அல்குர்ஆன் மொழிபெயர்ப்பு - மராத்தி மொழிபெயர்ப்பு - முஹம்மத் ஷபீஃ அன்ஸாரீ

பக்க எண்:close

external-link copy
62 : 2

اِنَّ الَّذِیْنَ اٰمَنُوْا وَالَّذِیْنَ هَادُوْا وَالنَّصٰرٰی وَالصّٰبِـِٕیْنَ مَنْ اٰمَنَ بِاللّٰهِ وَالْیَوْمِ الْاٰخِرِ وَعَمِلَ صَالِحًا فَلَهُمْ اَجْرُهُمْ عِنْدَ رَبِّهِمْ ۪ۚ— وَلَا خَوْفٌ عَلَیْهِمْ وَلَا هُمْ یَحْزَنُوْنَ ۟

६२. निःसंशय, जो मुस्लिम असो, यहूदी (ज्यू) असो, नसारा (ख्रिश्चन) असो किंवा साबी १ असो, जो कोणी सर्वश्रेष्ठ अल्लाह आणि कयामतीच्या दिवसावर ईमान राखील आणि सत्कर्मे करील तर त्याचा मोबदला त्याच्या पालनकर्त्याजवळ आहे. त्यांना ना कसलेही भय राहील, आणि ना कसले दुःख राहील. info

(१) अर्थात ते लोक, जे जरूर सुरवातीच्या काळात एखादा सत्य-धर्म मानणारे असतील. यास्तव कुरआनात यहूदी, ख्रिश्चनांसोबत त्यांचा उल्लेख आला आहे परंतु नंतरच्या काळात, त्याच्यात फरिश्त्यांची पूजा करण्याची प्रथा पडली किंवा ते नास्तिक झाले. या कारणास्तव धर्महीन लोकांना साबी म्हटले जाऊ लागले.

التفاسير:

external-link copy
63 : 2

وَاِذْ اَخَذْنَا مِیْثَاقَكُمْ وَرَفَعْنَا فَوْقَكُمُ الطُّوْرَ ؕ— خُذُوْا مَاۤ اٰتَیْنٰكُمْ بِقُوَّةٍ وَّاذْكُرُوْا مَا فِیْهِ لَعَلَّكُمْ تَتَّقُوْنَ ۟

६३. आणि जेव्हा आम्ही तुमच्याकडून वचन घेतले आणि तुमच्यावर तूर पर्वत आणून उभा केला आणि फर्माविले, जे आम्ही तुम्हाला प्रदान केले आहे, ते मजबूतीने धरून ठेवा आणि जे काही त्यात आहे ते ध्यानात राखा, यासाठी की तुम्ही दुराचारापासून आपला बचाव करू शकावे. info
التفاسير:

external-link copy
64 : 2

ثُمَّ تَوَلَّیْتُمْ مِّنْ بَعْدِ ذٰلِكَ ۚ— فَلَوْلَا فَضْلُ اللّٰهِ عَلَیْكُمْ وَرَحْمَتُهٗ لَكُنْتُمْ مِّنَ الْخٰسِرِیْنَ ۟

६४. मग त्यानंतरही तुम्ही पाठ फिरवली जर सर्वश्रेष्ठ अल्लाहची कृपा आणि दया तुमच्यावर राहिली नसती, तर तुम्ही नुकसान उचलणारे ठरले असते. info
التفاسير:

external-link copy
65 : 2

وَلَقَدْ عَلِمْتُمُ الَّذِیْنَ اعْتَدَوْا مِنْكُمْ فِی السَّبْتِ فَقُلْنَا لَهُمْ كُوْنُوْا قِرَدَةً خٰسِـِٕیْنَ ۟ۚ

६५. आणि अवश्य तुम्हाला त्या लोकांविषयीही माहिती आहे. तुमच्यापैकी ज्यांनी शनिवारबाबत मर्यादेचे उल्लंघन केले. मग आम्ही (देखील) फर्माविले की तुम्ही अपमानित वान्हरेे व्हा. info
التفاسير:

external-link copy
66 : 2

فَجَعَلْنٰهَا نَكَالًا لِّمَا بَیْنَ یَدَیْهَا وَمَا خَلْفَهَا وَمَوْعِظَةً لِّلْمُتَّقِیْنَ ۟

६६. याला आम्ही पुढच्या-मागच्या लोकांकरिता सावध राहण्याचे कारण बनविले, आणि भय राखणाऱ्यांकरिता बोध आहे. info
التفاسير:

external-link copy
67 : 2

وَاِذْ قَالَ مُوْسٰی لِقَوْمِهٖۤ اِنَّ اللّٰهَ یَاْمُرُكُمْ اَنْ تَذْبَحُوْا بَقَرَةً ؕ— قَالُوْۤا اَتَتَّخِذُنَا هُزُوًا ؕ— قَالَ اَعُوْذُ بِاللّٰهِ اَنْ اَكُوْنَ مِنَ الْجٰهِلِیْنَ ۟

६७. आणि मूसा जेव्हा आपल्या जमातीच्या लोकांना म्हणाले की सर्वश्रेष्ठ अल्लाह तुम्हाला एक गाय जिबह करण्याचा (बळी देण्याचा) आदेश देतो तेव्हा ते म्हणाले, काय, तुम्ही आमच्याशी थट्टा मस्करी करता? मूसा म्हणाले, मी अशा मूर्खतेपासून सर्वश्रेष्ठ अल्लाहचे शरण घेतो. info
التفاسير:

external-link copy
68 : 2

قَالُوا ادْعُ لَنَا رَبَّكَ یُبَیِّنْ لَّنَا مَا هِیَ ؕ— قَالَ اِنَّهٗ یَقُوْلُ اِنَّهَا بَقَرَةٌ لَّا فَارِضٌ وَّلَا بِكْرٌ ؕ— عَوَانٌ بَیْنَ ذٰلِكَ ؕ— فَافْعَلُوْا مَا تُؤْمَرُوْنَ ۟

६८. ते म्हणाले, हे मूसा! अल्लाहजवळ दुआ प्रार्थना करा की आम्हाला त्याविषयी माहिती द्यावी. मूसा म्हणाले, ऐका, ती गाय ना तर म्हातारी असावी आणि ना वासरी, किंबहुना मध्यम वयाची असावी. आता जो आदेश तुम्हाला दिला गेला आहे, तो अमलात आणा. info
التفاسير:

external-link copy
69 : 2

قَالُوا ادْعُ لَنَا رَبَّكَ یُبَیِّنْ لَّنَا مَا لَوْنُهَا ؕ— قَالَ اِنَّهٗ یَقُوْلُ اِنَّهَا بَقَرَةٌ صَفْرَآءُ ۙ— فَاقِعٌ لَّوْنُهَا تَسُرُّ النّٰظِرِیْنَ ۟

६९. ते पुन्हा म्हणाले की, अल्लाहशी दुआ-प्रार्थना करा की त्याने आम्हाला हे सांगावे की तिचा रंग कसा असावा? सांगितले, अल्लाह फर्मावितो की गाय, गडद सोनेरी रंगाची असावी, आणि पाहणाऱ्यांचे मन प्रसन्न करणारी असावी. info
التفاسير: