แปล​ความหมาย​อัลกุรอาน​ - คำแปลภาษามราฐี - มุฮัมมัด ชะฟีอ์ อันศอรีย์

Al-Hajj

external-link copy
1 : 22

یٰۤاَیُّهَا النَّاسُ اتَّقُوْا رَبَّكُمْ ۚ— اِنَّ زَلْزَلَةَ السَّاعَةِ شَیْءٌ عَظِیْمٌ ۟

१. लोक हो! आपल्या पालनकर्त्याचे भय राखा, निःसंशय कयामतचा भूकंप फार जबरदस्त गोष्ट आहे. info
التفاسير:

external-link copy
2 : 22

یَوْمَ تَرَوْنَهَا تَذْهَلُ كُلُّ مُرْضِعَةٍ عَمَّاۤ اَرْضَعَتْ وَتَضَعُ كُلُّ ذَاتِ حَمْلٍ حَمْلَهَا وَتَرَی النَّاسَ سُكٰرٰی وَمَا هُمْ بِسُكٰرٰی وَلٰكِنَّ عَذَابَ اللّٰهِ شَدِیْدٌ ۟

२. ज्या दिवशी तुम्ही तो पाहाल, प्रत्येक दूध पाजणारी माता आपल्या दूध पिणाऱ्या बाळाला विसरेल आणि सर्व गर्भवती स्त्रियांचा गर्भपात होईल, आणि तुम्ही पाहाल की लोक मदहोश दिसून येतील, वास्तविक मदहोश नसतील, परंतु अल्लाहचा अज़ाब (शिक्षा- यातना) मोठा कठोर आहे. info
التفاسير:

external-link copy
3 : 22

وَمِنَ النَّاسِ مَنْ یُّجَادِلُ فِی اللّٰهِ بِغَیْرِ عِلْمٍ وَّیَتَّبِعُ كُلَّ شَیْطٰنٍ مَّرِیْدٍ ۟ۙ

३. आणि काही लोक अल्लाहविषयी अज्ञानपूर्ण गोष्टी बोलतात, आणि प्रत्येक उदंड सैतानाचे अनुसरण करतात. info
التفاسير:

external-link copy
4 : 22

كُتِبَ عَلَیْهِ اَنَّهٗ مَنْ تَوَلَّاهُ فَاَنَّهٗ یُضِلُّهٗ وَیَهْدِیْهِ اِلٰی عَذَابِ السَّعِیْرِ ۟

४. ज्याच्याबद्दल अल्लाहचा फैसला लिहिला गेला आहे की जो कोणी त्याच्याशी दोस्ती करेल, तो त्याला मार्गभ्रष्ट करेल आणि त्याला आगीच्या शिक्षा-यातनेकडे नेईल. info
التفاسير:

external-link copy
5 : 22

یٰۤاَیُّهَا النَّاسُ اِنْ كُنْتُمْ فِیْ رَیْبٍ مِّنَ الْبَعْثِ فَاِنَّا خَلَقْنٰكُمْ مِّنْ تُرَابٍ ثُمَّ مِنْ نُّطْفَةٍ ثُمَّ مِنْ عَلَقَةٍ ثُمَّ مِنْ مُّضْغَةٍ مُّخَلَّقَةٍ وَّغَیْرِ مُخَلَّقَةٍ لِّنُبَیِّنَ لَكُمْ ؕ— وَنُقِرُّ فِی الْاَرْحَامِ مَا نَشَآءُ اِلٰۤی اَجَلٍ مُّسَمًّی ثُمَّ نُخْرِجُكُمْ طِفْلًا ثُمَّ لِتَبْلُغُوْۤا اَشُدَّكُمْ ۚ— وَمِنْكُمْ مَّنْ یُّتَوَفّٰی وَمِنْكُمْ مَّنْ یُّرَدُّ اِلٰۤی اَرْذَلِ الْعُمُرِ لِكَیْلَا یَعْلَمَ مِنْ بَعْدِ عِلْمٍ شَیْـًٔا ؕ— وَتَرَی الْاَرْضَ هَامِدَةً فَاِذَاۤ اَنْزَلْنَا عَلَیْهَا الْمَآءَ اهْتَزَّتْ وَرَبَتْ وَاَنْۢبَتَتْ مِنْ كُلِّ زَوْجٍ بَهِیْجٍ ۟

५. लोकांनो! जर तुम्हाला मेल्यानंतर (पुन्हा) जिवंत होण्याबाबत शंका आहे, तर विचार करा, आम्ही तुम्हाला मातीपासून निर्माण केले, मग वीर्यापासून, मग जमलेल्या रक्तापासून, आणि मांसाच्या तुकड्यापासून जे रूप दिले गेले होते आणि विनारूपही होते. हे आम्ही तुमच्यावर स्पष्ट करतो आणि आम्ही ज्याला इच्छितो एका निर्धारित अवधीपर्यंत मातेच्या उदरात ठेवतो, मग तुम्हाला बाळाच्या रूपाने या जगात आणतो मग यासाठी की तुम्ही आपल्या पूर्ण तरुणपणास पोहचावे, तुमच्यापैकी काही असे आहेत जे मरण पावतात आणि काही जीर्ण वयाकडे पुन्हा परतविले जातात की ते एका गोष्टीशी परिचित झाल्यानंतर दुसऱ्यांदा अनभिज्ञ व्हावेत. तुम्ही पाहता की जमीन नापीक आणि कोरडी आहे, मग जेव्हा आम्ही तिच्यावर पाऊस पाडतो तेव्हा ती चेतनामय होते आणि फुगते आणि प्रत्येक प्रकारची सुंदर वनस्पती उगविते. info
التفاسير: