Bản dịch ý nghĩa nội dung Qur'an - 马拉地语翻译 - 穆罕默德·安萨尔

Al-Haqah

external-link copy
1 : 69

اَلْحَآقَّةُ ۟ۙ

१. सिद्ध होणारी. info
التفاسير:

external-link copy
2 : 69

مَا الْحَآقَّةُ ۟ۚ

२. काय आहे सिद्ध होणारी? info
التفاسير:

external-link copy
3 : 69

وَمَاۤ اَدْرٰىكَ مَا الْحَآقَّةُ ۟ؕ

३. आणि तुम्हाला काय माहीत की ती सिद्ध होणारी काय आहे? info
التفاسير:

external-link copy
4 : 69

كَذَّبَتْ ثَمُوْدُ وَعَادٌ بِالْقَارِعَةِ ۟

४. त्या खडकाविणारीला समूद आणि आदच्या लोकांनी खोटे ठरविले. info
التفاسير:

external-link copy
5 : 69

فَاَمَّا ثَمُوْدُ فَاُهْلِكُوْا بِالطَّاغِیَةِ ۟

५. (परिणामी) समूद तर अतिशय तीव्र (आणि भयंकर जोराच्या) चित्काराद्वारे नष्ट केले गेले. info
التفاسير:

external-link copy
6 : 69

وَاَمَّا عَادٌ فَاُهْلِكُوْا بِرِیْحٍ صَرْصَرٍ عَاتِیَةٍ ۟ۙ

६. आणि आद, मोठ्या वेगाच्या पालापाचोळा असलेल्या वादळाद्वारे नष्ट केले गेले info
التفاسير:

external-link copy
7 : 69

سَخَّرَهَا عَلَیْهِمْ سَبْعَ لَیَالٍ وَّثَمٰنِیَةَ اَیَّامٍ ۙ— حُسُوْمًا فَتَرَی الْقَوْمَ فِیْهَا صَرْعٰی ۙ— كَاَنَّهُمْ اَعْجَازُ نَخْلٍ خَاوِیَةٍ ۟ۚ

७. ज्यास (अल्लाहने) त्यांच्यावर सतत सात रात्री आणि आठ दिवसपर्यंत लावून ठेवले. तेव्हा तुम्ही पाहिले असते की लोक जमिनीवर अशा प्रकारे चीत केले गेले आहेत जणू खजुरीची पोकळ खोडे! info
التفاسير:

external-link copy
8 : 69

فَهَلْ تَرٰی لَهُمْ مِّنْ بَاقِیَةٍ ۟

८. तर काय त्यांच्यापैकी कोणीही तुम्हाला बाकी दिसून येत आहे? info
التفاسير:

external-link copy
9 : 69

وَجَآءَ فِرْعَوْنُ وَمَنْ قَبْلَهٗ وَالْمُؤْتَفِكٰتُ بِالْخَاطِئَةِ ۟ۚ

९. फिरऔन आणि त्याच्या पूर्वीचे लोक आणि ज्यांच्या वस्त्या पालथ्या घातल्या गेल्या, त्यांनीही अपराध केले. info
التفاسير:

external-link copy
10 : 69

فَعَصَوْا رَسُوْلَ رَبِّهِمْ فَاَخَذَهُمْ اَخْذَةً رَّابِیَةً ۟

१०. आणि आपल्या पालनकर्त्याच्या रसूल (पैगंबरा) ची अवज्ञा केली (शेवटी) अल्लाहने त्यांना (ही) पकडीत घेतले. info
التفاسير:

external-link copy
11 : 69

اِنَّا لَمَّا طَغَا الْمَآءُ حَمَلْنٰكُمْ فِی الْجَارِیَةِ ۟ۙ

११. जेव्हा पाण्यात पूर आला तर त्या वेळी आम्ही तुम्हाला नौकेत चढविले. info
التفاسير:

external-link copy
12 : 69

لِنَجْعَلَهَا لَكُمْ تَذْكِرَةً وَّتَعِیَهَاۤ اُذُنٌ وَّاعِیَةٌ ۟

१२. यासाठी की त्यास तुमच्यासाठी बोध उपदेश (आणि स्मारक) बनवावे, आणि (यासाठी की) स्मरण राखणाऱ्या कानांनी त्यास स्मरणात राखावे. info
التفاسير:

external-link copy
13 : 69

فَاِذَا نُفِخَ فِی الصُّوْرِ نَفْخَةٌ وَّاحِدَةٌ ۟ۙ

१३. तर जेव्हा सूर (शंखा) मध्ये एक फुंक मारली जाईल. info
التفاسير:

external-link copy
14 : 69

وَّحُمِلَتِ الْاَرْضُ وَالْجِبَالُ فَدُكَّتَا دَكَّةً وَّاحِدَةً ۟ۙ

१४. आणि धरती व पर्वत उचलून घेतले जातील आणि एकाच प्रहारात कण-कण (चुरेचूर) बनविले जातील. info
التفاسير:

external-link copy
15 : 69

فَیَوْمَىِٕذٍ وَّقَعَتِ الْوَاقِعَةُ ۟ۙ

१५. त्या दिवशी घडून येणारी घटना (कयामत) घडून येईल. info
التفاسير:

external-link copy
16 : 69

وَانْشَقَّتِ السَّمَآءُ فَهِیَ یَوْمَىِٕذٍ وَّاهِیَةٌ ۟ۙ

१६. आणि आकाश विदीर्ण होईल तर त्या दिवशी फार कमजोर होईल. info
التفاسير:

external-link copy
17 : 69

وَّالْمَلَكُ عَلٰۤی اَرْجَآىِٕهَا ؕ— وَیَحْمِلُ عَرْشَ رَبِّكَ فَوْقَهُمْ یَوْمَىِٕذٍ ثَمٰنِیَةٌ ۟ؕ

१७. आणि त्याच्या किनाऱ्यांवर फरिश्ते असतील आणि तुमच्या पालनकर्त्याचे आसन (अर्श) त्या दिवशी आठ फरिश्ते आपल्यावर उचलून घेतलेले असतील. info
التفاسير:

external-link copy
18 : 69

یَوْمَىِٕذٍ تُعْرَضُوْنَ لَا تَخْفٰی مِنْكُمْ خَافِیَةٌ ۟

१८. त्या दिवशी तुम्ही सर्व हजर केले जाल, तुमचे कोणतेही रहस्य लपून राहणार नाही. info
التفاسير:

external-link copy
19 : 69

فَاَمَّا مَنْ اُوْتِیَ كِتٰبَهٗ بِیَمِیْنِهٖ فَیَقُوْلُ هَآؤُمُ اقْرَءُوْا كِتٰبِیَهْ ۟ۚ

१९. तेव्हा त्याचे कर्मपत्र त्याच्या उजव्या हातात दिले जाईल, तेव्हा तो म्हणू लागेल की घ्या, माझे कर्मपत्र वाचा. info
التفاسير:

external-link copy
20 : 69

اِنِّیْ ظَنَنْتُ اَنِّیْ مُلٰقٍ حِسَابِیَهْ ۟ۚ

२०. मला तर पूर्ण विश्वास होता की मी आपला (कर्मांचा) हिशोब प्राप्त करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
21 : 69

فَهُوَ فِیْ عِیْشَةٍ رَّاضِیَةٍ ۟ۙ

२१. तर तो एका सुख-संपन्न जीवनात असेल info
التفاسير:

external-link copy
22 : 69

فِیْ جَنَّةٍ عَالِیَةٍ ۟ۙ

२२. उच्च (आणि सुंदर) जन्नतमध्ये. info
التفاسير:

external-link copy
23 : 69

قُطُوْفُهَا دَانِیَةٌ ۟

२३. जिची फळे खाली झुकलेली असतील. info
التفاسير:

external-link copy
24 : 69

كُلُوْا وَاشْرَبُوْا هَنِیْٓـًٔا بِمَاۤ اَسْلَفْتُمْ فِی الْاَیَّامِ الْخَالِیَةِ ۟

२४. (त्यांना सांगितले जाईल) की मजेने खा व प्या, आपल्या त्या कर्मांच्या मोबदल्यात जी तुम्ही मागच्या काळात केलीत. info
التفاسير:

external-link copy
25 : 69

وَاَمَّا مَنْ اُوْتِیَ كِتٰبَهٗ بِشِمَالِهٖ ۙ۬— فَیَقُوْلُ یٰلَیْتَنِیْ لَمْ اُوْتَ كِتٰبِیَهْ ۟ۚ

२५. परंतु ज्याला त्याचे कर्मपत्र डाव्या हातात दिले जाईल, तर तो म्हणेल की अरेरे! मला माझे कर्मपत्र दिले गेले नसते. info
التفاسير:

external-link copy
26 : 69

وَلَمْ اَدْرِ مَا حِسَابِیَهْ ۟ۚ

२६. आणि मी जाणतच नाही की हिशोब काय आहे. info
التفاسير:

external-link copy
27 : 69

یٰلَیْتَهَا كَانَتِ الْقَاضِیَةَ ۟ۚ

२७. मृत्युनेच माझे काम संपविले असते तर (बरे झाले असते) info
التفاسير:

external-link copy
28 : 69

مَاۤ اَغْنٰی عَنِّیْ مَالِیَهْ ۟ۚ

२८. माझ्या धनानेही मला काही लाभ पोहचविला नाही. info
التفاسير:

external-link copy
29 : 69

هَلَكَ عَنِّیْ سُلْطٰنِیَهْ ۟ۚ

२९. माझे राज्यही माझ्यापासून दुरावले. info
التفاسير:

external-link copy
30 : 69

خُذُوْهُ فَغُلُّوْهُ ۟ۙ

३०. (आदेश होईल) धरा त्याला, मग त्याच्या गळ्यात जोखंड (तौक) टाका. info
التفاسير:

external-link copy
31 : 69

ثُمَّ الْجَحِیْمَ صَلُّوْهُ ۟ۙ

३१. मग त्याला जहन्नममध्ये टाका. info
التفاسير:

external-link copy
32 : 69

ثُمَّ فِیْ سِلْسِلَةٍ ذَرْعُهَا سَبْعُوْنَ ذِرَاعًا فَاسْلُكُوْهُ ۟ؕ

३२. मग त्याला अशा साखळीत की जिचे माप सत्तर हाताचे आहे, जखडून टाका. info
التفاسير:

external-link copy
33 : 69

اِنَّهٗ كَانَ لَا یُؤْمِنُ بِاللّٰهِ الْعَظِیْمِ ۟ۙ

३३. निःसंशय, हा महान अल्लाहवर ईमान राखत नव्हता. info
التفاسير:

external-link copy
34 : 69

وَلَا یَحُضُّ عَلٰی طَعَامِ الْمِسْكِیْنِ ۟ؕ

३४. आणि गरीबाला जेवू घालण्यावर प्रोत्साहित करीत नव्हता. info
التفاسير:

external-link copy
35 : 69

فَلَیْسَ لَهُ الْیَوْمَ هٰهُنَا حَمِیْمٌ ۟ۙ

३५. तर आज इथे त्याचा ना कोणी मित्र आहे info
التفاسير:

external-link copy
36 : 69

وَّلَا طَعَامٌ اِلَّا مِنْ غِسْلِیْنٍ ۟ۙ

३६. आणि ना पू खेरीज त्याचे एखादे भोजन आहे info
التفاسير:

external-link copy
37 : 69

لَّا یَاْكُلُهٗۤ اِلَّا الْخَاطِـُٔوْنَ ۟۠

३७. ज्यास अपराधी लोकांशिवाय कोणीही खाणार नाही. info
التفاسير:

external-link copy
38 : 69

فَلَاۤ اُقْسِمُ بِمَا تُبْصِرُوْنَ ۟ۙ

३८. तेव्हा मला शपथ आहे त्या वस्तूंची, ज्यांना तुम्ही पाहता info
التفاسير:

external-link copy
39 : 69

وَمَا لَا تُبْصِرُوْنَ ۟ۙ

३९. आणि त्या वस्तूंची, ज्यांना तुम्ही पाहत नाही. info
التفاسير:

external-link copy
40 : 69

اِنَّهٗ لَقَوْلُ رَسُوْلٍ كَرِیْمٍ ۟ۚۙ

४०. की निःसंशय, हा (कुरआन) प्रतिष्ठित पैगंबराचे कथन आहे.१ info

(१) प्रतिष्ठित पैगंबराशी अभिप्रेत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम होत. आणि कथनाशी अभिप्रेत पठण करणे अथवा असे कथन, ज्यास हा प्रतिष्ठित पैगंबर अल्लाहतर्फे तुम्हास पोहचवितो. कारण कुरआन पैगंबराचे किंवा जिब्रीलचे स्वतःचे कथन नाही, किंबहुना अल्लाहचे कथन आहे, जेत्याने फरिश्त्याद्वारे आपल्या पैगंबरावर अवतरित केले, मग त्यानंतर पैगंबरांनी लोकांपर्यंत पोहचविले आहे.

التفاسير:

external-link copy
41 : 69

وَّمَا هُوَ بِقَوْلِ شَاعِرٍ ؕ— قَلِیْلًا مَّا تُؤْمِنُوْنَ ۟ۙ

४१. ही एखाद्या कवीची कल्पना नव्हे (अरेरे!) तुम्ही फार कमी विश्वास राखता. info
التفاسير:

external-link copy
42 : 69

وَلَا بِقَوْلِ كَاهِنٍ ؕ— قَلِیْلًا مَّا تَذَكَّرُوْنَ ۟ؕ

४२. आणि ना एखाद्या ज्योतिषीचे कथन आहे. (खेद आहे) तुम्ही फार कमी बोध ग्रहण करता. info
التفاسير:

external-link copy
43 : 69

تَنْزِیْلٌ مِّنْ رَّبِّ الْعٰلَمِیْنَ ۟

४३. (हे तर) समस्त विश्वांच्या पालनकर्त्याने अवतरित केले आहे. info
التفاسير:

external-link copy
44 : 69

وَلَوْ تَقَوَّلَ عَلَیْنَا بَعْضَ الْاَقَاوِیْلِ ۟ۙ

४४. आणि जर याने एखादी गोष्ट (मनाने) रचून, तिचा संबंध आमच्याशी जोडला असता. info
التفاسير:

external-link copy
45 : 69

لَاَخَذْنَا مِنْهُ بِالْیَمِیْنِ ۟ۙ

४५. तर आम्ही त्याचा उजवा हात अवश्य धरला असता. info
التفاسير:

external-link copy
46 : 69

ثُمَّ لَقَطَعْنَا مِنْهُ الْوَتِیْنَ ۟ؗۖ

४६. मग त्याच्या हृदयाची शीर (नस) कापून टाकली असती. info
التفاسير:

external-link copy
47 : 69

فَمَا مِنْكُمْ مِّنْ اَحَدٍ عَنْهُ حٰجِزِیْنَ ۟

४७. मग तुमच्यापैकी कोणीही (मला) तसे करण्यापासून रोखणारा नसता. info
التفاسير:

external-link copy
48 : 69

وَاِنَّهٗ لَتَذْكِرَةٌ لِّلْمُتَّقِیْنَ ۟

४८. निःसंशय, हा (कुरआन) अल्लाहचे भय बाळगणाऱ्यांकरिता बोध - उपदेश आहे. info
التفاسير:

external-link copy
49 : 69

وَاِنَّا لَنَعْلَمُ اَنَّ مِنْكُمْ مُّكَذِّبِیْنَ ۟

४९. आणि आम्ही पूर्णतः जाणून आहोत की तुमच्यापैकी काहीजण याला खोटे ठरविणारे आहेत. info
التفاسير:

external-link copy
50 : 69

وَاِنَّهٗ لَحَسْرَةٌ عَلَی الْكٰفِرِیْنَ ۟

५०. निःसंशय, (हे खोटे ठरविणे) काफिरांकरिता पश्चात्तापकारक आहे. info
التفاسير:

external-link copy
51 : 69

وَاِنَّهٗ لَحَقُّ الْیَقِیْنِ ۟

५१. आणि निःसंशय, हे अगदी खात्रीचे सत्य आहे. info
التفاسير:

external-link copy
52 : 69

فَسَبِّحْ بِاسْمِ رَبِّكَ الْعَظِیْمِ ۟۠

५२. तेव्हा तुम्ही आपल्या महिमावान (महामहीम) पालनकर्त्याच्या पावित्र्याचे गुणगान करा. info
التفاسير: