Bản dịch ý nghĩa nội dung Qur'an - 马拉地语翻译 - 穆罕默德·安萨尔

Al-Hijr

external-link copy
1 : 15

الٓرٰ ۫— تِلْكَ اٰیٰتُ الْكِتٰبِ وَقُرْاٰنٍ مُّبِیْنٍ ۟

१. अलिफ. लाम. रॉ या (अल्लाहच्या) ग्रंथाच्या आयती आहेत आणि स्पष्ट अशा कुरआनाच्या. info
التفاسير:

external-link copy
2 : 15

رُبَمَا یَوَدُّ الَّذِیْنَ كَفَرُوْا لَوْ كَانُوْا مُسْلِمِیْنَ ۟

२. अशीही वेळ येईल जेव्हा इन्कार करणारे आपल्या ईमानधारक होण्याची इच्छा करतील. info
التفاسير:

external-link copy
3 : 15

ذَرْهُمْ یَاْكُلُوْا وَیَتَمَتَّعُوْا وَیُلْهِهِمُ الْاَمَلُ فَسَوْفَ یَعْلَمُوْنَ ۟

३. तुम्ही त्यांना खाण्यात, लाभ उचलण्यात आणि (खोट्या) अपेक्षा बाळगण्यात मग्न असलेले सोडा. ते स्वतः लवकरच जाणून घेतील. info
التفاسير:

external-link copy
4 : 15

وَمَاۤ اَهْلَكْنَا مِنْ قَرْیَةٍ اِلَّا وَلَهَا كِتَابٌ مَّعْلُوْمٌ ۟

४. आणि कोणत्याही वस्तीला आम्ही नष्ट केले नाही, परंतु हे की तिच्याकरिता निश्चित असे लिखित होते. info
التفاسير:

external-link copy
5 : 15

مَا تَسْبِقُ مِنْ اُمَّةٍ اَجَلَهَا وَمَا یَسْتَاْخِرُوْنَ ۟

५. कोणताही जनसमूह आपल्या मृत्युपासून ना पुढे जाऊ शकतो, ना मागे राहू शकतो.१ info

(१) ज्या वस्तीलादेखील आम्ही अवज्ञेपायी नष्ट करतो, तेव्हा घाई करीत नाही किंबहुना आम्ही एक वेळ निर्धारीत केलेली आहे, त्यावेळेपर्यंत आम्ही त्या वस्तीला संधी देतो. परंतु ठरलेली वेळ येताच त्यांना नष्ट केले जाते, मग त्या विनाशापासून ते ना पुढे जाऊ शकतात, ना मागे राहू शकतात.

التفاسير:

external-link copy
6 : 15

وَقَالُوْا یٰۤاَیُّهَا الَّذِیْ نُزِّلَ عَلَیْهِ الذِّكْرُ اِنَّكَ لَمَجْنُوْنٌ ۟ؕ

६. आणि ते म्हणाले, हे माणसा! ज्यावर कुरआन अवतरित केले गेले आहे निश्चितच तू एखादा वेडा आहे. info
التفاسير:

external-link copy
7 : 15

لَوْ مَا تَاْتِیْنَا بِالْمَلٰٓىِٕكَةِ اِنْ كُنْتَ مِنَ الصّٰدِقِیْنَ ۟

७. जर तू अगदी सच्चा आहे तर मग आमच्याजवळ फरिश्त्यांना का नाही आणत? info
التفاسير:

external-link copy
8 : 15

مَا نُنَزِّلُ الْمَلٰٓىِٕكَةَ اِلَّا بِالْحَقِّ وَمَا كَانُوْۤا اِذًا مُّنْظَرِیْنَ ۟

८. आम्ही फरिश्त्यांना सत्यासहच अवतरित करतो. आणि अशा वेळी त्यांना सवड दिली जात नाही. info
التفاسير:

external-link copy
9 : 15

اِنَّا نَحْنُ نَزَّلْنَا الذِّكْرَ وَاِنَّا لَهٗ لَحٰفِظُوْنَ ۟

९. निःसंशय आम्हीच या कुरआनाला अवतरित केले आहे आणि आम्हीच त्याचे संरक्षक आहोत. info
التفاسير:

external-link copy
10 : 15

وَلَقَدْ اَرْسَلْنَا مِنْ قَبْلِكَ فِیْ شِیَعِ الْاَوَّلِیْنَ ۟

१०. आणि आम्ही तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या जनसमूहांमध्येही आपले पैगंबर पाठवित राहिलो. info
التفاسير:

external-link copy
11 : 15

وَمَا یَاْتِیْهِمْ مِّنْ رَّسُوْلٍ اِلَّا كَانُوْا بِهٖ یَسْتَهْزِءُوْنَ ۟

११. आणि (तथापि) जो पैगंबरदेखील त्यांच्याजवळ आला, त्याची ते थट्टाच उडवित राहिले. info
التفاسير:

external-link copy
12 : 15

كَذٰلِكَ نَسْلُكُهٗ فِیْ قُلُوْبِ الْمُجْرِمِیْنَ ۟ۙ

१२. अपराधी लोकांच्या मनात आम्ही अशाच प्रकारे हेच रचत असतो. info
التفاسير:

external-link copy
13 : 15

لَا یُؤْمِنُوْنَ بِهٖ وَقَدْ خَلَتْ سُنَّةُ الْاَوَّلِیْنَ ۟

१३. ते याच्यावर ईमान राखत नाही आणि निःसंशय पूर्वीच्या लोकांची हीच पद्धत राहिली आहे. info
التفاسير:

external-link copy
14 : 15

وَلَوْ فَتَحْنَا عَلَیْهِمْ بَابًا مِّنَ السَّمَآءِ فَظَلُّوْا فِیْهِ یَعْرُجُوْنَ ۟ۙ

१४. आणि जर आम्ही त्यांच्यासाठी आकाशात (जाण्याचा) दरवाजाही उघडून दिला आणि ते तिथे चढूही लागले. info
التفاسير:

external-link copy
15 : 15

لَقَالُوْۤا اِنَّمَا سُكِّرَتْ اَبْصَارُنَا بَلْ نَحْنُ قَوْمٌ مَّسْحُوْرُوْنَ ۟۠

१५. तरीही हेच म्हणतील की आमची नजरबंदी केली गेली आहे, किंबहुना आमच्यावर जादूटोणा केला गेला आहे. info
التفاسير: