Bản dịch ý nghĩa nội dung Qur'an - 马拉地语翻译 - 穆罕默德·安萨尔

Số trang:close

external-link copy
53 : 6

وَكَذٰلِكَ فَتَنَّا بَعْضَهُمْ بِبَعْضٍ لِّیَقُوْلُوْۤا اَهٰۤؤُلَآءِ مَنَّ اللّٰهُ عَلَیْهِمْ مِّنْ بَیْنِنَا ؕ— اَلَیْسَ اللّٰهُ بِاَعْلَمَ بِالشّٰكِرِیْنَ ۟

५३. आणि अशा प्रकारे आम्ही त्यांना आपसात कसोटीत टाकले, यासाठी की त्यांनी म्हणावे, काय अल्लाहने आमच्यामधून फक्त यांच्यावरच उपकार केला? तेव्हा काय असे नाही की अल्लाह कृतज्ञशील लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो. info
التفاسير:

external-link copy
54 : 6

وَاِذَا جَآءَكَ الَّذِیْنَ یُؤْمِنُوْنَ بِاٰیٰتِنَا فَقُلْ سَلٰمٌ عَلَیْكُمْ كَتَبَ رَبُّكُمْ عَلٰی نَفْسِهِ الرَّحْمَةَ ۙ— اَنَّهٗ مَنْ عَمِلَ مِنْكُمْ سُوْٓءًا بِجَهَالَةٍ ثُمَّ تَابَ مِنْ بَعْدِهٖ وَاَصْلَحَ ۙ— فَاَنَّهٗ غَفُوْرٌ رَّحِیْمٌ ۟

५४. आणि तुमच्याजवळ जेव्हा ते लोक येतील, जे आमच्या आयतींवर ईमान राखतात, तर त्यांना सांगा, तुमच्यावर सलामती असो तुमच्या पालनकर्त्याने स्वतःवर दया अनिवार्य करून घेतली आहे की तुमच्यापैकी ज्याने मूर्खपणाने वाईट कृत्य केले मग त्यानंतर क्षमा याचना केली आणि सुधारणा करून घेतली तर अल्लाह मोठा माफ करणारा दया करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
55 : 6

وَكَذٰلِكَ نُفَصِّلُ الْاٰیٰتِ وَلِتَسْتَبِیْنَ سَبِیْلُ الْمُجْرِمِیْنَ ۟۠

५५. अशा प्रकारे आम्ही आपल्या आयतींचे सविस्तर निवेदन करतो यासाठी की अपराधी लोकांचा मार्ग स्पष्ट व्हावा. info
التفاسير:

external-link copy
56 : 6

قُلْ اِنِّیْ نُهِیْتُ اَنْ اَعْبُدَ الَّذِیْنَ تَدْعُوْنَ مِنْ دُوْنِ اللّٰهِ ؕ— قُلْ لَّاۤ اَتَّبِعُ اَهْوَآءَكُمْ ۙ— قَدْ ضَلَلْتُ اِذًا وَّمَاۤ اَنَا مِنَ الْمُهْتَدِیْنَ ۟

५६. तुम्ही सांगा की मला या गोष्टीपासून रोखले गेले आहे की मी त्यांची उपासना करावी, ज्यांना अल्लाहशिवाय तुम्ही पुकारता. तुम्ही सांगा की मी तुमच्या मनाच्या इच्छेनुसार चालणार नाही कारण अशा स्थितीत मी मार्गभ्रष्ट होईन आणि सन्मार्गावर राहणार नाही. info
التفاسير:

external-link copy
57 : 6

قُلْ اِنِّیْ عَلٰی بَیِّنَةٍ مِّنْ رَّبِّیْ وَكَذَّبْتُمْ بِهٖ ؕ— مَا عِنْدِیْ مَا تَسْتَعْجِلُوْنَ بِهٖ ؕ— اِنِ الْحُكْمُ اِلَّا لِلّٰهِ ؕ— یَقُصُّ الْحَقَّ وَهُوَ خَیْرُ الْفٰصِلِیْنَ ۟

५७. तुम्ही सांगा, माझ्याजवळ माझ्या पालनकर्त्यातर्फे एक प्रमाण आहे आणि ते तुम्ही खोटे ठरविता. ज्या गोष्टीची तुम्ही घाई करीत आहात ती माझ्याजवळ नाही. अल्लाहशिवाय दुसऱ्या कोणाचाही आदेश नाही अल्लाह वास्तव गोष्टींना स्पष्टतः सांगतो आणि तोच सर्वांत चांगला फैसला करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
58 : 6

قُلْ لَّوْ اَنَّ عِنْدِیْ مَا تَسْتَعْجِلُوْنَ بِهٖ لَقُضِیَ الْاَمْرُ بَیْنِیْ وَبَیْنَكُمْ ؕ— وَاللّٰهُ اَعْلَمُ بِالظّٰلِمِیْنَ ۟

५८. तुम्ही सांगा, ज्या गोष्टीची तुम्ही एवढ्या घाईने मागणी करीत आहात ती जर माझ्या अवाख्यात असती तर माझ्या व तुमच्या दरम्यान केव्हाच फैसला झाला असता आणि अल्लाह अत्याचारी लोकांना चांगल्या प्रकारे ओळखतो. info
التفاسير:

external-link copy
59 : 6

وَعِنْدَهٗ مَفَاتِحُ الْغَیْبِ لَا یَعْلَمُهَاۤ اِلَّا هُوَ ؕ— وَیَعْلَمُ مَا فِی الْبَرِّ وَالْبَحْرِ ؕ— وَمَا تَسْقُطُ مِنْ وَّرَقَةٍ اِلَّا یَعْلَمُهَا وَلَا حَبَّةٍ فِیْ ظُلُمٰتِ الْاَرْضِ وَلَا رَطْبٍ وَّلَا یَابِسٍ اِلَّا فِیْ كِتٰبٍ مُّبِیْنٍ ۟

५९. आणि त्या (अल्लाह) कडेच परोक्षाच्या चाव्या आहेत, ज्यांना फक्त तोच जाणतो आणि जे काही धरतीवर आणि जलाशयात आहे ते सर्व तो जाणतो आणि जमिनीच्या अंधःकारात एक दाणाही खाली पडत नाही. आणि ना एखादी ओली व कोरडी वस्तू पडते, परंतु हे सर्व काही स्पष्ट ग्रंथात नमूद आहे.१ info

(१) स्पष्ट ग्रंथाशी अभिप्रेत ‘सुरक्षित ग्रंथ’ या आयतीद्वारे हे स्पष्ट कळते की गैब (परोक्ष) चे ज्ञान फक्त अल्लाहलाच आहे. समस्त परोक्षा-खजिना त्याच्याचजवळ आहे. यास्तव कृतघ्न, अनेकेश्वरवादी आणि विरोधी लोकांवर केव्हा अज़ाब टाकायचा तेही अल्लाह जाणतो. हदीसमधील उल्लेखानुसार परोक्ष गोष्टी पाच आहेत? १. खयामतचे ज्ञान. २. पर्जन्यवृष्टी. ३. मातेच्या गर्भातले मूल. ४. उद्या घडणारी घटना. ५. मृत्यु कोणत्या जागी होईल. या पाचही गोष्टींचे ज्ञान फक्त अल्लाहला आहे. (सही बुखारी : तफसीर सूरह अल अनआम)

التفاسير: