แปล​ความหมาย​อัลกุรอาน​ - คำแปลภาษามราฐี - มุฮัมมัด ชะฟีอ์ อันศอรีย์

หมายเลข​หน้า​:close

external-link copy
39 : 19

وَاَنْذِرْهُمْ یَوْمَ الْحَسْرَةِ اِذْ قُضِیَ الْاَمْرُ ۘ— وَهُمْ فِیْ غَفْلَةٍ وَّهُمْ لَا یُؤْمِنُوْنَ ۟

३९. आणि तुम्ही त्यांना या दुःख आणि निराशेच्या दिवसाचे भय ऐकवा जेव्हा कार्य पूर्णत्वास पोहचविले जाईल आणि हे लोक गफलतीत आणि बेईमानीतच पडून राहतील. info
التفاسير:

external-link copy
40 : 19

اِنَّا نَحْنُ نَرِثُ الْاَرْضَ وَمَنْ عَلَیْهَا وَاِلَیْنَا یُرْجَعُوْنَ ۟۠

४०. निःसंशय, धरतीचे आणि धरतीवर राहणाऱ्यांचे वारस आम्हीच असणार आणि समस्त लोक आमच्याचकडे परतवून आणले जातील. info
التفاسير:

external-link copy
41 : 19

وَاذْكُرْ فِی الْكِتٰبِ اِبْرٰهِیْمَ ؕ۬— اِنَّهٗ كَانَ صِدِّیْقًا نَّبِیًّا ۟

४१. या ग्रंथात इब्राहीम (च्या वृत्तांता) चा उल्लेख करा. निःसंशय ते मोठे सच्चे पैगंबर (ईशदूत) होते. info
التفاسير:

external-link copy
42 : 19

اِذْ قَالَ لِاَبِیْهِ یٰۤاَبَتِ لِمَ تَعْبُدُ مَا لَا یَسْمَعُ وَلَا یُبْصِرُ وَلَا یُغْنِیْ عَنْكَ شَیْـًٔا ۟

४२. जेव्हा ते आपल्या पित्यास म्हणाले, हे पिता! तुम्ही अशांची उपासना का करीत आहात जे ना ऐकू शकतील, ना पाहू शकतील आणि ना तुम्हाला कसलाही लाभ पोहचवू शकतील. info
التفاسير:

external-link copy
43 : 19

یٰۤاَبَتِ اِنِّیْ قَدْ جَآءَنِیْ مِنَ الْعِلْمِ مَا لَمْ یَاْتِكَ فَاتَّبِعْنِیْۤ اَهْدِكَ صِرَاطًا سَوِیًّا ۟

४३. हे (माझ्या प्रिय) पिता! (तुम्ही पाहा) माझ्याजवळ ते ज्ञान आले आहे जे तुमच्याजवळ आलेच नाही, तेव्हा तुम्ही माझेच म्हणणे मान्य करा मी अगदी सरळ मार्गाकडे तुमचे मार्गदर्शन करीन. info
التفاسير:

external-link copy
44 : 19

یٰۤاَبَتِ لَا تَعْبُدِ الشَّیْطٰنَ ؕ— اِنَّ الشَّیْطٰنَ كَانَ لِلرَّحْمٰنِ عَصِیًّا ۟

४४. हे माझ्या पित्या! तुम्ही सैतानाची उपासना करण्यापासून थांबा सैतान तर दयाळू आणि कृपाळू अल्लाहची खूप अवज्ञा करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
45 : 19

یٰۤاَبَتِ اِنِّیْۤ اَخَافُ اَنْ یَّمَسَّكَ عَذَابٌ مِّنَ الرَّحْمٰنِ فَتَكُوْنَ لِلشَّیْطٰنِ وَلِیًّا ۟

४५. हे पिता! मला भय वाटते की कदाचित तुमच्यावर अल्लाहची एखादी शिक्षा यातना न येऊन कोसळावी की (ज्यामुळे) तुम्ही सैतानाचे मित्र बनावे. info
التفاسير:

external-link copy
46 : 19

قَالَ اَرَاغِبٌ اَنْتَ عَنْ اٰلِهَتِیْ یٰۤاِبْرٰهِیْمُ ۚ— لَىِٕنْ لَّمْ تَنْتَهِ لَاَرْجُمَنَّكَ وَاهْجُرْنِیْ مَلِیًّا ۟

४६. (पित्याने) उत्तर दिले, हे इब्राहीम! काय तू आमच्या उपास्यांपासून तोंड फिरवित आहेस? (ऐक) जर तू असे करणे थांबविले नाही तर मी तुला दगडांनी (ठेचून) मारुन टाकीन, जा एका दीर्घ मुदतापर्यंत माझ्यापासून वेगळाच राहा. info
التفاسير:

external-link copy
47 : 19

قَالَ سَلٰمٌ عَلَیْكَ ۚ— سَاَسْتَغْفِرُ لَكَ رَبِّیْ ؕ— اِنَّهٗ كَانَ بِیْ حَفِیًّا ۟

४७. (इब्राहीम) म्हणाले, ठीक आहे. सलाम असो तुमच्यावर मी तर आपल्या पालनकर्त्याजवळ तुमच्यासाठी माफीची दुआ (प्रार्थना) करीत राहीन. तो माझ्यावर अतिशय जास्त मेहरबानी करीत आहे. info
التفاسير:

external-link copy
48 : 19

وَاَعْتَزِلُكُمْ وَمَا تَدْعُوْنَ مِنْ دُوْنِ اللّٰهِ وَاَدْعُوْا رَبِّیْ ۖؗ— عَسٰۤی اَلَّاۤ اَكُوْنَ بِدُعَآءِ رَبِّیْ شَقِیًّا ۟

४८. आणि मी तर तुम्हालाही आणि ज्यांना ज्यांना तुम्ही अल्लाहशिवाय पुकारता त्यांना (सर्वांना) ही सोडत आहे. मी फक्त आपल्या पालनकर्त्याला पुकारित राहीन. मला पूर्ण विश्वास आहे की मी आपल्या पालनकर्त्याजवळ दुआ (प्रार्थना) करण्यात असफल राहणार नाही. info
التفاسير:

external-link copy
49 : 19

فَلَمَّا اعْتَزَلَهُمْ وَمَا یَعْبُدُوْنَ مِنْ دُوْنِ اللّٰهِ ۙ— وَهَبْنَا لَهٗۤ اِسْحٰقَ وَیَعْقُوْبَ ؕ— وَكُلًّا جَعَلْنَا نَبِیًّا ۟

४९. जेव्हा (इब्राहीम यांनी) त्या सर्वांचा आणि अल्लाहशिवाय त्यांच्या सर्व उपास्यांचा त्याग केला, तेव्हा आम्ही त्यांना इसहाक आणि याकूब प्रदान केले आणि प्रत्येकाला पैगंबर बनविले. info
التفاسير:

external-link copy
50 : 19

وَوَهَبْنَا لَهُمْ مِّنْ رَّحْمَتِنَا وَجَعَلْنَا لَهُمْ لِسَانَ صِدْقٍ عَلِیًّا ۟۠

५०. आणि त्या सर्वांना आम्ही आपली भरपूर दया-कृपा प्रदान केली आणि आम्ही त्यांच्या सच्चा वायद्याला बुलंद दर्जा दिला. info
التفاسير:

external-link copy
51 : 19

وَاذْكُرْ فِی الْكِتٰبِ مُوْسٰۤی ؗ— اِنَّهٗ كَانَ مُخْلَصًا وَّكَانَ رَسُوْلًا نَّبِیًّا ۟

५१. या ग्रंथात मूसाचाही उल्लेख करा, जो निवडलेला आणि रसूल आणि नबी (पैगंबर) होता. info
التفاسير: