Қуръони Карим маъноларининг таржимаси - Маратийча таржима - Муҳаммад Шафий Ансорий

Бет рақами:close

external-link copy
51 : 28

وَلَقَدْ وَصَّلْنَا لَهُمُ الْقَوْلَ لَعَلَّهُمْ یَتَذَكَّرُوْنَ ۟ؕ

५१. आणि आम्ही सातत्याने लोकांसाठी आपली वाणी पाठवित राहिलो यासाठी की त्यांनी बोध प्राप्त करावा. info
التفاسير:

external-link copy
52 : 28

اَلَّذِیْنَ اٰتَیْنٰهُمُ الْكِتٰبَ مِنْ قَبْلِهٖ هُمْ بِهٖ یُؤْمِنُوْنَ ۟

५२. ज्या लोकांना आम्ही यापूर्वी ग्रंथ प्रदान केला होता, ते तर यावर ईमान राखतात. info
التفاسير:

external-link copy
53 : 28

وَاِذَا یُتْلٰی عَلَیْهِمْ قَالُوْۤا اٰمَنَّا بِهٖۤ اِنَّهُ الْحَقُّ مِنْ رَّبِّنَاۤ اِنَّا كُنَّا مِنْ قَبْلِهٖ مُسْلِمِیْنَ ۟

५३. आणि जेव्हा (त्याच्या आयती) त्यांच्यासमोर वाचून ऐकविल्या जातात तेव्हा ते असे म्हणतात की आमच्या पालनकर्त्यातर्फे हे सत्य असण्यावर आमचे ईमान (पूर्ण विश्वास) आहे. आम्ही तर याच्या पूर्वीपासून मुस्लिम आहोत.१ info

(१) हा त्याच वस्तुस्थितीकडे इशारा आहे, जिचा पवित्र कुरआनात अनेक ठिकाणी उल्लेख केला गेला आहे की प्रत्येक काळात अल्लाहच्या पैगंबरांनी ज्या धर्माचा प्रचार केला तो इस्लाम धर्म होता आणि त्या पैगंबरांच्या आवाहनाने ईमान राखणारे मुस्लिमच म्हटले जात. यहूदी, ख्रिश्चन वगैरे शब्दप्रयोग लोकांनी स्वतः रचलेले आहेत, जे नंतरच्या काळात उदयास आले. याच आधारावर पैगंबर (स.) यांच्यावर ईमान राखणारे ग्रंथधारक (यहूदी किंवा ख्रिश्चन) म्हणाले की आम्ही तर आधीपासूनच ‘मुस्लिम’ चालत आलो आहोत. अर्थात पूर्वीच्या पैगंबरांचे अनुयायी आणि त्याच्यावर ईमान राखणारे.

التفاسير:

external-link copy
54 : 28

اُولٰٓىِٕكَ یُؤْتَوْنَ اَجْرَهُمْ مَّرَّتَیْنِ بِمَا صَبَرُوْا وَیَدْرَءُوْنَ بِالْحَسَنَةِ السَّیِّئَةَ وَمِمَّا رَزَقْنٰهُمْ یُنْفِقُوْنَ ۟

५४. हे असे लोक आहेत, ज्यांना आपल्या केलेल्या धीर-संयमाच्या बदल्यात दुप्पट मोबदला प्रदान केला जाईल. हे सत्कर्माद्वारे दुष्कर्माला दूर करतात आणि आम्ही जे यांना देऊन ठेवले आहे, त्यातून देत राहतात. info
التفاسير:

external-link copy
55 : 28

وَاِذَا سَمِعُوا اللَّغْوَ اَعْرَضُوْا عَنْهُ وَقَالُوْا لَنَاۤ اَعْمَالُنَا وَلَكُمْ اَعْمَالُكُمْ ؗ— سَلٰمٌ عَلَیْكُمْ ؗ— لَا نَبْتَغِی الْجٰهِلِیْنَ ۟

५५. जेव्हा व्यर्थ गोष्ट कानी पडते, तेव्हा तिच्यापासून अलिप्त होतात आणि म्हणतात की आमचे आचरण आमच्यासाठी आणि तुमचे आचरण तुमच्यासाठी, तुमच्यावर सलाम असो. आम्ही अडाणी लोकांशी वाद घालू इच्छित नाही. info
التفاسير:

external-link copy
56 : 28

اِنَّكَ لَا تَهْدِیْ مَنْ اَحْبَبْتَ وَلٰكِنَّ اللّٰهَ یَهْدِیْ مَنْ یَّشَآءُ ۚ— وَهُوَ اَعْلَمُ بِالْمُهْتَدِیْنَ ۟

५६. तुम्ही वाटेल त्याला ईश-मार्गदर्शन देऊ शकत नाही, किंबहुना अल्लाहच ज्याला इच्छिल त्याला मार्गदर्शन देतो. मार्गदर्शन प्राप्त लोकांना तोच चांगल्या प्रकारे जाणतो. info
التفاسير:

external-link copy
57 : 28

وَقَالُوْۤا اِنْ نَّتَّبِعِ الْهُدٰی مَعَكَ نُتَخَطَّفْ مِنْ اَرْضِنَا ؕ— اَوَلَمْ نُمَكِّنْ لَّهُمْ حَرَمًا اٰمِنًا یُّجْبٰۤی اِلَیْهِ ثَمَرٰتُ كُلِّ شَیْءٍ رِّزْقًا مِّنْ لَّدُنَّا وَلٰكِنَّ اَكْثَرَهُمْ لَا یَعْلَمُوْنَ ۟

५७. आणि म्हणू लागले की जर आम्ही आपल्यासोबत मार्गदर्शनाचे अनुसरण करू लागलो तर आमचे, आमच्या भूमी (देशा) तून उच्चाटन केले जाईल. काय आम्ही त्यांना शांत व सुरिक्षत आणि आदर सन्मानपूर्ण हरममध्ये जागा नाही दिली, जिथे प्रत्येक प्रकारचे फळ आकर्षित होऊन चालत येते जे आमच्याकडून आजिविका स्वरूपात आहे? तथापि त्यांच्यापैकी अधिकांश लोक काही जाणत नाही. info
التفاسير:

external-link copy
58 : 28

وَكَمْ اَهْلَكْنَا مِنْ قَرْیَةٍ بَطِرَتْ مَعِیْشَتَهَا ۚ— فَتِلْكَ مَسٰكِنُهُمْ لَمْ تُسْكَنْ مِّنْ بَعْدِهِمْ اِلَّا قَلِیْلًا ؕ— وَكُنَّا نَحْنُ الْوٰرِثِیْنَ ۟

५८. आणि आम्ही अशा अनेक वस्त्या नष्ट करून टाकल्या, ज्या आपल्या सुख विलासात उन्मत्त झाल्या होत्या. ही आहेत त्यांची निवासस्थाने जी त्यांच्यानंतर फारच कमी आबाद केली गेलीत. आणि अखेरीस आम्हीच सर्व काहीचे वारस आहोत. info
التفاسير:

external-link copy
59 : 28

وَمَا كَانَ رَبُّكَ مُهْلِكَ الْقُرٰی حَتّٰی یَبْعَثَ فِیْۤ اُمِّهَا رَسُوْلًا یَّتْلُوْا عَلَیْهِمْ اٰیٰتِنَا ۚ— وَمَا كُنَّا مُهْلِكِی الْقُرٰۤی اِلَّا وَاَهْلُهَا ظٰلِمُوْنَ ۟

५९. आणि तुमचा पालनकर्ता कधीही कोणा एका वस्तीलाही त्या वेळेपर्यंत नष्ट करीत नाही, जोपर्यंत त्यांच्या एखाद्या मोठ्या वस्तीत आपला एखादा पैगंबर पाठवित नाही, जो त्यांना आमच्या आयती वाचून ऐकविल आणि आम्ही वस्त्यांना अशा वेळी नष्ट करतो, जेव्हा तिथले रहिवाशी अत्याचारी व्हावेत. info
التفاسير: