Përkthimi i kuptimeve të Kuranit Fisnik - Përkthimi maratisht - Muhammed Shafi Ansari

external-link copy
7 : 11

وَهُوَ الَّذِیْ خَلَقَ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضَ فِیْ سِتَّةِ اَیَّامٍ وَّكَانَ عَرْشُهٗ عَلَی الْمَآءِ لِیَبْلُوَكُمْ اَیُّكُمْ اَحْسَنُ عَمَلًا ؕ— وَلَىِٕنْ قُلْتَ اِنَّكُمْ مَّبْعُوْثُوْنَ مِنْ بَعْدِ الْمَوْتِ لَیَقُوْلَنَّ الَّذِیْنَ كَفَرُوْۤا اِنْ هٰذَاۤ اِلَّا سِحْرٌ مُّبِیْنٌ ۟

७. आणि तो (अल्लाहच) होय, ज्याने सहा दिवसांत आकाशांना आणि जमिनीला निर्माण केले आणि त्याचे सिंहासन (अर्श) पाण्यावर होते१ यासाठी की त्याने तुमची कसोटी घ्यावी की तुमच्यात सदाचारी कोण आहे? जर तुम्ही त्यांना सांगाल की तुम्हाला मेल्यानंतर पुन्हा जिवंत केले जाईल, तर इन्कारी लोक उत्तर देतील की ही केवळ उघड जादू आहे. info

(१) हीच गोष्ट सहीह हदीसद्वारेही सिद्ध होते. यास्तव एका हदीस वचनात उल्लेखित आहे की सर्वश्रेष्ठ अल्लाहने आकाश व जमिनीची निर्मिती करण्याच्या पन्नास हजार वर्षे आधी सृष्टी निर्मितीचे भाग्य लिहिले त्या वेळी त्याचे अर्श अर्थात सिंहासन पाण्यावर होते. (सहीह मुस्लिम, किताबुल कदर आणि पाहा सहीह बुखारी, बदउलखल्क)

التفاسير: