அல்குர்ஆன் மொழிபெயர்ப்பு - மராத்தி மொழிபெயர்ப்பு - முஹம்மத் ஷபீஃ அன்ஸாரீ

பக்க எண்:close

external-link copy
25 : 2

وَبَشِّرِ الَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ اَنَّ لَهُمْ جَنّٰتٍ تَجْرِیْ مِنْ تَحْتِهَا الْاَنْهٰرُ ؕ— كُلَّمَا رُزِقُوْا مِنْهَا مِنْ ثَمَرَةٍ رِّزْقًا ۙ— قَالُوْا هٰذَا الَّذِیْ رُزِقْنَا مِنْ قَبْلُ وَاُتُوْا بِهٖ مُتَشَابِهًا ؕ— وَلَهُمْ فِیْهَاۤ اَزْوَاجٌ مُّطَهَّرَةٌ وَّهُمْ فِیْهَا خٰلِدُوْنَ ۟

२५. आणि ईमान राखणाऱ्या आणि नेक काम करणाऱ्यांना त्या स्वर्गाचा शुभ समाचार द्या, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत. जेव्हा त्यांना त्यांच्यातून फळे खाण्यास दिले जातील, तेव्हा म्हणतील की याच्यापूर्वी आम्हाला खाण्यासाठी हेच दिले गेले. ती मिळतीजुळती फळे असतील आणि त्यांच्यासाठी त्यात पवित्र शुद्ध (शीलवान) पत्न्या असतील आणि ते त्यात नेहमी नेहमी राहतील. info
التفاسير:

external-link copy
26 : 2

اِنَّ اللّٰهَ لَا یَسْتَحْیٖۤ اَنْ یَّضْرِبَ مَثَلًا مَّا بَعُوْضَةً فَمَا فَوْقَهَا ؕ— فَاَمَّا الَّذِیْنَ اٰمَنُوْا فَیَعْلَمُوْنَ اَنَّهُ الْحَقُّ مِنْ رَّبِّهِمْ ۚ— وَاَمَّا الَّذِیْنَ كَفَرُوْا فَیَقُوْلُوْنَ مَاذَاۤ اَرَادَ اللّٰهُ بِهٰذَا مَثَلًا ۘ— یُضِلُّ بِهٖ كَثِیْرًا وَّیَهْدِیْ بِهٖ كَثِیْرًا ؕ— وَمَا یُضِلُّ بِهٖۤ اِلَّا الْفٰسِقِیْنَ ۟ۙ

२६. वास्तविक एखादे उदाहरण देण्यात अल्लाहला लज्जा-संकोच वाटत नाही, मग ते उदाहरण मच्छराचे असो किंवा त्याहूनही तुच्छ वस्तूचे. ईमान राखणारे त्याला आपल्या पालनकर्त्यातर्फे सत्य जाणतात, आणि काफिर (इन्कार करणारे) म्हणतात की असले उदाहरण देण्यात अल्लाहचे प्रयोजन काय आहे? याच्याचद्वारे अनेकांना मार्गभ्रष्ट करतो आणि बहुतेक लोकांना सत्य-मार्गावर आणतो. आणि मार्गभ्रष्ट तर केवळ आज्ञाभंग करणाऱ्या (दुराचारी लोकां) नाच करतो. info
التفاسير:

external-link copy
27 : 2

الَّذِیْنَ یَنْقُضُوْنَ عَهْدَ اللّٰهِ مِنْ بَعْدِ مِیْثَاقِهٖ ۪— وَیَقْطَعُوْنَ مَاۤ اَمَرَ اللّٰهُ بِهٖۤ اَنْ یُّوْصَلَ وَیُفْسِدُوْنَ فِی الْاَرْضِ ؕ— اُولٰٓىِٕكَ هُمُ الْخٰسِرُوْنَ ۟

२७. जे लोक अल्लाहशी केलेल्या वचन- करारा (प्रतिज्ञे) ला तोडून टाकतात आणि अल्लाहने ज्या गोष्टींना जोडण्याचा आदेश दिला आहे, तिला तोडून टाकतात आणि धरतीवर उत्पात (फसाद) पसरवितात. हेच लोक मोठे नुकसान भोगणारे आहेत. info
التفاسير:

external-link copy
28 : 2

كَیْفَ تَكْفُرُوْنَ بِاللّٰهِ وَكُنْتُمْ اَمْوَاتًا فَاَحْیَاكُمْ ۚ— ثُمَّ یُمِیْتُكُمْ ثُمَّ یُحْیِیْكُمْ ثُمَّ اِلَیْهِ تُرْجَعُوْنَ ۟

२८. तुम्ही अल्लाहला कसे नाही मानत, वास्तविक तुम्ही निर्जीव होते, तेव्हा त्याने तुम्हाला जीवन प्रदान केले मग तुम्हाला मृत्यू देईल मग पुन्हा दुसऱ्यांदा जिवंत करील, मग त्याच्याचकडे तुम्हाला जायचे आहे. info
التفاسير:

external-link copy
29 : 2

هُوَ الَّذِیْ خَلَقَ لَكُمْ مَّا فِی الْاَرْضِ جَمِیْعًا ۗ— ثُمَّ اسْتَوٰۤی اِلَی السَّمَآءِ فَسَوّٰىهُنَّ سَبْعَ سَمٰوٰتٍ ؕ— وَهُوَ بِكُلِّ شَیْءٍ عَلِیْمٌ ۟۠

२९. त्यानेच तुमच्यासाठी, जे काही धरतीवर आहे, सर्व निर्माण केले. मग आकाशाचा इरादा केला आणि त्याने सात यथायोग्य आकाश बनविले आणि तो प्रत्येक गोष्ट जाणणारा आहे. info
التفاسير: