(१) जनसमूहांना विचारले जाईल की तुमच्याजवळ पैगंबर आले होते? त्यांनी आमचा संदेश पोहचविला होता? ते उत्तर देतील, होय. हे अल्लाह! तुझे पैगंबर खचितच आमच्याजवळ आले होते, परंतु हे आमचेच दुर्दैव होते की आम्ही त्यांची काळजी घेतली नाही. मग पैगंबरांना विचारले जाईल की तुम्ही आमचा संदेश आपल्या लोकांना पोहचविला आणि त्यांनी त्या अनुषंगाने कोणते आचरण केले? पैगंबर या प्रश्नाचे उत्तर देतील, ज्याचे सविस्तर वर्णन पवित्र कुरआनात अनेक ठिकाणी आहे.
(१) अर्थात ज्यांच्या अंगी ईमान नाही, तेच सैतानाचे मित्र आहेत. विशेषतः ते सैतानाच्या कट कारस्थानांना बळी पडतात. तरीदेखील ईमान राखणाऱ्यांना तो भुरळ पाडण्याचा प्रयत्न करीत राहतो, काहीच न जमल्यास छुपे शिर्क (दिखावटी सत्कर्म) आणि खुला शिर्क (अनेकेश्वरोपासना) मध्ये मग्न करतो आणि अशा प्रकारे तो त्यांना खऱ्या ईमानाच्या पूंजीपासून वंचित ठेवतो.
(१) अपराधाशी अभिप्रेत अल्लाहची अवज्ञा करणे, त्याच्या आदेशाविरूद्ध वागणे. एका हदीसनुसार, पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी फर्माविले, गुन्हा तो होय, जो तुझ्या छातीत (मनात) खटकेल आणि लोकांना हे माहीत झाल्यावर तुला वाईट वाटावे. (सहीह मुस्लिम- किताबुल बिर्र) काही लोकांच्या मते गुन्हा तो आहे, ज्याचा प्रभाव करणाऱ्यापर्यंत सीमित असावा आणि बग़य(अरबी शब्द) तो आहे, ज्याचा परिणाम इतरांपर्यंतही पोहचावा. इथे बग़य सोबत नाहकचा अर्थ, अकारण अत्याचार, अतिरेक. उदा. लोकांचा हक्क हडप करणे, एखाद्याचे धन हिसकावून घेणे, अकारण मारणे, झोडणे आणि कारण नसताना बरे-वाईट व सक्त शब्द वापरून एखाद्याला अपमानित करणे वगैरे.
(१) ‘हाच’शी अभिप्रेत पवित्र कुरआन होय किंवा इस्लाम धर्म किंवा अल्लाहचे ते आदेश, जे प्रामुख्याने या आयतीत वर्णिले गेले आहेत आणि तो तौहीद (एकेश्वरवाद) मरणोत्तर परिणती आणि प्रेषित्व आणि हेच इस्लामचे तीन मूलाधार आहेत, ज्याच्या आसावर संपूर्ण इस्लामी कायदे फिरतात. यास्तव याचा जोदेखील अर्थ घेतला जाईल, एकच अर्थ आहे.
(१) या आयतीमध्ये अल्लाहने सर्वांत प्रथम हे सांगितले आहे की ईमान (श्रद्धा) आणि तकवा (अल्लाहचे भय राखून केलेले आचरण) ही अशी बाब आहे की ज्या वस्तीचे लोक तिचा अंगिकार करतील तर त्या वस्तीवर अल्लाह आकाश व धरतीचे सुख-समृद्धीचे, धन-संपत्तीचे दरवाजे उघडतो. अर्थात गरजेनुसार आकाशातून पाऊस पाडतो आणि जमिनीला त्याद्वारे सिंचित करून शेतीचे उत्पन्न वाढवितो, परिणामी विकास आणि संपन्न अवस्था उदयास येते. याउलट खोटे ठरविणारे आणि अल्लाहचा इन्कार करण्याचा मार्ग पत्करणारे जनसमूह अल्लाहच्या प्रकोपास पात्र ठरतात, मग रात्री किंवा दिवसा केव्हा प्रकोप कोसळेल हे कळून येत नाही, परिणामी सुखा-समाधानाने आबाद असलेली वस्ती एका क्षणात निर्जन व नामशेष होते. यास्तव अल्लाहच्या प्रकोपापासून निर्धास्त राहू नये. या बेफिकीरीचा परिणाम फक्त विनाश आहे. याखेरीज आणखी काही नाही.
(१) ही त्या वेळेची घटना आहे जेव्हा हजरत मूसा त्यांच्याजवळ तौरात ग्रंथ घेऊन आले आणि त्यांना त्यातले आदेश सांगितले, तेव्हा त्यांनी आपल्या चरित्र्यानुसार त्या आदेशांवर आचरण करणे मान्य केले नाही आणि अवज्ञा केली, ज्यामुळे सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्यांच्या शिरावर पर्वत आणून उभा केला की तुमच्यावर कोसळवून तुमचा चेंदा मेंदा केला जाईल. त्याचे भय राखून त्यांनी वचन दिले की आता आम्ही तौरातच्या आदेशानुसारच आचरण करू.
(१) अर्थात हृदय, डोळे आणि कान सर्वश्रेष्ठ अल्लाहने अशासाठी प्रदान केले आहेत की माणसाने यांचा लाभ घेत आपल्या स्वामी व पालनकर्त्या अल्लाहला समजून घ्यावे, त्याच्या निशाण्यांना पाहावे आणि सत्य गोष्ट लक्षपूर्वक ऐकावी, परंतु जो मनुष्य यांच्याद्वारे हे काम घेत नाही, तो त्यांच्याकरावी लाभ न घडल्याने पशूवत आहे, किंबहुना जनावरांपेक्षा अधिक वाट चुकलेला आहे. यासाठी की जनावरे तरीदेखील आपले काही फायदे व नुकसान समजतात, कारण ते लाभदायक गोष्टींपासून लाभ घेतात आणि हानिकारक वस्तूंचा अव्हेर करतात. परंतु अल्लाहच्या मार्गदर्शनापासून पथभ्रष्ट मनुष्याला इतकेही समजत नाही की त्याच्यासाठी लाभदायक काय आहे आणि हानिकारक काय आहे.
(१) ही आयत या गोष्टीस अगदी स्पष्ट करते की पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ैब (परोक्ष) जाणणारे नाहीत. ग़ैब जाणणारा केवळ अल्लाहच आहे. परंतु जुलूम अत्याचार आणि अज्ञानाची सीमा ही की पवित्र कुरआनात एवढे स्पष्ट निवेदन असतानाही, धर्मात नवनवीन विचार व प्रथा सामील करणारे, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना परोक्षज्ञान असल्याचे सिद्ध करण्याचा असफल प्रयत्न करीत राहतात.