(१) अर्थात त्यांना असे समूळ नष्ट केले की त्यांच्या विनाशाची कहाणी प्रत्येक जीभेवर बसली आणि ते सभा - बैठकीत चर्चेचा विषय बनले. (२) अर्थात त्यांना विभाजित करून टाकले इतस्ततः विखरून टाकले जसे की सबाच्या प्रसिद्ध जमाती अनेक ठिकाणी जाऊन आबाद झाल्या. कोणी यसरिब आणि मक्का येथे आला, कोणी सीरिया प्रांतात निघून गेला, कोणी कोठे तर कोणी कोठे.