Bản dịch ý nghĩa nội dung Qur'an - 马拉地语翻译 - 穆罕默德·安萨尔

Al-Najm

external-link copy
1 : 53

وَالنَّجْمِ اِذَا هَوٰی ۟ۙ

१. ताऱ्याची शपथ आहे, जेव्हा तो कोसळेल. info
التفاسير:

external-link copy
2 : 53

مَا ضَلَّ صَاحِبُكُمْ وَمَا غَوٰی ۟ۚ

२. की तुमचा साथीदार ना वाट चुकलेला आहे, ना तो वाकड्या मार्गावर आहे. info
التفاسير:

external-link copy
3 : 53

وَمَا یَنْطِقُ عَنِ الْهَوٰی ۟ؕۚ

३. आणि ना आपल्या मर्जीने तो काही बोलतो. info
التفاسير:

external-link copy
4 : 53

اِنْ هُوَ اِلَّا وَحْیٌ یُّوْحٰی ۟ۙ

४. ती तर केवळ वहयी (आकाशवाणी) आहे, जी अवतरित केली जाते. info
التفاسير:

external-link copy
5 : 53

عَلَّمَهٗ شَدِیْدُ الْقُوٰی ۟ۙ

५. त्याला पूर्ण सामर्थ्यशाली फरिश्त्याने शिकविले आहे. info
التفاسير:

external-link copy
6 : 53

ذُوْ مِرَّةٍ ؕ— فَاسْتَوٰی ۟ۙ

६. जो मोठा शक्तिशाली आहे, मग तो सरळ उभा राहिला. info
التفاسير:

external-link copy
7 : 53

وَهُوَ بِالْاُفُقِ الْاَعْلٰی ۟ؕ

७. आणि तो अति उच्च आकाशाच्या किनाऱ्या (क्षितिजा) वर होता. info
التفاسير:

external-link copy
8 : 53

ثُمَّ دَنَا فَتَدَلّٰی ۟ۙ

८. मग जवळ आला आणि अवतरला. info
التفاسير:

external-link copy
9 : 53

فَكَانَ قَابَ قَوْسَیْنِ اَوْ اَدْنٰی ۟ۚ

९. तेव्हा तो दोन कमानीइतक्या अंतरावर राहिला, किंबहुना त्याहून कमी. info
التفاسير:

external-link copy
10 : 53

فَاَوْحٰۤی اِلٰی عَبْدِهٖ مَاۤ اَوْحٰی ۟ؕ

१०. मग त्याने अल्लाहच्या दासाला संदेश पोहचविला, जो काही पोहचविला. info
التفاسير:

external-link copy
11 : 53

مَا كَذَبَ الْفُؤَادُ مَا رَاٰی ۟

११. हृदयाने खोटे म्हटले नाही, जे (पैगंबरा) ने पाहिले. info
التفاسير:

external-link copy
12 : 53

اَفَتُمٰرُوْنَهٗ عَلٰی مَا یَرٰی ۟

१२. काय तुम्ही त्या गोष्टीबद्दल वाद घालता, जे पैगंबर पाहतात. info
التفاسير:

external-link copy
13 : 53

وَلَقَدْ رَاٰهُ نَزْلَةً اُخْرٰی ۟ۙ

१३. त्याला तर आणखी एका वेळी पाहिले होते. info
التفاسير:

external-link copy
14 : 53

عِنْدَ سِدْرَةِ الْمُنْتَهٰی ۟

१४. ‘सिदरतुल मुन्तहा’च्या जवळ. info
التفاسير:

external-link copy
15 : 53

عِنْدَهَا جَنَّةُ الْمَاْوٰی ۟ؕ

१५. त्याच्याच निकट ‘जन्नतुल मावा’ आहे. info
التفاسير:

external-link copy
16 : 53

اِذْ یَغْشَی السِّدْرَةَ مَا یَغْشٰی ۟ۙ

१६. जेव्हा सिदरला लपवून घेत होती, ती वस्तू, जी त्यावर आच्छादित होत होती. info
التفاسير:

external-link copy
17 : 53

مَا زَاغَ الْبَصَرُ وَمَا طَغٰی ۟

१७. ना तर दृष्टी वळली, ना मर्यादेच्या पुढे गेली. info
التفاسير:

external-link copy
18 : 53

لَقَدْ رَاٰی مِنْ اٰیٰتِ رَبِّهِ الْكُبْرٰی ۟

१८. निश्चितच त्याने आपल्या पालनकर्त्याच्या मोठमोठ्या निशाण्यांपैकी काही निशाण्या पाहिल्या होत्या. info
التفاسير:

external-link copy
19 : 53

اَفَرَءَیْتُمُ اللّٰتَ وَالْعُزّٰی ۟ۙ

१९. काय तुम्ही ‘लात’ आणि ‘उज्जा’ला पाहिले? info
التفاسير:

external-link copy
20 : 53

وَمَنٰوةَ الثَّالِثَةَ الْاُخْرٰی ۟

२०. आणि तिसऱ्या अंतिम ‘मनात’ला?१ info

(१) हे अनेकेश्वरवाद्यांची कानउघडणी करण्यासाठी म्हटले जात आहे की अल्लाह तर तो आहे, ज्याने जिब्रील (अलै.) सारखा महान फरिश्ता निर्माण केला. मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यासारखे त्याचे पैगंबर आहेत, ज्यांना त्याने आकाशांवर बोलावून आपल्या मोठमोठ्या निशाण्याही दाखविल्या आणि त्यांच्यावर वहयी देखील अरतरित करतो. काय तुम्ही ज्या उपास्यांची भक्ती आराधना करता, त्यांच्यातही अशी आणि या स्वरूपाची गुणवैशिष्ट्ये आहेत?

التفاسير:

external-link copy
21 : 53

اَلَكُمُ الذَّكَرُ وَلَهُ الْاُ ۟

२१. काय तुमच्यासाठी पुत्र आणि त्या (अल्लाह) साठी कन्या आहेत? info
التفاسير:

external-link copy
22 : 53

تِلْكَ اِذًا قِسْمَةٌ ضِیْزٰی ۟

२२. ही तर मोठी अन्यायपूर्ण वाटणी आहे! info
التفاسير:

external-link copy
23 : 53

اِنْ هِیَ اِلَّاۤ اَسْمَآءٌ سَمَّیْتُمُوْهَاۤ اَنْتُمْ وَاٰبَآؤُكُمْ مَّاۤ اَنْزَلَ اللّٰهُ بِهَا مِنْ سُلْطٰنٍ ؕ— اِنْ یَّتَّبِعُوْنَ اِلَّا الظَّنَّ وَمَا تَهْوَی الْاَنْفُسُ ۚ— وَلَقَدْ جَآءَهُمْ مِّنْ رَّبِّهِمُ الْهُدٰی ۟ؕ

२३. वास्तविक ती केवळ नावे आहेत, जी तुम्ही आणि तुमच्या वाडवडिलांनी त्यांना ठेवली आहेत. अल्लाहने त्यांची कोणतीही सनद अवतरित केली नाही. हे लोक तर केवळ अटकळ (भ्रम) आणि आपल्या मनाच्या इच्छा आकांक्षांमागे लागले आहेत. आणि निःसंशय, त्यांच्या पालनकर्त्यातर्फे त्यांच्याजवळ मार्गदर्शन येऊन पोहोचले आहे. info
التفاسير:

external-link copy
24 : 53

اَمْ لِلْاِنْسَانِ مَا تَمَنّٰی ۟ؗۖ

२४. काय प्रत्येक मनुष्य जी कामना देखील करील ती त्याला साध्य होईल? info
التفاسير:

external-link copy
25 : 53

فَلِلّٰهِ الْاٰخِرَةُ وَالْاُوْلٰی ۟۠

२५. अल्लाहकरिताच आहे हे विश्व आणि ती आखिरत. info
التفاسير:

external-link copy
26 : 53

وَكَمْ مِّنْ مَّلَكٍ فِی السَّمٰوٰتِ لَا تُغْنِیْ شَفَاعَتُهُمْ شَیْـًٔا اِلَّا مِنْ بَعْدِ اَنْ یَّاْذَنَ اللّٰهُ لِمَنْ یَّشَآءُ وَیَرْضٰی ۟

२६. आणखी कितीतरी फरिश्ते आकाशांमध्ये आहेत, ज्यांची शिफारस काहीच उपयोगी पडू शकत नाही, मात्र ही गोष्ट वेगळी की अल्लाह आपल्या इच्छेने व आपल्या खुशीने ज्याला इच्छिल आज्ञा (अनुमती) देईल.१ info

(१) अर्थात फरिश्ते, जी अल्लाहच्या निकटची सृष्टी (निर्मिती) आहे, त्यांना देखील शिफारस करण्याचा अधिकार फक्त त्याच लोकांसाठी असेल, ज्यांच्यासाठी अल्लाह पसंत करील. जेव्हा ही वस्तुस्थिती आहे, तेव्हा मग या दगडाच्या मूर्त्या कशा प्रकारे शिफारस करू शकतील, ज्याच्याशी तुम्ही आस बाळगून बसला आहात? तसेच अल्लाह अनेक ईश्वरांच्या उपासकांसाठी, एखाद्याला शिफारस करण्याचा अधिकार देईल तरी कसा? वस्तुतः शिर्क (अल्लाहसोबत इतरांनाही उपास्य ठरविणे) त्याच्या ठायी माफ होणार नाही. कारण हा गुन्हा अगदी अक्षम्य आहे.

التفاسير:

external-link copy
27 : 53

اِنَّ الَّذِیْنَ لَا یُؤْمِنُوْنَ بِالْاٰخِرَةِ لَیُسَمُّوْنَ الْمَلٰٓىِٕكَةَ تَسْمِیَةَ الْاُ ۟

२७. निःसंशय, जे लोक आखिरतवर ईमान राखत नाही, ते फरिश्त्यांना स्त्रीरूपी देवतांची नावे देतात. info
التفاسير:

external-link copy
28 : 53

وَمَا لَهُمْ بِهٖ مِنْ عِلْمٍ ؕ— اِنْ یَّتَّبِعُوْنَ اِلَّا الظَّنَّ ۚ— وَاِنَّ الظَّنَّ لَا یُغْنِیْ مِنَ الْحَقِّ شَیْـًٔا ۟ۚ

२८. वास्तविक त्यांना याचे काहीच ज्ञान नाही. ते केवळ आपल्या भ्रमाच्या मागे लागले आहेत आणि निःसंशय, भ्रम (आणि अनुमान) सत्यासमोर काहीच उपयोगी पडत नाही. info
التفاسير:

external-link copy
29 : 53

فَاَعْرِضْ عَنْ مَّنْ تَوَلّٰی ۙ۬— عَنْ ذِكْرِنَا وَلَمْ یُرِدْ اِلَّا الْحَیٰوةَ الدُّنْیَا ۟ؕ

२९. तेव्हा तुम्ही त्याच्याकडून तोंड फिरवून घ्या, जो आमच्या स्मरणांपासून तोंड फिरविल आणि ज्यांचा उद्देश केवळ ऐहिक जीवनाखेरीज काही नसावा. info
التفاسير:

external-link copy
30 : 53

ذٰلِكَ مَبْلَغُهُمْ مِّنَ الْعِلْمِ ؕ— اِنَّ رَبَّكَ هُوَ اَعْلَمُ بِمَنْ ضَلَّ عَنْ سَبِیْلِهٖ وَهُوَ اَعْلَمُ بِمَنِ اهْتَدٰی ۟

३०. हीच त्यांच्या ज्ञानाची सीमा आहे. तुमचा पालनकर्ता त्याला चांगल्या प्रकारे जाणतो, जो त्याच्या मार्गापासून विचलित झाला आहे आणि तोच चांगल्या प्रकारे जाणतो त्याला देखील, जो सन्मार्गावर आहे. info
التفاسير:

external-link copy
31 : 53

وَلِلّٰهِ مَا فِی السَّمٰوٰتِ وَمَا فِی الْاَرْضِ ۙ— لِیَجْزِیَ الَّذِیْنَ اَسَآءُوْا بِمَا عَمِلُوْا وَیَجْزِیَ الَّذِیْنَ اَحْسَنُوْا بِالْحُسْنٰی ۟ۚ

३१. आणि अल्लाहचेच आहे, जे काही आकाशांमध्ये आहे आणि जे काही धरतीत आहे, यासाठी की त्याने (अल्लाहने) दुष्कर्म करणाऱ्यांना त्यांच्या कर्मांचा मोबदला द्यावा आणि सत्कर्म करणाऱ्या लोकांना चांगला मोबदला द्यावा. info
التفاسير:

external-link copy
32 : 53

اَلَّذِیْنَ یَجْتَنِبُوْنَ كَبٰٓىِٕرَ الْاِثْمِ وَالْفَوَاحِشَ اِلَّا اللَّمَمَ ؕ— اِنَّ رَبَّكَ وَاسِعُ الْمَغْفِرَةِ ؕ— هُوَ اَعْلَمُ بِكُمْ اِذْ اَنْشَاَكُمْ مِّنَ الْاَرْضِ وَاِذْ اَنْتُمْ اَجِنَّةٌ فِیْ بُطُوْنِ اُمَّهٰتِكُمْ ۚ— فَلَا تُزَكُّوْۤا اَنْفُسَكُمْ ؕ— هُوَ اَعْلَمُ بِمَنِ اتَّقٰی ۟۠

३२. जे लोक मोठमोठे अपराध आणि उघड निर्लज्जतेच्या कृत्यांपासून दूर राहतात, याखेरीज की काही लहान सहान अपराध त्यांच्याकडून घडतात, निःसंशय, (अशा लोकांसाठी) तुमच्या पालनकर्त्याची क्षमाशीलता अति विशाल आहे. तो तुम्हाला चांगल्या प्रकारे जाणतो, जेव्हा त्याने तुम्हाला जमिनीतून निर्माण केले आणि जेव्हा तुम्ही आपल्या मातांच्या गर्भात मूल (अर्भक) होते तेव्हा तुम्ही आपले पावित्र्य स्वतः सांगू नका. तोच नेक - सदाचारी लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो. info
التفاسير:

external-link copy
33 : 53

اَفَرَءَیْتَ الَّذِیْ تَوَلّٰی ۟ۙ

३३. काय तुम्ही त्याला पाहिले, ज्याने तोंड फिरवून घेतले, info
التفاسير:

external-link copy
34 : 53

وَاَعْطٰی قَلِیْلًا وَّاَكْدٰی ۟

३४. आणि फार कमी दिले आणि हात रोखला. info
التفاسير:

external-link copy
35 : 53

اَعِنْدَهٗ عِلْمُ الْغَیْبِ فَهُوَ یَرٰی ۟

३५. काय त्याला परोक्ष ज्ञान आहे की तो (सर्व काही) पाहत आहे? info
التفاسير:

external-link copy
36 : 53

اَمْ لَمْ یُنَبَّاْ بِمَا فِیْ صُحُفِ مُوْسٰی ۟ۙ

३६. काय त्याला त्या गोष्टीची खबर नाही दिली गेली, जी मूसा (अलै.) च्या ग्रंथात होती. info
التفاسير:

external-link copy
37 : 53

وَاِبْرٰهِیْمَ الَّذِیْ وَ ۟ۙ

३७. आणि एकनिष्ठ इब्राहीम (अलै.) च्या ग्रंथात होती. info
التفاسير:

external-link copy
38 : 53

اَلَّا تَزِرُ وَازِرَةٌ وِّزْرَ اُخْرٰی ۟ۙ

३८. की कोणताही मनुष्य दुसऱ्या कोणाचेही ओझे उचलणार नाही. info
التفاسير:

external-link copy
39 : 53

وَاَنْ لَّیْسَ لِلْاِنْسَانِ اِلَّا مَا سَعٰی ۟ۙ

३९. आणि हे की प्रत्येक माणसाकरिता केवळ तेच आहे, ज्याचा त्याने स्वतः प्रयत्न केला. info
التفاسير:

external-link copy
40 : 53

وَاَنَّ سَعْیَهٗ سَوْفَ یُرٰی ۟

४०. आणि हे की निःसंशय, त्याचा प्रयत्न लवकरच पाहिला जाईल. info
التفاسير:

external-link copy
41 : 53

ثُمَّ یُجْزٰىهُ الْجَزَآءَ الْاَوْفٰی ۟ۙ

४१. मग त्याला पुरेपूर मोबदला दिला जाईल. info
التفاسير:

external-link copy
42 : 53

وَاَنَّ اِلٰی رَبِّكَ الْمُنْتَهٰی ۟ۙ

४२. आणि हे की तुमच्या पालनकर्त्या (अल्लाह) कडेच पोहचायचे आहे. info
التفاسير:

external-link copy
43 : 53

وَاَنَّهٗ هُوَ اَضْحَكَ وَاَبْكٰی ۟ۙ

४३. आणि हे की तोच हसवितो आणि तोच रडवितो. info
التفاسير:

external-link copy
44 : 53

وَاَنَّهٗ هُوَ اَمَاتَ وَاَحْیَا ۟ۙ

४४. आणि हे की तोच मारतो आणि तोच जिवंत करतो. info
التفاسير:

external-link copy
45 : 53

وَاَنَّهٗ خَلَقَ الزَّوْجَیْنِ الذَّكَرَ وَالْاُ ۟ۙ

४५. आणि हे की त्यानेच जोडा अर्थात नर - मादी निर्माण केला. info
التفاسير:

external-link copy
46 : 53

مِنْ نُّطْفَةٍ اِذَا تُمْنٰی ۪۟

४६. वीर्यापासून जेव्हा तो टपकविला जातो. info
التفاسير:

external-link copy
47 : 53

وَاَنَّ عَلَیْهِ النَّشْاَةَ الْاُخْرٰی ۟ۙ

४७. आणि हे की दुसऱ्यांदा जिवंत करणे त्याचीच जबाबदारी आहे. info
التفاسير:

external-link copy
48 : 53

وَاَنَّهٗ هُوَ اَغْنٰی وَاَقْنٰی ۟ۙ

४८. आणि हे की तोच धनवान बनवितो आणि धन देतो. info
التفاسير:

external-link copy
49 : 53

وَاَنَّهٗ هُوَ رَبُّ الشِّعْرٰی ۟ۙ

४९. आणि हे की तोच शेअरा (ताऱ्या) चा स्वामी व पालनकर्ता आहे. info
التفاسير:

external-link copy
50 : 53

وَاَنَّهٗۤ اَهْلَكَ عَادَا ١لْاُوْلٰی ۟ۙ

५०. आणि हे की त्यानेच पहिल्या आदला नष्ट केले आहे, info
التفاسير:

external-link copy
51 : 53

وَثَمُوْدَاۡ فَمَاۤ اَبْقٰی ۟ۙ

५१. आणि समूदला देखील, (ज्यापैकी) एकालाही शिल्लक ठेवले नाही. info
التفاسير:

external-link copy
52 : 53

وَقَوْمَ نُوْحٍ مِّنْ قَبْلُ ؕ— اِنَّهُمْ كَانُوْا هُمْ اَظْلَمَ وَاَطْغٰی ۟ؕ

५२. आणि त्याच्यापूर्वी नूहच्या जनसमूहाला. निःसंशय, ते मोठे अत्याचारी आणि उध्दट लोक होते. info
التفاسير:

external-link copy
53 : 53

وَالْمُؤْتَفِكَةَ اَهْوٰی ۟ۙ

५३. आणि ‘मुतफिका’ (शहर किंवा पालथ्या पडलेल्या वस्त्यांना) त्यानेच पालथे घातले. info
التفاسير:

external-link copy
54 : 53

فَغَشّٰىهَا مَا غَشّٰی ۟ۚ

५४. मग त्यांच्यावर आच्छादित केले, जे काही आच्छादित केले. info
التفاسير:

external-link copy
55 : 53

فَبِاَیِّ اٰلَآءِ رَبِّكَ تَتَمَارٰی ۟

५५. तेव्हा हे मानवा! तू आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या कृपा देणगी (नेमत) बद्दल वाद करशील? info
التفاسير:

external-link copy
56 : 53

هٰذَا نَذِیْرٌ مِّنَ النُّذُرِ الْاُوْلٰی ۟

५६. हे (पैगंबर) खबरदार करणारे आहेत, पूर्वी होऊन गेलेल्या खबरदार करणाऱ्यांपैकी. info
التفاسير:

external-link copy
57 : 53

اَزِفَتِ الْاٰزِفَةُ ۟ۚ

५७. येणारी वेळ (घटिका) जवळ येऊन ठेपली आहे. info
التفاسير:

external-link copy
58 : 53

لَیْسَ لَهَا مِنْ دُوْنِ اللّٰهِ كَاشِفَةٌ ۟ؕ

५८. अल्लाहशिवाय तिला जाहीर करणारा अन्य कोणी नाही. info
التفاسير:

external-link copy
59 : 53

اَفَمِنْ هٰذَا الْحَدِیْثِ تَعْجَبُوْنَ ۟ۙ

५९. तेव्हा काय तुम्ही या गोष्टीवर आश्चर्य करता? info
التفاسير:

external-link copy
60 : 53

وَتَضْحَكُوْنَ وَلَا تَبْكُوْنَ ۟ۙ

६०. आणि हसत आहात, रडत नाही? info
التفاسير:

external-link copy
61 : 53

وَاَنْتُمْ سٰمِدُوْنَ ۟

६१. (किंबहुना) तुम्ही खेळत आहात! info
التفاسير:

external-link copy
62 : 53

فَاسْجُدُوْا لِلّٰهِ وَاعْبُدُوْا ۟

६२. आता अल्लाहसमोर सजदे करा (माथा टेका) आणि (त्याचीच) उपासना करा. info
التفاسير: