Kur'an-ı Kerim meal tercümesi - Marathi Dili Tercüme - Muhammed Şefi' Ensari

Sayfa numarası:close

external-link copy
32 : 5

مِنْ اَجْلِ ذٰلِكَ ؔۛۚ— كَتَبْنَا عَلٰی بَنِیْۤ اِسْرَآءِیْلَ اَنَّهٗ مَنْ قَتَلَ نَفْسًا بِغَیْرِ نَفْسٍ اَوْ فَسَادٍ فِی الْاَرْضِ فَكَاَنَّمَا قَتَلَ النَّاسَ جَمِیْعًا ؕ— وَمَنْ اَحْیَاهَا فَكَاَنَّمَاۤ اَحْیَا النَّاسَ جَمِیْعًا ؕ— وَلَقَدْ جَآءَتْهُمْ رُسُلُنَا بِالْبَیِّنٰتِ ؗ— ثُمَّ اِنَّ كَثِیْرًا مِّنْهُمْ بَعْدَ ذٰلِكَ فِی الْاَرْضِ لَمُسْرِفُوْنَ ۟

३२. याच कारणाने आम्ही इस्राईलच्या संततीकरिता निर्धारीत केले की जो मनुष्य एखाद्याची, याविना की तो एखाद्याचा मारेकरी असेल, किंवा धरतीवर उत्पात माजविणारा असेल, हत्या करील तर त्याने जणू समस्त लोकांची हत्या केली आणि जो मनुष्य एखाद्याचा जीव वाचवील, तर त्याने जणू समस्त मानवांना जीवन-दान दिले आणि त्यांच्याजवळ आमचे रसूल (पैगंबर) अनेक स्पष्ट निशाण्या घेऊन आले, परंतु तरीही त्यांच्यापैकी अधिकांश लोक जुलूम-अत्याचार करणारेच राहिले. info
التفاسير:

external-link copy
33 : 5

اِنَّمَا جَزٰٓؤُا الَّذِیْنَ یُحَارِبُوْنَ اللّٰهَ وَرَسُوْلَهٗ وَیَسْعَوْنَ فِی الْاَرْضِ فَسَادًا اَنْ یُّقَتَّلُوْۤا اَوْ یُصَلَّبُوْۤا اَوْ تُقَطَّعَ اَیْدِیْهِمْ وَاَرْجُلُهُمْ مِّنْ خِلَافٍ اَوْ یُنْفَوْا مِنَ الْاَرْضِ ؕ— ذٰلِكَ لَهُمْ خِزْیٌ فِی الدُّنْیَا وَلَهُمْ فِی الْاٰخِرَةِ عَذَابٌ عَظِیْمٌ ۟ۙ

३३. जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबराशी युद्ध करतात आणि धरतीवर फसाद (उत्पात) माजवितात तर त्यांना या अपराधाची शिक्षा म्हणून ठार मारले पाहिजे, किंवा त्यांना सूळावर चढविले पाहिजे किंवा त्यांचा एका बाजूचा हात आणि दुसऱ्या बाजूचा पाय कापून टाकला जावा अथवा त्यांना देशाबाहेर काढले जावे. ही अपमानाची शिक्षा त्यांना या जगाच्या जीवनात आहे आणि आखिरतमध्ये तर त्यांच्यासाठी महाभयंकर अज़ाब (शिक्षा-यातना) आहे. info
التفاسير:

external-link copy
34 : 5

اِلَّا الَّذِیْنَ تَابُوْا مِنْ قَبْلِ اَنْ تَقْدِرُوْا عَلَیْهِمْ ۚ— فَاعْلَمُوْۤا اَنَّ اللّٰهَ غَفُوْرٌ رَّحِیْمٌ ۟۠

३४. तथापि ज्यांनी पकडीत येण्यापूर्वीच तौबा (क्षमा-याचना) केली असेल तर खात्रीने अल्लाह मोठा माफ करणारा, मोठा मेहरबान आहे. info
التفاسير:

external-link copy
35 : 5

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوا اتَّقُوا اللّٰهَ وَابْتَغُوْۤا اِلَیْهِ الْوَسِیْلَةَ وَجَاهِدُوْا فِیْ سَبِیْلِهٖ لَعَلَّكُمْ تُفْلِحُوْنَ ۟

३५. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहचे भय बाळगून राहा आणि त्याच्या दिशेने सान्निध्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करा१ आणि त्याच्या मार्गात जिहाद करा, यासाठी की तुम्हाला सफलता लाभावी. info

(१) मूळ शब्द ‘वसीला’ अर्थात हेतुप्राप्तीसाठी व निकटता प्राप्त करण्यासाठी प्रयोगात आणले जाणारे माध्यम. ‘अल्लाहचे जवळीक प्राप्त करण्याचे साधन शोधा’चा खरा अर्थ असे कर्म की ज्यामुळे तुम्हाला अल्लाहची मर्जी आणि त्याचे जवळीव लाभावे. इमाम शौकानीच्या कथनानुसार वसीला म्हणजे ते सत्कर्म की ज्याद्वारे मनुष्य अल्लाहचे जवळीव प्राप्त करतो. त्याचप्रमाणे वर्जित आणि हराम केलेल्या वस्तू आणि कर्मापासून अलिप्त राहिल्यानेही अल्लाहचे जवळीक प्राप्त होते. तथापि मूर्ख लोकांनी हे खरे माध्यम सोडून कबरीत गाडल्या गेलेल्या लोकांना आपला ‘वसीला’ बनवून घेतले आहे, ज्याला इस्लामी धर्मशास्त्रात तिळमात्र जागा नाही.

التفاسير:

external-link copy
36 : 5

اِنَّ الَّذِیْنَ كَفَرُوْا لَوْ اَنَّ لَهُمْ مَّا فِی الْاَرْضِ جَمِیْعًا وَّمِثْلَهٗ مَعَهٗ لِیَفْتَدُوْا بِهٖ مِنْ عَذَابِ یَوْمِ الْقِیٰمَةِ مَا تُقُبِّلَ مِنْهُمْ ۚ— وَلَهُمْ عَذَابٌ اَلِیْمٌ ۟

३६. निःसंशय, जे लोक काफिर (इन्कारी) आहेत, त्यांनी जर अल्लाहच्या शिक्षा-यातने (अज़ाब) पासून सुटका होण्याकरिता, धरतीवर जे काही आहे, ते सर्वच्या सर्व दंड म्हणून देऊन टाकले आणि तेवढेच आणखी घेऊन आले, तरीदेखील कयामतीच्या दिवशी अज़ाबपासून सुटका होण्याकरिता कबूल केले जाणार नाही, आणि त्यांच्याकरिता दुःखदायक शिक्षा-यातनेचा क्रम जारी राहील. info
التفاسير: