قۇرئان كەرىم مەنىلىرىنىڭ تەرجىمىسى - مارتىنچە تەرجىمىسى - مۇھەممەد شەپىيئ ئەنسارى

بەت نومۇرى:close

external-link copy
87 : 4

اَللّٰهُ لَاۤ اِلٰهَ اِلَّا هُوَ ؕ— لَیَجْمَعَنَّكُمْ اِلٰی یَوْمِ الْقِیٰمَةِ لَا رَیْبَ فِیْهِ ؕ— وَمَنْ اَصْدَقُ مِنَ اللّٰهِ حَدِیْثًا ۟۠

८७. अल्लाह तो आहे, ज्याच्याशिवाय दुसरा कोणी (सच्चा) उपास्य नाही. तो तुम्हा सर्वांना निश्चितच कयामतच्या दिवशी एकत्र करील, ज्याच्या येण्याबाबत काहीच शंका नाही. अल्लाहपेक्षा जास्त सत्य वचन आणखी कोणाचे असू शकेल? info
التفاسير:

external-link copy
88 : 4

فَمَا لَكُمْ فِی الْمُنٰفِقِیْنَ فِئَتَیْنِ وَاللّٰهُ اَرْكَسَهُمْ بِمَا كَسَبُوْا ؕ— اَتُرِیْدُوْنَ اَنْ تَهْدُوْا مَنْ اَضَلَّ اللّٰهُ ؕ— وَمَنْ یُّضْلِلِ اللّٰهُ فَلَنْ تَجِدَ لَهٗ سَبِیْلًا ۟

८८. तुम्हाला झाले तरी काय की मुनाफिकां (वरकरणी मुसलमानां) बाबत दोन गटांत विभागले जात आहात. त्यांना तर त्यांच्या करतूतींमुळे अल्लाहने तोंडघशी पाडले आहे. आता काय तुम्ही हे इच्छिता की त्याला मार्ग दाखवावा ज्याला अल्लाहने मार्गभ्रष्ट केले आहे? तेव्हा ज्याला अल्लाह मार्गभ्रष्ट करील, त्याच्यासाठी तुम्हाला कधीही, कोणताही मार्ग दिसून येणार नाही. info
التفاسير:

external-link copy
89 : 4

وَدُّوْا لَوْ تَكْفُرُوْنَ كَمَا كَفَرُوْا فَتَكُوْنُوْنَ سَوَآءً فَلَا تَتَّخِذُوْا مِنْهُمْ اَوْلِیَآءَ حَتّٰی یُهَاجِرُوْا فِیْ سَبِیْلِ اللّٰهِ ؕ— فَاِنْ تَوَلَّوْا فَخُذُوْهُمْ وَاقْتُلُوْهُمْ حَیْثُ وَجَدْتُّمُوْهُمْ ۪— وَلَا تَتَّخِذُوْا مِنْهُمْ وَلِیًّا وَّلَا نَصِیْرًا ۟ۙ

८९. यांना तर मनापासून वाटते की, जसे ते काफिर आहेत तसे तुम्हीही त्यांच्यासारखे ईमानाचा इन्कार करू लागावे आणि तुम्ही सर्व एकसमान व्हावे, यास्तव त्यांच्यापैकी कोणाला आपला खराखुरा मित्र बनवू नका, जोपर्यंत ते अल्लाहच्या मार्गात हिजरत (देश-त्याग) करीत नाहीत. मग जर (यापासून) तोंड फिरवतील तर त्यांना धरा आणि ठार करा, जिथेदेखील आढळतील. खबरदार! त्यांच्यापैकी कोणालाही आपला मित्र आणि सहाय्यक समजून घेऊ नका. info
التفاسير:

external-link copy
90 : 4

اِلَّا الَّذِیْنَ یَصِلُوْنَ اِلٰی قَوْمٍ بَیْنَكُمْ وَبَیْنَهُمْ مِّیْثَاقٌ اَوْ جَآءُوْكُمْ حَصِرَتْ صُدُوْرُهُمْ اَنْ یُّقَاتِلُوْكُمْ اَوْ یُقَاتِلُوْا قَوْمَهُمْ ؕ— وَلَوْ شَآءَ اللّٰهُ لَسَلَّطَهُمْ عَلَیْكُمْ فَلَقٰتَلُوْكُمْ ۚ— فَاِنِ اعْتَزَلُوْكُمْ فَلَمْ یُقَاتِلُوْكُمْ وَاَلْقَوْا اِلَیْكُمُ السَّلَمَ ۙ— فَمَا جَعَلَ اللّٰهُ لَكُمْ عَلَیْهِمْ سَبِیْلًا ۟

९०. परंतु जे त्या लोकांशी नाते राखतात, ज्यांच्या आणि तुमच्या दरम्यान समझोता झालेला असेल किंवा ते लोक जे तुमच्या जवळ येतात, ज्यांची मने संकुचित झाली आहेत की तुमच्याशी लढावे की आपल्या लोकांशी लढावे. अल्लाहने इच्छिले असते तर यांना तुमच्यावर वर्चस्व प्रदान केले असते आणि ते अवश्य तुमच्याशी लढले असते. तेव्हा जर असे लोक तुमच्यापासून दूर राहतील आणि लढाई न करतील आणि तुमच्याकडे संधी-समझोत्याचा प्रस्ताव मांडतील तर (अशा स्थितीत) अल्लाहने तुमच्यासाठी, त्यांच्याविरूद्ध लढाईचा कोणताही मार्ग ठेवला नाही. info
التفاسير:

external-link copy
91 : 4

سَتَجِدُوْنَ اٰخَرِیْنَ یُرِیْدُوْنَ اَنْ یَّاْمَنُوْكُمْ وَیَاْمَنُوْا قَوْمَهُمْ ؕ— كُلَّ مَا رُدُّوْۤا اِلَی الْفِتْنَةِ اُرْكِسُوْا فِیْهَا ۚ— فَاِنْ لَّمْ یَعْتَزِلُوْكُمْ وَیُلْقُوْۤا اِلَیْكُمُ السَّلَمَ وَیَكُفُّوْۤا اَیْدِیَهُمْ فَخُذُوْهُمْ وَاقْتُلُوْهُمْ حَیْثُ ثَقِفْتُمُوْهُمْ ؕ— وَاُولٰٓىِٕكُمْ جَعَلْنَا لَكُمْ عَلَیْهِمْ سُلْطٰنًا مُّبِیْنًا ۟۠

९१. तुम्हाला दुसरे काही असेही लोक आढळतील, जे तुमच्यापासून आणि आपल्या जमातीच्या लोकांपासून सुरक्षित राहू इच्छितात, परंतु जेव्हा उपद्रवाकडे त्यांना वळविले जाते तर त्यात तोंडघशी पडतात. जर ते तुमच्यापासून हटले नाहीत आणि तुमच्याशी समझोता न करतील आणि आपले हात न रोखतील तर ते जिथे सापडतील तिथे त्यांना धरा आणि ठार करा. हेच ते लोक आहेत, ज्यांच्याबाबत आम्ही तुम्हाला खुले प्रमाण दिले आहे. info
التفاسير: