Kur'an-ı Kerim meal tercümesi - Marathi Dili Tercüme - Muhammed Şefi' Ensari

Sûretu'n-Nâziât

external-link copy
1 : 79

وَالنّٰزِعٰتِ غَرْقًا ۟ۙ

१. बुडून कठोरतापूर्वक खेचणाऱ्यांची शपथ.१ info

(१) हे प्राण काढणाऱ्या फरिश्त्या ंचे वर्णन आहे. फरिश्ते काफिरांचे प्राण मोठ्या कठोरपणे काढतात आणि तेही शरीरात बुडून.

التفاسير:

external-link copy
2 : 79

وَّالنّٰشِطٰتِ نَشْطًا ۟ۙ

२. बंधन उकलून सोडविणाऱ्यांची शपथ. info
التفاسير:

external-link copy
3 : 79

وَّالسّٰبِحٰتِ سَبْحًا ۟ۙ

३. आणि पोहणाऱ्या फिरणाऱ्यांची शपथ. १ info

(१) फरिश्त्ये प्राण काढण्यासाठी माणसाच्या शरीरात असे पोहत फिरतात, जणू पाण्यात तळाशी जाणारा पाणबुड्या मोती काढण्यासाठी समुद्रात अगदी खोलवर पोहत फिरतो किंवा असा अर्थ की अतिशय वेगाने फरिश्ते अल्लाहचा आदेश घेऊन आकाशातून उतरतात कारण वेगवान घोड्यालाही ‘सबिअ’ म्हणतात.

التفاسير:

external-link copy
4 : 79

فَالسّٰبِقٰتِ سَبْقًا ۟ۙ

४. मग धावत पुढे जाणाऱ्यांची शपथ! info
التفاسير:

external-link copy
5 : 79

فَالْمُدَبِّرٰتِ اَمْرًا ۟ۘ

५. मग कार्याची योजना करणाऱ्यांची शपथ! info
التفاسير:

external-link copy
6 : 79

یَوْمَ تَرْجُفُ الرَّاجِفَةُ ۟ۙ

६. ज्या दिवशी थरथर कांपणारी थरथर कांपेल, info
التفاسير:

external-link copy
7 : 79

تَتْبَعُهَا الرَّادِفَةُ ۟ؕ

७. त्यानंतर एक मागे येणारी (मागोमाग) येईल. info
التفاسير:

external-link copy
8 : 79

قُلُوْبٌ یَّوْمَىِٕذٍ وَّاجِفَةٌ ۟ۙ

८. (अनेक) हृदय त्या दिवशी धडधड करतील. info
التفاسير:

external-link copy
9 : 79

اَبْصَارُهَا خَاشِعَةٌ ۟ۘ

९. ज्यांच्या नजरा खाली असतील. info
التفاسير:

external-link copy
10 : 79

یَقُوْلُوْنَ ءَاِنَّا لَمَرْدُوْدُوْنَ فِی الْحَافِرَةِ ۟ؕ

१०. असे म्हणतात की, काय आम्हाला पहिल्यासारख्या अवस्थेकडे पुन्हा परतविले जाईल? info
التفاسير:

external-link copy
11 : 79

ءَاِذَا كُنَّا عِظَامًا نَّخِرَةً ۟ؕ

११. काय अशा वेळी की जेव्हा आम्ही अगदी जीर्णशीर्ण हाडे होऊन जाऊ? info
التفاسير:

external-link copy
12 : 79

قَالُوْا تِلْكَ اِذًا كَرَّةٌ خَاسِرَةٌ ۟ۘ

१२. म्हणतात की मग तर हे परतणे नुकसानदायक आहे. (माहीत असले पाहिजे) info
التفاسير:

external-link copy
13 : 79

فَاِنَّمَا هِیَ زَجْرَةٌ وَّاحِدَةٌ ۟ۙ

१३. की ती तर केवळ एक (भयानक) दरडावणी आहे. info
التفاسير:

external-link copy
14 : 79

فَاِذَا هُمْ بِالسَّاهِرَةِ ۟ؕ

१४. (जी दिली जाताच) ते एकदम मैदानात जमा होतील. info
التفاسير:

external-link copy
15 : 79

هَلْ اَتٰىكَ حَدِیْثُ مُوْسٰی ۟ۘ

१५. काय, मूसा (अलैहिस्सलाम) चा वृत्तांत तुम्हास पोहचला आहे? info
التفاسير:

external-link copy
16 : 79

اِذْ نَادٰىهُ رَبُّهٗ بِالْوَادِ الْمُقَدَّسِ طُوًی ۟ۚ

१६. जेव्हा त्यांना त्यांच्या पालनकर्त्याने तूवाच्या पवित्र मैदानात पुकारले. info
التفاسير:

external-link copy
17 : 79

اِذْهَبْ اِلٰی فِرْعَوْنَ اِنَّهٗ طَغٰی ۟ؗۖ

१७. (की) तुम्ही फिरऔनजवळ जा, त्याने बंडखोरी (उदंडता) अंगीकारली आहे. info
التفاسير:

external-link copy
18 : 79

فَقُلْ هَلْ لَّكَ اِلٰۤی اَنْ تَزَكّٰی ۟ۙ

१८. त्याला सांगा की, काय तू स्वतःची दुरुस्ती आणि सुधारणा इच्छितो. info
التفاسير:

external-link copy
19 : 79

وَاَهْدِیَكَ اِلٰی رَبِّكَ فَتَخْشٰی ۟ۚ

१९. आणि हे की मी तुला तुझ्या पालनकर्त्याचा मार्ग दाखवू यासाठी की तू (त्याचे) भय बाळगू लागावे. info
التفاسير:

external-link copy
20 : 79

فَاَرٰىهُ الْاٰیَةَ الْكُبْرٰی ۟ؗۖ

२०. तेव्हा त्याला मोठी निशाणी दाखविली. info
التفاسير:

external-link copy
21 : 79

فَكَذَّبَ وَعَصٰی ۟ؗۖ

२१. तर त्याने खोटे ठरविले आणि अवज्ञा केली. info
التفاسير:

external-link copy
22 : 79

ثُمَّ اَدْبَرَ یَسْعٰی ۟ؗۖ

२२. मग पुन्हा परतला प्रयत्न करीत१ info

(१) अर्थात त्याने ईमान आणि आदेशाचा केवळ इन्कारच केला नाही तर धरतीत उत्पात माजविण्याचा आणि हजरत मूसाशी सामना (विरोध) करण्याचा प्रयत्न करीत राहिला आणि जादूगारांना एकत्र करून मूसा (अलै.) यांच्याशी सामना करविला यासाठी की त्यांना खोटे ठरविले जाऊ शकावे.

التفاسير:

external-link copy
23 : 79

فَحَشَرَ ۫— فَنَادٰی ۟ؗۖ

२३. मग सर्वांना एकत्र करून उंच स्वरात ऐलान केले. info
التفاسير:

external-link copy
24 : 79

فَقَالَ اَنَا رَبُّكُمُ الْاَعْلٰی ۟ؗۖ

२४. म्हणाला, तुम्हा सर्वांचा पालनहार मीच आहे. info
التفاسير:

external-link copy
25 : 79

فَاَخَذَهُ اللّٰهُ نَكَالَ الْاٰخِرَةِ وَالْاُوْلٰی ۟ؕ

२५. तेव्हा (सर्वोच्च व सर्वश्रेष्ठ) अल्लाहने देखील त्याला आखिरत (मरणोत्तर जीवना) च्या आणि या जगाच्या शिक्षा - यातनेत घेरले. info
التفاسير:

external-link copy
26 : 79

اِنَّ فِیْ ذٰلِكَ لَعِبْرَةً لِّمَنْ یَّخْشٰی ۟ؕ۠

२६. निःसंशय, यात त्या माणसाकरिता बोध आहे, जो भय राखील. info
التفاسير:

external-link copy
27 : 79

ءَاَنْتُمْ اَشَدُّ خَلْقًا اَمِ السَّمَآءُ ؕ— بَنٰىهَا ۟۫

२७. काय तुम्हाला निर्माण करणे अधिक कठीण आहे किंवा आकाशाला? सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्याला निर्माण केले. info
التفاسير:

external-link copy
28 : 79

رَفَعَ سَمْكَهَا فَسَوّٰىهَا ۟ۙ

२८. त्याची उंची वाढविली, मग त्याला यथायोग्य केले. info
التفاسير:

external-link copy
29 : 79

وَاَغْطَشَ لَیْلَهَا وَاَخْرَجَ ضُحٰىهَا ۪۟

२९. आणि त्याच्या रात्रीला अंधकारपूर्ण बनविले आणि त्याच्या दिवसाला प्रकट केले. info
التفاسير:

external-link copy
30 : 79

وَالْاَرْضَ بَعْدَ ذٰلِكَ دَحٰىهَا ۟ؕ

३०. आणि त्यानंतर जमिनीला (समतल) बिछविले. info
التفاسير:

external-link copy
31 : 79

اَخْرَجَ مِنْهَا مَآءَهَا وَمَرْعٰىهَا ۪۟

३१. त्यातून पाणी आणि चारा काढला. info
التفاسير:

external-link copy
32 : 79

وَالْجِبَالَ اَرْسٰىهَا ۟ۙ

३२. आणि पर्वतांना (मजबूत) रोवले. info
التفاسير:

external-link copy
33 : 79

مَتَاعًا لَّكُمْ وَلِاَنْعَامِكُمْ ۟ؕ

३३. हे सर्व तुमच्या आणि तुमच्या जनावरांच्या फायद्यासाठी (आहे). info
التفاسير:

external-link copy
34 : 79

فَاِذَا جَآءَتِ الطَّآمَّةُ الْكُبْرٰی ۟ؗۖ

३४. तर जेव्हा ते मोठे संकट (कयामत) येईल. info
التفاسير:

external-link copy
35 : 79

یَوْمَ یَتَذَكَّرُ الْاِنْسَانُ مَا سَعٰی ۟ۙ

३५. ज्या दिवशी मनुष्य आपल्या केलेल्या कर्मांची आठवण करील. info
التفاسير:

external-link copy
36 : 79

وَبُرِّزَتِ الْجَحِیْمُ لِمَنْ یَّرٰی ۟

३६. आणि (प्रत्येक) पाहणाऱ्याच्या समोर जहन्नम उघडपणे आणली जाईल. info
التفاسير:

external-link copy
37 : 79

فَاَمَّا مَنْ طَغٰی ۟ۙ

३७. तेव्हा, ज्या (माणसा) ने विद्रोह अंगीकारला (असेल). info
التفاسير:

external-link copy
38 : 79

وَاٰثَرَ الْحَیٰوةَ الدُّنْیَا ۟ۙ

३८. आणि ऐहिक जीवनाला प्राधान्य दिले (असेल). info
التفاسير:

external-link copy
39 : 79

فَاِنَّ الْجَحِیْمَ هِیَ الْمَاْوٰی ۟ؕ

३९. (त्याचे) ठिकाण जहन्नमच आहे. info
التفاسير:

external-link copy
40 : 79

وَاَمَّا مَنْ خَافَ مَقَامَ رَبِّهٖ وَنَهَی النَّفْسَ عَنِ الْهَوٰی ۟ۙ

४०. तथापि, जो मनुष्य आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्यापासून भीत राहिला असेल आणि आपल्या मनाला इच्छा-अभिलाषांपासून रोखले असेल. info
التفاسير:

external-link copy
41 : 79

فَاِنَّ الْجَنَّةَ هِیَ الْمَاْوٰی ۟ؕ

४१. तर त्याचे ठिकाण जन्नतच आहे. info
التفاسير:

external-link copy
42 : 79

یَسْـَٔلُوْنَكَ عَنِ السَّاعَةِ اَیَّانَ مُرْسٰىهَا ۟ؕ

४२. लोक तुम्हाला कयामत केव्हा घडून येईल असे विचारतात. info
التفاسير:

external-link copy
43 : 79

فِیْمَ اَنْتَ مِنْ ذِكْرٰىهَا ۟ؕ

४३. ते सांगण्याशी तुमचा काय संबंध? info
التفاسير:

external-link copy
44 : 79

اِلٰی رَبِّكَ مُنْتَهٰىهَا ۟ؕ

४४. तिच्या ज्ञानाची अंतिम सीमा तर अल्लाहकडे आहे. info
التفاسير:

external-link copy
45 : 79

اِنَّمَاۤ اَنْتَ مُنْذِرُ مَنْ یَّخْشٰىهَا ۟ؕ

४५. तुम्ही तर फक्त तिच्याशी भयभीत राहणाऱ्यांना सावधान करणारे आहात.१ info

(१) अर्थात तुमचे काम केवळ ‘इन्ज़ार’ (भय दाखविणे) आहे, परोक्ष (गैब) च्या वार्ता देणे नव्हे, ज्यात कयामतचे ज्ञान आहे जे अल्लाहने कोणालाही दिले नाही. ‘मनयख्‌शाहा’ अशासाठी म्हटले आहे की तंबी (चेतावणी) आणि धर्म-प्रचाराचा खरा लाभ त्यालाच मिळतो, ज्याच्या मनात अल्लाहचे भय असते, अन्यथा खबरदार करण्याचा आणि संदेश पोहचविण्याचा आदेश तर प्रत्येक माणसाकरिता आहे.

التفاسير:

external-link copy
46 : 79

كَاَنَّهُمْ یَوْمَ یَرَوْنَهَا لَمْ یَلْبَثُوْۤا اِلَّا عَشِیَّةً اَوْ ضُحٰىهَا ۟۠

४६. ज्या दिवशी हे तिला (प्रत्यक्ष) पाहून घेतील तेव्हा असे वाटेल की केवळ दिवसाचा अंतिम भाग अथवा आरंभीचा भागच ते (या जगात) राहिलेत. info
التفاسير: