Қуръони Карим маъноларининг таржимаси - Маратийча таржима - Муҳаммад Шафий Ансорий

Бет рақами:close

external-link copy
44 : 28

وَمَا كُنْتَ بِجَانِبِ الْغَرْبِیِّ اِذْ قَضَیْنَاۤ اِلٰی مُوْسَی الْاَمْرَ وَمَا كُنْتَ مِنَ الشّٰهِدِیْنَ ۟ۙ

४४. आणि तूर पर्वताच्या पश्चिम दिशेकडे जेव्हा आम्ही मूसाला आदेशाची वहयी (प्रकाशना) पोहचविली होती, तेव्हा ना तुम्ही हजर होते, ना तुम्ही पाहणाऱ्यांपैकी होते. info
التفاسير:

external-link copy
45 : 28

وَلٰكِنَّاۤ اَنْشَاْنَا قُرُوْنًا فَتَطَاوَلَ عَلَیْهِمُ الْعُمُرُ ۚ— وَمَا كُنْتَ ثَاوِیًا فِیْۤ اَهْلِ مَدْیَنَ تَتْلُوْا عَلَیْهِمْ اٰیٰتِنَا ۙ— وَلٰكِنَّا كُنَّا مُرْسِلِیْنَ ۟

४५. परंतु आम्ही अनेक वंश निर्माण केले, ज्यांच्यावर दीर्घ कालावधी लोटला, आणि ना तुम्ही मदयनचे रहिवाशी होते की त्यांच्यासमोर आमच्या आयतींचे पठण केले असते, किंबहुना पैगंबरांना पाठविणारे आम्हीच राहिलो. info
التفاسير:

external-link copy
46 : 28

وَمَا كُنْتَ بِجَانِبِ الطُّوْرِ اِذْ نَادَیْنَا وَلٰكِنْ رَّحْمَةً مِّنْ رَّبِّكَ لِتُنْذِرَ قَوْمًا مَّاۤ اَتٰىهُمْ مِّنْ نَّذِیْرٍ مِّنْ قَبْلِكَ لَعَلَّهُمْ یَتَذَكَّرُوْنَ ۟

४६. आणि ना तुम्ही तूर पर्वताकडे हजर होते जेव्हा आम्ही (मूसाला) पुकारले होते. किंबहुना ही तुमच्या पालनकर्त्यातर्फे कृपा होय, यासाठी की तुम्ही अशा लोकांना खबरदार करावे, ज्यांच्याजवळ तुमच्यापूर्वी कोणी खबरदार करणारा पोहचला नाही. नवल नव्हे की त्यांनी बोध प्राप्त करून घ्यावा. info
التفاسير:

external-link copy
47 : 28

وَلَوْلَاۤ اَنْ تُصِیْبَهُمْ مُّصِیْبَةٌ بِمَا قَدَّمَتْ اَیْدِیْهِمْ فَیَقُوْلُوْا رَبَّنَا لَوْلَاۤ اَرْسَلْتَ اِلَیْنَا رَسُوْلًا فَنَتَّبِعَ اٰیٰتِكَ وَنَكُوْنَ مِنَ الْمُؤْمِنِیْنَ ۟

४७. आणि जर असे नसते की त्यांना, त्यांच्या आपल्या हातांनी पुढे पाठविलेल्या कर्मांपायी एखादी कष्ट-यातना पोहचली असती, तेव्हा हे उद्‌गारले असते की आमच्या पालनकर्त्या! तू आमच्याकडे एखादा रसूल (पैगंबर) का नाही पाठविला की आम्ही तुझ्या आयतींचे पालन केले असते आणि ईमान राखणाऱ्यांपैकी झालो असतो. info
التفاسير:

external-link copy
48 : 28

فَلَمَّا جَآءَهُمُ الْحَقُّ مِنْ عِنْدِنَا قَالُوْا لَوْلَاۤ اُوْتِیَ مِثْلَ مَاۤ اُوْتِیَ مُوْسٰی ؕ— اَوَلَمْ یَكْفُرُوْا بِمَاۤ اُوْتِیَ مُوْسٰی مِنْ قَبْلُ ۚ— قَالُوْا سِحْرٰنِ تَظَاهَرَا ۫— وَقَالُوْۤا اِنَّا بِكُلٍّ كٰفِرُوْنَ ۟

४८. मग जेव्हा त्यांच्याजवळ आमच्यातर्फे सत्य येऊन पोहचले, तेव्हा म्हणू लागले, का नाही दिली गेली याला तशी वस्तू जशी मूसाला दिली गेली होती. तर काय मूसाला यापूर्वी जे काही दिले गेले होते त्याचा लोकांनी इन्कार नव्हता केला? (उघडपणे) म्हणाले होते की हे दोघे जादूगार आहेत. जे एकमेकांचे सहाय्यक आहेत आणि आम्ही तर त्या सर्वांचा इन्कार करणारे आहोत. info
التفاسير:

external-link copy
49 : 28

قُلْ فَاْتُوْا بِكِتٰبٍ مِّنْ عِنْدِ اللّٰهِ هُوَ اَهْدٰی مِنْهُمَاۤ اَتَّبِعْهُ اِنْ كُنْتُمْ صٰدِقِیْنَ ۟

४९. त्यांना सांगा की जर सच्चे असाल तर तुम्ही देखील अल्लाहकडून असा एखादा ग्रंथ घेऊन या, जो या दोघांपेक्षा जास्त मार्गदर्शन करणारा असावा. मी त्याचेच अनुसरण करेन. info
التفاسير:

external-link copy
50 : 28

فَاِنْ لَّمْ یَسْتَجِیْبُوْا لَكَ فَاعْلَمْ اَنَّمَا یَتَّبِعُوْنَ اَهْوَآءَهُمْ ؕ— وَمَنْ اَضَلُّ مِمَّنِ اتَّبَعَ هَوٰىهُ بِغَیْرِ هُدًی مِّنَ اللّٰهِ ؕ— اِنَّ اللّٰهَ لَا یَهْدِی الْقَوْمَ الظّٰلِمِیْنَ ۟۠

५०. मग जर हे तुमचे म्हणणे मानत नसतील तर तुम्ही विश्वास करा की हे केवळ आपल्या इच्छा आकांक्षांचे अनुसरण करीत आहेत. आणि त्या माणसापेक्षा अधिक मार्गभ्रष्ट कोण आहे, जो आपल्या इच्छा आकांक्षांमागे धावत असेल, अल्लाहच्या मार्गदर्शनाविना? खात्रीने अल्लाह अत्याचारी लोकांना कदापि मार्ग दाखवित नाही. info
التفاسير: