د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

د مخ نمبر:close

external-link copy
15 : 34

لَقَدْ كَانَ لِسَبَاٍ فِیْ مَسْكَنِهِمْ اٰیَةٌ ۚ— جَنَّتٰنِ عَنْ یَّمِیْنٍ وَّشِمَالٍ ؕ۬— كُلُوْا مِنْ رِّزْقِ رَبِّكُمْ وَاشْكُرُوْا لَهٗ ؕ— بَلْدَةٌ طَیِّبَةٌ وَّرَبٌّ غَفُوْرٌ ۟

१५. सबाच्या जनसमूहाकरिता, त्यांच्या वस्तींमध्येच (अल्लाहच्या सामर्थ्याची) निशाणी होती. त्यांच्या उजव्या डाव्या बाजूला दोन बागा होत्या. (आम्ही त्यांना आदेश दिला होता की) आपल्या पालनकर्त्याने प्रदान केलेली आजिविका खा आणि त्याचे आभार मानत राहा. ही स्वच्छ - शुद्ध भूमी आहे आणि पालनकर्ता क्षमाशील आहे. info
التفاسير:

external-link copy
16 : 34

فَاَعْرَضُوْا فَاَرْسَلْنَا عَلَیْهِمْ سَیْلَ الْعَرِمِ وَبَدَّلْنٰهُمْ بِجَنَّتَیْهِمْ جَنَّتَیْنِ ذَوَاتَیْ اُكُلٍ خَمْطٍ وَّاَثْلٍ وَّشَیْءٍ مِّنْ سِدْرٍ قَلِیْلٍ ۟

१६. परंतु त्यांनी तोंड फिरविले, मग आम्ही त्यांच्यावर वेगवान महापुराचे (पाणी) पाठविले आणि त्यांच्या (हिरव्या टवटवीत) बागांऐवजी दोन (अशा) बागा दिल्या, ज्या स्वादात कडवट आणि अधिकांश झाडे-झुडपे आणि काही बोरींची झाडे असलेल्या होत्या. info
التفاسير:

external-link copy
17 : 34

ذٰلِكَ جَزَیْنٰهُمْ بِمَا كَفَرُوْا ؕ— وَهَلْ نُجٰزِیْۤ اِلَّا الْكَفُوْرَ ۟

१७. आम्ही त्यांच्या कृतघ्नतेचा हा मोबदला त्यांना दिला. आम्ही (अशी सक्त) सजा मोठमोठ्या कृतघ्न लोकांनाच देतो. info
التفاسير:

external-link copy
18 : 34

وَجَعَلْنَا بَیْنَهُمْ وَبَیْنَ الْقُرَی الَّتِیْ بٰرَكْنَا فِیْهَا قُرًی ظَاهِرَةً وَّقَدَّرْنَا فِیْهَا السَّیْرَ ؕ— سِیْرُوْا فِیْهَا لَیَالِیَ وَاَیَّامًا اٰمِنِیْنَ ۟

१८. आणि आम्ही त्याच्या व त्या वस्तींच्या दरम्यान, ज्यांच्यात आम्ही सुख-समृद्धी प्रदान करून ठेवली होती. काही वस्त्या दुसऱ्या ठेवल्या होत्या, ज्या, मार्गावर दिसून येत होत्या आणि त्यांच्यात चालण्याची (प्रवासाची) ठिकाणे निश्चित केली होती, त्यात रात्री आणि दिवसा शांती सुरक्षापूर्वक हिंडत फिरत राहा. info
التفاسير:

external-link copy
19 : 34

فَقَالُوْا رَبَّنَا بٰعِدْ بَیْنَ اَسْفَارِنَا وَظَلَمُوْۤا اَنْفُسَهُمْ فَجَعَلْنٰهُمْ اَحَادِیْثَ وَمَزَّقْنٰهُمْ كُلَّ مُمَزَّقٍ ؕ— اِنَّ فِیْ ذٰلِكَ لَاٰیٰتٍ لِّكُلِّ صَبَّارٍ شَكُوْرٍ ۟

१९. परंतु त्यांनी दुसऱ्यांदा दुआ (प्रार्थना) केली की हे आमच्या पालनकर्त्या! आमचे प्रवास दूर दूरपर्यंत कर आणि ज्याअर्थी त्यांनी स्वतः आपल्या हातांनी आपले वाईट करून घेतले, यास्तव आम्ही त्यांना (जुन्या) कहाणीच्या रूपात करून टाकले२ आणि त्यांचे तुकडे तुकडे करुन टाकलेत३ निःसंशय, प्रत्येक सहनशील आणि कृतज्ञशील माणसाकरिता या (घटने) त अनेक निशाण्या आहेत. info

(१) अर्थात त्यांना असे समूळ नष्ट केले की त्यांच्या विनाशाची कहाणी प्रत्येक जीभेवर बसली आणि ते सभा - बैठकीत चर्चेचा विषय बनले. (२) अर्थात त्यांना विभाजित करून टाकले इतस्ततः विखरून टाकले जसे की सबाच्या प्रसिद्ध जमाती अनेक ठिकाणी जाऊन आबाद झाल्या. कोणी यसरिब आणि मक्का येथे आला, कोणी सीरिया प्रांतात निघून गेला, कोणी कोठे तर कोणी कोठे.

التفاسير:

external-link copy
20 : 34

وَلَقَدْ صَدَّقَ عَلَیْهِمْ اِبْلِیْسُ ظَنَّهٗ فَاتَّبَعُوْهُ اِلَّا فَرِیْقًا مِّنَ الْمُؤْمِنِیْنَ ۟

२०. आणि सैतानाने त्यांच्याविषयी आपला इरादा (अनुमान) खरा करून दाखविला, हे लोक (सर्वच्या सर्व) त्याचे अनुयायी बनले, ईमान राखणाऱ्यांच्या एका गटाखेरीज. info
التفاسير:

external-link copy
21 : 34

وَمَا كَانَ لَهٗ عَلَیْهِمْ مِّنْ سُلْطٰنٍ اِلَّا لِنَعْلَمَ مَنْ یُّؤْمِنُ بِالْاٰخِرَةِ مِمَّنْ هُوَ مِنْهَا فِیْ شَكٍّ ؕ— وَرَبُّكَ عَلٰی كُلِّ شَیْءٍ حَفِیْظٌ ۟۠

२१. आणि सैतानाचा त्यांच्यावर कोणताही दबाव (आणि जोर) नव्हता, परंतु अशासाठी की आम्ही त्या लोकांना, जे आखिरतवर ईमान राखतात, त्या लोकांमध्ये (चांगल्या प्रकारे) जाहीर करावे, जे त्याबाबत संशयग्रस्त आहेत, आणि तुमचा पालनकर्ता प्रत्येक गोष्टीचा संरक्षक आहे. info
التفاسير:

external-link copy
22 : 34

قُلِ ادْعُوا الَّذِیْنَ زَعَمْتُمْ مِّنْ دُوْنِ اللّٰهِ ۚ— لَا یَمْلِكُوْنَ مِثْقَالَ ذَرَّةٍ فِی السَّمٰوٰتِ وَلَا فِی الْاَرْضِ وَمَا لَهُمْ فِیْهِمَا مِنْ شِرْكٍ وَّمَا لَهٗ مِنْهُمْ مِّنْ ظَهِیْرٍ ۟

२२. सांगा की अल्लाहखेरीज ज्यांचा ज्यांचा तुम्हाला (उपास्य असण्याचा) भ्रम आहे (त्या सर्वांना) हाक द्या. त्यांच्यापैकी ना कोणाला आकाशांमध्ये आणि धरतीत कणाइतकाही अधिकार आहे, ना त्यांचा या दोघांत कसलाही हिस्सा आहे आणि ना त्यांच्यापैकी कोणी अल्लाहचा सहभागी आहे. info
التفاسير: