی النُّوْرِ ؕ— وَاِنَّ اللّٰهَ بِكُمْ لَرَءُوْفٌ رَّحِیْمٌ ۟

९. तो (अल्लाह) च आहे, जो आपल्या दासावर स्पष्ट आयती अवतरित करतो, यासाठी की त्याने तुम्हाला अंधाराकडून उजेडाकडे न्यावे. निःसंशय अल्लाह तुमच्यावर स्नेह, दया करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
10 : 57

وَمَا لَكُمْ اَلَّا تُنْفِقُوْا فِیْ سَبِیْلِ اللّٰهِ وَلِلّٰهِ مِیْرَاثُ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ؕ— لَا یَسْتَوِیْ مِنْكُمْ مَّنْ اَنْفَقَ مِنْ قَبْلِ الْفَتْحِ وَقٰتَلَ ؕ— اُولٰٓىِٕكَ اَعْظَمُ دَرَجَةً مِّنَ الَّذِیْنَ اَنْفَقُوْا مِنْ بَعْدُ وَقَاتَلُوْاؕ— وَكُلًّا وَّعَدَ اللّٰهُ الْحُسْنٰی ؕ— وَاللّٰهُ بِمَا تَعْمَلُوْنَ خَبِیْرٌ ۟۠

१०. आणि तुम्हाला झाले तरी काय की तुम्ही अल्लाहच्या मार्गात खर्च नाही करीत? वास्तविक आकाशांच्या आणि धरतीच्या समस्त वस्तूंचा स्वामी (एकटा) अल्लाहच आहे. तुमच्यापैकी ज्या लोकांनी विजयापूर्वी अल्लाहच्या मार्गात दिले आहे आणि धर्मयुद्ध (जिहाद) केले आहे ते दुसऱ्यांच्या समान नाहीत किंबहुना त्यांच्यापेक्षा उच्च पदाचे आहेत, ज्यांनी विजय प्राप्तीनंतर दान दिले आणि जिहाद केले. होय भलाईचा वायदा तर अल्लाहचा त्या सर्वांशी आहे आणि जे काही तुम्ही करीत आहात, अल्लाह ते जाणतो. info
التفاسير:

external-link copy
11 : 57

مَنْ ذَا الَّذِیْ یُقْرِضُ اللّٰهَ قَرْضًا حَسَنًا فَیُضٰعِفَهٗ لَهٗ وَلَهٗۤ اَجْرٌ كَرِیْمٌ ۟

११. असा कोण आहे, जो अल्लाहला चांगल्या प्रकारे कर्ज देईल, मग अल्लाह त्याच्यासाठी ते वाढवित जाईल आणि त्याचा चांगला मोबदला ठरावा. info
التفاسير: