แปล​ความหมาย​อัลกุรอาน​ - คำแปลภาษามราฐี - มุฮัมมัด ชะฟีอ์ อันศอรีย์

Luqmān

external-link copy
1 : 31

الٓمّٓ ۟ۚ

१. अलिफ. लाम. मीम info
التفاسير:

external-link copy
2 : 31

تِلْكَ اٰیٰتُ الْكِتٰبِ الْحَكِیْمِ ۟ۙ

२. या दिव्य ज्ञानयुक्त ग्रंथाच्या आयती आहेत. info
التفاسير:

external-link copy
3 : 31

هُدًی وَّرَحْمَةً لِّلْمُحْسِنِیْنَ ۟ۙ

३. जो अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता मार्गदर्शन आणि (सर्वथा) दया-कृपा आहे. info
التفاسير:

external-link copy
4 : 31

الَّذِیْنَ یُقِیْمُوْنَ الصَّلٰوةَ وَیُؤْتُوْنَ الزَّكٰوةَ وَهُمْ بِالْاٰخِرَةِ هُمْ یُوْقِنُوْنَ ۟ؕ

४. जे लोक नेहमी वक्तशीरपणे नमाज पढतात आणि जकात (धर्मदान) देतात, आणि आखिरतवर (पूर्ण) विश्वास ठेवतात. info
التفاسير:

external-link copy
5 : 31

اُولٰٓىِٕكَ عَلٰی هُدًی مِّنْ رَّبِّهِمْ وَاُولٰٓىِٕكَ هُمُ الْمُفْلِحُوْنَ ۟

५. हेच ते लोक होत, जे आपल्या पालनकर्त्यातर्फे मार्गदर्शनावर आहेत आणि हेच लोक मुक्ती प्राप्त करणारे आहेत. info
التفاسير:

external-link copy
6 : 31

وَمِنَ النَّاسِ مَنْ یَّشْتَرِیْ لَهْوَ الْحَدِیْثِ لِیُضِلَّ عَنْ سَبِیْلِ اللّٰهِ بِغَیْرِ عِلْمٍ ۖۗ— وَّیَتَّخِذَهَا هُزُوًا ؕ— اُولٰٓىِٕكَ لَهُمْ عَذَابٌ مُّهِیْنٌ ۟

६. आणि काही लोक असेही आहेत जे निरर्थक, वाह्यात गोष्टी विकत घेतात की अज्ञानतेसह लोकांना अल्लाहच्या मार्गापासून दूर करावे आणि त्याला थट्टा-मस्करी बनवावे. हेच ते लोक होत, ज्यांच्यासाठी अपमानित करणारा अज़ाब (शिक्षा-यातना) आहे. info
التفاسير:

external-link copy
7 : 31

وَاِذَا تُتْلٰی عَلَیْهِ اٰیٰتُنَا وَلّٰی مُسْتَكْبِرًا كَاَنْ لَّمْ یَسْمَعْهَا كَاَنَّ فِیْۤ اُذُنَیْهِ وَقْرًا ۚ— فَبَشِّرْهُ بِعَذَابٍ اَلِیْمٍ ۟

७. आणि जेव्हा त्याच्यासमोर आमच्या आयती वाचून ऐकविल्या जातात तेव्हा घमेंडीने अशा प्रकारे तोंड फिरवितो की जणू त्याने ऐकलेच नाही, जणू काही त्याच्या दोन्ही कानात बधिरता आहे. तुम्ही त्याला दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातने) ची खबर द्या. info
التفاسير:

external-link copy
8 : 31

اِنَّ الَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ لَهُمْ جَنّٰتُ النَّعِیْمِ ۟ۙ

८. निःसंशय, ज्या लोकांनी ईमान स्वीकारले व जे सत्कर्म करीत राहिले त्याच्याकरिता सुखांनी युक्त अशी जन्नत आहे. info
التفاسير:

external-link copy
9 : 31

خٰلِدِیْنَ فِیْهَا ؕ— وَعْدَ اللّٰهِ حَقًّا ؕ— وَهُوَ الْعَزِیْزُ الْحَكِیْمُ ۟

९. जिथे ते सदैव काळ राहतील, अल्लाहचा सच्चा वायदा आहे. तो मोठा प्रभुत्वशाली आणि पूर्णतः बुद्धिकौशल्य (हिकमत) बाळगणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
10 : 31

خَلَقَ السَّمٰوٰتِ بِغَیْرِ عَمَدٍ تَرَوْنَهَا وَاَلْقٰی فِی الْاَرْضِ رَوَاسِیَ اَنْ تَمِیْدَ بِكُمْ وَبَثَّ فِیْهَا مِنْ كُلِّ دَآبَّةٍ ؕ— وَاَنْزَلْنَا مِنَ السَّمَآءِ مَآءً فَاَنْۢبَتْنَا فِیْهَا مِنْ كُلِّ زَوْجٍ كَرِیْمٍ ۟

१०. त्यानेच आकाशांना खांबांविना बनविले आहे. तुम्ही त्यांना पाहता आणि त्याने जमिनीवर पहाड रोवले, यासाठी की तिने तुम्हाला कंपित करू न शकावे आणि प्रत्येक प्रकारचे सजीव जमिनीत पसरविले आणि त्याने आकाशातून पाऊस पाडून प्रत्येक प्रकारच्या सुंदर जोड्या उगविल्या. info
التفاسير:

external-link copy
11 : 31

هٰذَا خَلْقُ اللّٰهِ فَاَرُوْنِیْ مَاذَا خَلَقَ الَّذِیْنَ مِنْ دُوْنِهٖ ؕ— بَلِ الظّٰلِمُوْنَ فِیْ ضَلٰلٍ مُّبِیْنٍ ۟۠

११. ही आहे अल्लाहची सृष्टी (मखलूक), आता तुम्ही मला याच्याखेरीज दुसऱ्या कोणाची सृष्टी तर दाखवा (काही नाही) हे अत्याचारी लोक उघड मार्गभ्रष्टतेत आहेत. info
التفاسير: