Përkthimi i kuptimeve të Kuranit Fisnik - Përkthimi maratisht - Muhammed Shafi Ansari

external-link copy
4 : 60

قَدْ كَانَتْ لَكُمْ اُسْوَةٌ حَسَنَةٌ فِیْۤ اِبْرٰهِیْمَ وَالَّذِیْنَ مَعَهٗ ۚ— اِذْ قَالُوْا لِقَوْمِهِمْ اِنَّا بُرَءٰٓؤُا مِنْكُمْ وَمِمَّا تَعْبُدُوْنَ مِنْ دُوْنِ اللّٰهِ ؗ— كَفَرْنَا بِكُمْ وَبَدَا بَیْنَنَا وَبَیْنَكُمُ الْعَدَاوَةُ وَالْبَغْضَآءُ اَبَدًا حَتّٰی تُؤْمِنُوْا بِاللّٰهِ وَحْدَهٗۤ اِلَّا قَوْلَ اِبْرٰهِیْمَ لِاَبِیْهِ لَاَسْتَغْفِرَنَّ لَكَ وَمَاۤ اَمْلِكُ لَكَ مِنَ اللّٰهِ مِنْ شَیْءٍ ؕ— رَبَّنَا عَلَیْكَ تَوَكَّلْنَا وَاِلَیْكَ اَنَبْنَا وَاِلَیْكَ الْمَصِیْرُ ۟

४. (हे ईमान राखणाऱ्यांनो!) तुमच्याकरिता (हजरत) इब्राहीम आणि त्यांच्या साथीदारांमध्ये फार उत्तम नमुना आहे, जेव्हा त्या सर्वांनी आपल्या जनसमूहाला स्पष्ट शब्दांत सांगितले की आम्ही तुमच्यापासून आणि ज्यांची तुम्ही अल्लाहखेरीज आराधना करता, त्या सर्वांपासून पूर्णपणे विभक्त आहोत. आम्ही तुमच्या (श्रद्धेचा) इन्कार करतो आणि तोपर्यंत तुम्ही अल्लाहच्या एक असण्यावर ईमान राखत नाही (तोपर्यंत) आमच्या व तुमच्या दरम्यान नेहमीकरिता कपट आणि शत्रुत्व निर्माण झाले. परंतु इब्राहीम आपल्या पित्यास असे म्हणाले होते की मी तुमच्यासाठी क्षमा-याचना अवश्य करीन आणि तुमच्यासाठी मला अल्लाहसमोर कसलाही अधिकार नाही. हे आमच्या पालनकर्त्या! तुझ्यावरच आम्ही भरवसा राखला आहे१ आणि तुझ्याचकडे आम्ही रुजू होतो, आणि तुझ्याकडेच परतून यायचे आहे. info

(१) मूळ शब्द ‘तवक्कल’ (भरवसा) अर्थात बाह्य साधनांचा अवलंब केल्यानंतर मामला अल्लाहच्या हवाली केला जावा. भरवशाचा अर्थ हा नव्हे की साधनांचा प्रयोग न करताच अल्लाहवर भरवसा राखला जावा, असे करण्यापासून आम्हाल रोखले गेले आहे. एकाद एक मनुष्य पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या सेवेत हजर झाला आणि उंटाला तसेच बाहेर उभे करून आत आला. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी विचारले असता म्हणाला की मी उंटाला अल्लाहच्या हवाली करून आलो आहे. त्यावर पैगंबर म्हणाले, हा भरवसा नव्हे. ‘आकल व तवक्कल’ (‘‘आधी त्याला बांध, नंतर अल्लाहवर भरवसा कर.’’ (तिर्मिजी)

التفاسير: