Kur'an-ı Kerim meal tercümesi - Marathi Dili Tercüme - Muhammed Şefi' Ensari

Sayfa numarası:close

external-link copy
71 : 5

وَحَسِبُوْۤا اَلَّا تَكُوْنَ فِتْنَةٌ فَعَمُوْا وَصَمُّوْا ثُمَّ تَابَ اللّٰهُ عَلَیْهِمْ ثُمَّ عَمُوْا وَصَمُّوْا كَثِیْرٌ مِّنْهُمْ ؕ— وَاللّٰهُ بَصِیْرٌ بِمَا یَعْمَلُوْنَ ۟

७१. आणि समजून बसले की काहीच शिक्षा मिळणार नाही, यास्तव आंधळे बहीरे झाले, तरीही अल्लाहने त्यांना माफ केले.असे असतानाही त्यांच्यापैकी अधिकांश लोक आंधळे बहीरे झाले आणि अल्लाह त्यांच्या कर्मांना खूप चांगल्या प्रकारे पाहणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
72 : 5

لَقَدْ كَفَرَ الَّذِیْنَ قَالُوْۤا اِنَّ اللّٰهَ هُوَ الْمَسِیْحُ ابْنُ مَرْیَمَ ؕ— وَقَالَ الْمَسِیْحُ یٰبَنِیْۤ اِسْرَآءِیْلَ اعْبُدُوا اللّٰهَ رَبِّیْ وَرَبَّكُمْ ؕ— اِنَّهٗ مَنْ یُّشْرِكْ بِاللّٰهِ فَقَدْ حَرَّمَ اللّٰهُ عَلَیْهِ الْجَنَّةَ وَمَاْوٰىهُ النَّارُ ؕ— وَمَا لِلظّٰلِمِیْنَ مِنْ اَنْصَارٍ ۟

७२. ते लोक काफिर (इन्कारी) झालेत, ज्यांनी म्हटले की मरियमचा पुत्र मसीह हाच अल्लाह आहे, वास्तविक मसीहने (स्वतः) म्हटले की हे इस्राईलच्या पुत्रांनो! माझ्या आणि तुमच्या पालनकर्त्या अल्लाहची उपासना करा कारण जो कोणी अल्लाहसोबत दुसऱ्याला सहभागी ठरवील तर अल्लाहने त्याच्यासाठी जन्नत हराम केली आहे आणि त्याचे ठिकाण जहन्नम आहे, आणि अत्याचारी लोकांचा कोणीही मदत करणारा नसेल. info
التفاسير:

external-link copy
73 : 5

لَقَدْ كَفَرَ الَّذِیْنَ قَالُوْۤا اِنَّ اللّٰهَ ثَالِثُ ثَلٰثَةٍ ۘ— وَمَا مِنْ اِلٰهٍ اِلَّاۤ اِلٰهٌ وَّاحِدٌ ؕ— وَاِنْ لَّمْ یَنْتَهُوْا عَمَّا یَقُوْلُوْنَ لَیَمَسَّنَّ الَّذِیْنَ كَفَرُوْا مِنْهُمْ عَذَابٌ اَلِیْمٌ ۟

७३. ते लोकही पूर्णतः काफिर झाले, ज्यांनी म्हटले की अल्लाह तीनचा तिसरा आहे. वास्तविक अल्लाहशिवाय कोणीही उपास्य नाही आणि जर हे लोक असे बोलणे सोडणार नाहीत तर त्यांच्यापैकी जे इन्कार करत राहतील तर त्यांना निश्चितच मोठा सक्त अज़ाब पोहोचेल. info
التفاسير:

external-link copy
74 : 5

اَفَلَا یَتُوْبُوْنَ اِلَی اللّٰهِ وَیَسْتَغْفِرُوْنَهٗ ؕ— وَاللّٰهُ غَفُوْرٌ رَّحِیْمٌ ۟

७४. हे लोक अल्लाहकडे का नाही झुकत आणि का नाही क्षमा याचना करीत? अल्लाह अतिशय माफ करणारा आणि मोठा दया करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
75 : 5

مَا الْمَسِیْحُ ابْنُ مَرْیَمَ اِلَّا رَسُوْلٌ ۚ— قَدْ خَلَتْ مِنْ قَبْلِهِ الرُّسُلُ ؕ— وَاُمُّهٗ صِدِّیْقَةٌ ؕ— كَانَا یَاْكُلٰنِ الطَّعَامَ ؕ— اُنْظُرْ كَیْفَ نُبَیِّنُ لَهُمُ الْاٰیٰتِ ثُمَّ انْظُرْ اَنّٰی یُؤْفَكُوْنَ ۟

७५. मरियमचे पुत्र मसीह केवळ एक पैगंबर असण्याखेरीज आणखी काहीही नाही. त्यांच्या पूर्वीही अनेक पैगंबर होऊन गेलेत. त्यांची माता एक सुशील आणि सत्यनिष्ठ स्त्री होती. दोघे (माता-पुत्र) जेवण करीत असत. तुम्ही पाहा आम्ही कशा प्रकारे त्यांच्यासमोर प्रमाण प्रस्तुत करतो, मग विचार करा की ते कशा प्रकारे परतविले जातात. info
التفاسير:

external-link copy
76 : 5

قُلْ اَتَعْبُدُوْنَ مِنْ دُوْنِ اللّٰهِ مَا لَا یَمْلِكُ لَكُمْ ضَرًّا وَّلَا نَفْعًا ؕ— وَاللّٰهُ هُوَ السَّمِیْعُ الْعَلِیْمُ ۟

७६. तुम्ही सांगा की, काय तुम्ही अल्लाहशिवाय त्यांची भक्ती- उपासना करता जे ना तुम्हाला नुकसान पोहचविण्याचा अधिकार राखतात, ना कसल्याही प्रकारच्या फायद्याचा. अल्लाह चांगल्या प्रकारे ऐकणारा आणि पूर्णतः ज्ञानी आहे. info
التفاسير:

external-link copy
77 : 5

قُلْ یٰۤاَهْلَ الْكِتٰبِ لَا تَغْلُوْا فِیْ دِیْنِكُمْ غَیْرَ الْحَقِّ وَلَا تَتَّبِعُوْۤا اَهْوَآءَ قَوْمٍ قَدْ ضَلُّوْا مِنْ قَبْلُ وَاَضَلُّوْا كَثِیْرًا وَّضَلُّوْا عَنْ سَوَآءِ السَّبِیْلِ ۟۠

७७. सांगा, हे ग्रंथधारकांनो! आपल्या दीन-धर्मात अतिशयोक्ती करू नका आणि अशा लोकांच्या इच्छा अभिलाषांचे अनुसरण करू नका, जे पूर्वीपासून भटकलेले आहेत. आणि बहुतेकांना पथभ्रष्ट करून गेलेत आणि सरळ मार्गापासून दूर झाले आहेत. info
التفاسير: