Përkthimi i kuptimeve të Kuranit Fisnik - Përkthimi maratisht - Muhammed Shafi Ansari

El Fet-h

external-link copy
1 : 48

اِنَّا فَتَحْنَا لَكَ فَتْحًا مُّبِیْنًا ۟ۙ

१. निःसंशय, (हे पैगंबर!) आम्ही तुम्हाला एक खुला विजय प्रदान केला आहे. info
التفاسير:

external-link copy
2 : 48

لِّیَغْفِرَ لَكَ اللّٰهُ مَا تَقَدَّمَ مِنْ ذَنْۢبِكَ وَمَا تَاَخَّرَ وَیُتِمَّ نِعْمَتَهٗ عَلَیْكَ وَیَهْدِیَكَ صِرَاطًا مُّسْتَقِیْمًا ۟ۙ

२. यासाठी की अल्लाहने तुमच्या पुढच्या मागच्या चुका माफ कराव्यात, आणि तुमच्यावर आपली कृपा-देणगी पूर्ण करावी आणि तुम्हाला सरळ मार्गावर चालवावे. info
التفاسير:

external-link copy
3 : 48

وَّیَنْصُرَكَ اللّٰهُ نَصْرًا عَزِیْزًا ۟

३. आणि तुम्हाला एक भरपूर मदत प्रदान करावी. info
التفاسير:

external-link copy
4 : 48

هُوَ الَّذِیْۤ اَنْزَلَ السَّكِیْنَةَ فِیْ قُلُوْبِ الْمُؤْمِنِیْنَ لِیَزْدَادُوْۤا اِیْمَانًا مَّعَ اِیْمَانِهِمْ ؕ— وَلِلّٰهِ جُنُوْدُ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ؕ— وَكَانَ اللّٰهُ عَلِیْمًا حَكِیْمًا ۟ۙ

४. तोच आहे ज्याने मुसलमानांच्या मनात शांती (आणि आत्मिवश्वास) अवतरित केला, यासाठी की त्यांनी आपल्या ईमानासोबतच आणखी जास्त ईमानात वृद्धिंगत व्हावे. आणि आकाशांची व धरतीची समस्त सैन्ये अल्लाहचीच आहेत, आणि अल्लाह जाणणारा, हिकमतशाली आहे. info
التفاسير:

external-link copy
5 : 48

لِّیُدْخِلَ الْمُؤْمِنِیْنَ وَالْمُؤْمِنٰتِ جَنّٰتٍ تَجْرِیْ مِنْ تَحْتِهَا الْاَنْهٰرُ خٰلِدِیْنَ فِیْهَا وَیُكَفِّرَ عَنْهُمْ سَیِّاٰتِهِمْ ؕ— وَكَانَ ذٰلِكَ عِنْدَ اللّٰهِ فَوْزًا عَظِیْمًا ۟ۙ

५. यासाठी की मुस्लिम पुरुषांना आणि स्त्रियांना त्या जन्नतींमध्ये दाखल करावे, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत, जिथे ते सदैव काळ राहतील आणि त्यांच्यापासून त्यांची दुष्कर्मे दूर करावीत आणि अल्लाहच्या जवळही फार मोठी सफलता आहे. info
التفاسير:

external-link copy
6 : 48

وَّیُعَذِّبَ الْمُنٰفِقِیْنَ وَالْمُنٰفِقٰتِ وَالْمُشْرِكِیْنَ وَالْمُشْرِكٰتِ الظَّآنِّیْنَ بِاللّٰهِ ظَنَّ السَّوْءِ ؕ— عَلَیْهِمْ دَآىِٕرَةُ السَّوْءِ ۚ— وَغَضِبَ اللّٰهُ عَلَیْهِمْ وَلَعَنَهُمْ وَاَعَدَّ لَهُمْ جَهَنَّمَ ؕ— وَسَآءَتْ مَصِیْرًا ۟

६. आणि यासाठी की त्या मुनाफिक (दांभिक) पुरुषांना आणि मुनाफिक स्त्रियांना, आणि मूर्तिपूजक पुरुषांना व मूर्तिपूजक स्त्रियांना अज़ाब (शिक्षा) द्यावी, जे अल्लाहविषयी गैरसमज बाळगतात (वस्तुतः) त्याच्यावरच वाईटपणाचे चक्र आहे. अल्लाह त्यांच्यावर नाराज झाला आणि त्याने त्यांना धिःक्कारले आणि त्यांच्यासाठी जहन्नम तयार केली आणि ते परतीचे मोठे वाईट ठिकाण आहे. info
التفاسير:

external-link copy
7 : 48

وَلِلّٰهِ جُنُوْدُ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ؕ— وَكَانَ اللّٰهُ عَزِیْزًا حَكِیْمًا ۟

७. आणि अल्लाहच्याचकरिता आकाशांची आणि धरतीची सैन्ये आहेत, आणि अल्लाह वर्चस्वशाली, हिकमत बाळगणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
8 : 48

اِنَّاۤ اَرْسَلْنٰكَ شَاهِدًا وَّمُبَشِّرًا وَّنَذِیْرًا ۟ۙ

८. निःसंशय, आम्ही तुम्हाला साक्ष देणारा आणि शुभ समाचार ऐकविणारा व खबरदार करणारा बनवून पाठविले आहे. info
التفاسير:

external-link copy
9 : 48

لِّتُؤْمِنُوْا بِاللّٰهِ وَرَسُوْلِهٖ وَتُعَزِّرُوْهُ وَتُوَقِّرُوْهُ ؕ— وَتُسَبِّحُوْهُ بُكْرَةً وَّاَصِیْلًا ۟

९. यासाठी की (हे ईमानधारकांनो!) तुम्ही अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर ईमान राखा आणि त्याला सहाय्य करा व त्याचा आदर राखा, आणि अल्लाहचे पावित्र्य सकाळ-संध्याकाळ वर्णन करा. info
التفاسير: