قۇرئان كەرىم مەنىلىرىنىڭ تەرجىمىسى - مارتىنچە تەرجىمىسى - مۇھەممەد شەپىيئ ئەنسارى

بەت نومۇرى:close

external-link copy
106 : 4

وَّاسْتَغْفِرِ اللّٰهَ ؕ— اِنَّ اللّٰهَ كَانَ غَفُوْرًا رَّحِیْمًا ۟ۚ

१०६. आणि अल्लाहजवळ क्षमा-याचना करीत राहा. निःसंशय अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
107 : 4

وَلَا تُجَادِلْ عَنِ الَّذِیْنَ یَخْتَانُوْنَ اَنْفُسَهُمْ ؕ— اِنَّ اللّٰهَ لَا یُحِبُّ مَنْ كَانَ خَوَّانًا اَثِیْمًا ۟ۚۙ

१०७. आणि अशा लोकांशी बाजू घेऊन भांडू नका जे स्वतः आपलाच विश्वासघात करतात. निःसंशय, धोकेबाज विश्वासघातकीशी अल्लाह प्रेम राखत नाही. info
التفاسير:

external-link copy
108 : 4

یَّسْتَخْفُوْنَ مِنَ النَّاسِ وَلَا یَسْتَخْفُوْنَ مِنَ اللّٰهِ وَهُوَ مَعَهُمْ اِذْ یُبَیِّتُوْنَ مَا لَا یَرْضٰی مِنَ الْقَوْلِ ؕ— وَكَانَ اللّٰهُ بِمَا یَعْمَلُوْنَ مُحِیْطًا ۟

१०८. ते लोकांपासून तर लपतात, परंतु अल्लाहपासून लपू शकत नाही. तो त्यांच्यासोबत आहे जेव्हा ते रात्री अप्रिय गोष्टींच्या योजना आखतात आणि अल्लाहने त्यांच्या कारवायांना घेरा टाकलेला आहे. info
التفاسير:

external-link copy
109 : 4

هٰۤاَنْتُمْ هٰۤؤُلَآءِ جَدَلْتُمْ عَنْهُمْ فِی الْحَیٰوةِ الدُّنْیَا ۫— فَمَنْ یُّجَادِلُ اللّٰهَ عَنْهُمْ یَوْمَ الْقِیٰمَةِ اَمْ مَّنْ یَّكُوْنُ عَلَیْهِمْ وَكِیْلًا ۟

१०९. हे तुम्ही आहात की त्यांच्या हक्कात या जगात वाद घालता, परंतु कयामतच्या दिवशी त्यांच्यातर्फे कोण हुज्जत घालील आणि कोण त्यांचा समर्थक बनून उभा राहील? info
التفاسير:

external-link copy
110 : 4

وَمَنْ یَّعْمَلْ سُوْٓءًا اَوْ یَظْلِمْ نَفْسَهٗ ثُمَّ یَسْتَغْفِرِ اللّٰهَ یَجِدِ اللّٰهَ غَفُوْرًا رَّحِیْمًا ۟

११०. आणि जो कोणी वाईट कर्म करील किंवा स्वतः आपल्यावर अत्याचार करील, नंतर अल्लाहजवळ माफी मागील तर त्याला अल्लाह माफ करणारा, दया करणारा आढळून येईल. info
التفاسير:

external-link copy
111 : 4

وَمَنْ یَّكْسِبْ اِثْمًا فَاِنَّمَا یَكْسِبُهٗ عَلٰی نَفْسِهٖ ؕ— وَكَانَ اللّٰهُ عَلِیْمًا حَكِیْمًا ۟

१११. आणि जो गुन्हा करतो, तर त्या गुन्ह्याचे ओझे त्याच्याच (शिरा) वर आहे आणि अल्लाह सर्व काही जाणणारा, हिकमतशाली आहे. info
التفاسير:

external-link copy
112 : 4

وَمَنْ یَّكْسِبْ خَطِیْٓئَةً اَوْ اِثْمًا ثُمَّ یَرْمِ بِهٖ بَرِیْٓـًٔا فَقَدِ احْتَمَلَ بُهْتَانًا وَّاِثْمًا مُّبِیْنًا ۟۠

११२. आणि जो कोणी दुष्कर्म करतो, मग एखाद्या निरपराधीवर त्याचा आरोप ठेवतो, तर त्याने मोठे कुभांड(मोेठा आळ घेतला) रचले आणि फार मोठा गुन्हा केला. info
التفاسير:

external-link copy
113 : 4

وَلَوْلَا فَضْلُ اللّٰهِ عَلَیْكَ وَرَحْمَتُهٗ لَهَمَّتْ طَّآىِٕفَةٌ مِّنْهُمْ اَنْ یُّضِلُّوْكَ ؕ— وَمَا یُضِلُّوْنَ اِلَّاۤ اَنْفُسَهُمْ وَمَا یَضُرُّوْنَكَ مِنْ شَیْءٍ ؕ— وَاَنْزَلَ اللّٰهُ عَلَیْكَ الْكِتٰبَ وَالْحِكْمَةَ وَعَلَّمَكَ مَا لَمْ تَكُنْ تَعْلَمُ ؕ— وَكَانَ فَضْلُ اللّٰهِ عَلَیْكَ عَظِیْمًا ۟

११३. आणि जर तुमच्यावर अल्लाहची दया-कृपा राहिली नसती, तर त्यांच्या एका गटाने तुम्हाला मार्गभ्रष्ट करण्याचे कारस्थान रचले होते, परंतु ते स्वतःलाच मार्गभ्रष्ट करतात आणि ते तुम्हाला काहीच नुकसान पोहचवू शकत नाही आणि अल्लाहने तुमच्यावर ग्रंथ आणि ज्ञान उतरविले आहे आणि तुम्ही जे जाणत नव्हते ते ज्ञान प्रदान केले आहे आणि तुमच्यावर अल्लाहची फार मोठी कृपा आहे. info
التفاسير: