Bản dịch ý nghĩa nội dung Qur'an - 马拉地语翻译 - 穆罕默德·安萨尔

external-link copy
91 : 2

وَاِذَا قِیْلَ لَهُمْ اٰمِنُوْا بِمَاۤ اَنْزَلَ اللّٰهُ قَالُوْا نُؤْمِنُ بِمَاۤ اُنْزِلَ عَلَیْنَا وَیَكْفُرُوْنَ بِمَا وَرَآءَهٗ ۗ— وَهُوَ الْحَقُّ مُصَدِّقًا لِّمَا مَعَهُمْ ؕ— قُلْ فَلِمَ تَقْتُلُوْنَ اَنْۢبِیَآءَ اللّٰهِ مِنْ قَبْلُ اِنْ كُنْتُمْ مُّؤْمِنِیْنَ ۟

९१. आणि जेव्हा त्यांना सांगितले गेले की त्यावर ईमान राखा जे अल्लाहने अवतरीत केले आहे, तेव्हा ते म्हणाले की जे आमच्यावर (तौरात) उतरविले गेले, त्यावर आमचे ईमान आहे आणि ते त्याला सोडून दुसऱ्या ग्रंथाचा (पवित्र कुरआनाचा) इन्कार करतात. वास्तविक तो सत्य आहे. त्यांच्याजवळ असलेल्या (धर्मग्रंथा) ची सत्यता सिद्ध करीत आहे. (हे पैगंबर!) त्यांना सांगा की जर तुम्ही आपल्या ग्रंथावर ईमान राखता तर यापूर्वी अल्लाहच्या पैगंबरांची हत्या का केली? info
التفاسير: