Bản dịch ý nghĩa nội dung Qur'an - 马拉地语翻译 - 穆罕默德·安萨尔

Số trang:close

external-link copy
137 : 26

اِنْ هٰذَاۤ اِلَّا خُلُقُ الْاَوَّلِیْنَ ۟ۙ

१३७. हा तर प्राचीन काळाच्या लोकांचा दीन (धर्म) आहे. info
التفاسير:

external-link copy
138 : 26

وَمَا نَحْنُ بِمُعَذَّبِیْنَ ۟ۚ

१३८. आणि आम्ही कदापि शिक्षा- यातना प्राप्त करणाऱ्यांपैकी असणार नाही. info
التفاسير:

external-link copy
139 : 26

فَكَذَّبُوْهُ فَاَهْلَكْنٰهُمْ ؕ— اِنَّ فِیْ ذٰلِكَ لَاٰیَةً ؕ— وَمَا كَانَ اَكْثَرُهُمْ مُّؤْمِنِیْنَ ۟

१३९. ज्याअर्थी ‘आद’ जनसमूहाच्या लोकांनी (हजरत) हूद यांना खोटे ठरविले यासाठी आम्ही त्यांना नष्ट केले. निःसंशय, यात मोठी निशाणी आहे, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक लोक ईमान राखणारे नव्हते. info
التفاسير:

external-link copy
140 : 26

وَاِنَّ رَبَّكَ لَهُوَ الْعَزِیْزُ الرَّحِیْمُ ۟۠

१४०. आणि निःसंशय तुमचा पालनकर्ताच वर्चस्वशाली, दयावान आहे. info
التفاسير:

external-link copy
141 : 26

كَذَّبَتْ ثَمُوْدُ الْمُرْسَلِیْنَ ۟ۚۖ

१४१. ‘समूद’ समुदायाच्या लोकांनीही पैगंबरास खोटे ठरविले. info
التفاسير:

external-link copy
142 : 26

اِذْ قَالَ لَهُمْ اَخُوْهُمْ صٰلِحٌ اَلَا تَتَّقُوْنَ ۟ۚ

१४२. जेव्हा त्यांचे बंधु ‘स्वालेह’ने त्यांना सांगितले की काय तुम्ही अल्लाहचे भय बाळगत नाही? info
التفاسير:

external-link copy
143 : 26

اِنِّیْ لَكُمْ رَسُوْلٌ اَمِیْنٌ ۟ۙ

१४३. मी तुमच्याकडे अल्लाहचा विश्वस्त पैगंबर आहे. info
التفاسير:

external-link copy
144 : 26

فَاتَّقُوا اللّٰهَ وَاَطِیْعُوْنِ ۟ۚ

१४४. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि माझे आज्ञापालन करा. info
التفاسير:

external-link copy
145 : 26

وَمَاۤ اَسْـَٔلُكُمْ عَلَیْهِ مِنْ اَجْرٍ ۚ— اِنْ اَجْرِیَ اِلَّا عَلٰی رَبِّ الْعٰلَمِیْنَ ۟ؕ

१४५. आणि मी त्याबद्दल तुमच्याकडून कसलाही मोबदला मागत नाही. माझा मोबदला तर सर्व विश्वांच्या पालनकर्त्याकडे आहे. info
التفاسير:

external-link copy
146 : 26

اَتُتْرَكُوْنَ فِیْ مَا هٰهُنَاۤ اٰمِنِیْنَ ۟ۙ

१४६. काय वस्तूं (देणग्यां) मध्ये, ज्या इथे आहेत, तुम्हाला शांतीपूर्वक सोडले जाईल? info
التفاسير:

external-link copy
147 : 26

فِیْ جَنّٰتٍ وَّعُیُوْنٍ ۟ۙ

१४७. अर्थात त्या बागांमध्ये आणि त्या झऱ्यांमध्ये. info
التفاسير:

external-link copy
148 : 26

وَّزُرُوْعٍ وَّنَخْلٍ طَلْعُهَا هَضِیْمٌ ۟ۚ

१४८. आणि त्या शेतांमध्ये आणि त्या खजुरींच्या बागांमध्ये ज्यांचे घोस (भार वाढल्याने) तुटून पडतात. info
التفاسير:

external-link copy
149 : 26

وَتَنْحِتُوْنَ مِنَ الْجِبَالِ بُیُوْتًا فٰرِهِیْنَ ۟ۚ

१४९. आणि तुम्ही पर्वतांना कोरून आकर्षक (सुंदर) इमारती निर्माण करता. info
التفاسير:

external-link copy
150 : 26

فَاتَّقُوا اللّٰهَ وَاَطِیْعُوْنِ ۟ۚ

१५०. यास्तव अल्लाहचे भय राखा आणि माझे अनुसरण करा. info
التفاسير:

external-link copy
151 : 26

وَلَا تُطِیْعُوْۤا اَمْرَ الْمُسْرِفِیْنَ ۟ۙ

१५१. आणि मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांचे अनुसरण करण्यापासुन थांबा . info
التفاسير:

external-link copy
152 : 26

الَّذِیْنَ یُفْسِدُوْنَ فِی الْاَرْضِ وَلَا یُصْلِحُوْنَ ۟

१५२. जे धरतीत फसाद (उत्पात) पसरवित आहेत आणि सुधारणा करीत नाही. info
التفاسير:

external-link copy
153 : 26

قَالُوْۤا اِنَّمَاۤ اَنْتَ مِنَ الْمُسَحَّرِیْنَ ۟ۚ

१५३. ते म्हणाले, तू तर अशा लोकांपैकी आहेस, ज्यांच्यावर जादूटोणा केला गेला आहे. info
التفاسير:

external-link copy
154 : 26

مَاۤ اَنْتَ اِلَّا بَشَرٌ مِّثْلُنَا ۖۚ— فَاْتِ بِاٰیَةٍ اِنْ كُنْتَ مِنَ الصّٰدِقِیْنَ ۟

१५४. तू तर आमच्यासारखाच एक मनुष्य आहे. जर तू सच्चा लोकांपैकी आहेस तर एखादा मोजिजा (ईशचमत्कार) घेऊन ये. info
التفاسير:

external-link copy
155 : 26

قَالَ هٰذِهٖ نَاقَةٌ لَّهَا شِرْبٌ وَّلَكُمْ شِرْبُ یَوْمٍ مَّعْلُوْمٍ ۟ۚ

१५५. (स्वालेह) म्हणाले, ही सांडणी आहे. पाणी प्यायची एक पाळी हिची, आणि एका निर्धारित दिवशी पाणी पिण्याची पाळी तुमची. info
التفاسير:

external-link copy
156 : 26

وَلَا تَمَسُّوْهَا بِسُوْٓءٍ فَیَاْخُذَكُمْ عَذَابُ یَوْمٍ عَظِیْمٍ ۟

१५६. (आणि खबरदार!) हिला वाईट हेतुने हात लावू नका, अन्यथा एका मोठ्या दिवसाची शिक्षा- यातना तुम्हाला येऊन धरेल. info
التفاسير:

external-link copy
157 : 26

فَعَقَرُوْهَا فَاَصْبَحُوْا نٰدِمِیْنَ ۟ۙ

१५७. तरीही त्यांनी तिचे हात पाय कापून टाकले, नंतर पश्चात्ताप करणारे झाले. info
التفاسير:

external-link copy
158 : 26

فَاَخَذَهُمُ الْعَذَابُ ؕ— اِنَّ فِیْ ذٰلِكَ لَاٰیَةً ؕ— وَمَا كَانَ اَكْثَرُهُمْ مُّؤْمِنِیْنَ ۟

१५८. तेव्हा अज़ाब (अल्लाहच्या शिक्षा- यातने) ने त्यांना येऊन धरले. निःसंशय, यात मोठी शिकवण (बोध) आहे, परंतु त्यांच्यापैकी बहुसंख्य लोक ईमान राखणारे नव्हते. info
التفاسير:

external-link copy
159 : 26

وَاِنَّ رَبَّكَ لَهُوَ الْعَزِیْزُ الرَّحِیْمُ ۟۠

१५९. आणि निःसंशय तुमचा पालनकर्ता मोठा प्रभावशाली, दयावान आहे. info
التفاسير: