ශුද්ධවූ අල් කුර්ආන් අර්ථ කථනය - මරාති පරිවර්තනය - මුහම්මද් ෂෆීඃ අන්සාරි

පිටු අංක:close

external-link copy
6 : 28

وَنُمَكِّنَ لَهُمْ فِی الْاَرْضِ وَنُرِیَ فِرْعَوْنَ وَهَامٰنَ وَجُنُوْدَهُمَا مِنْهُمْ مَّا كَانُوْا یَحْذَرُوْنَ ۟

६. आणि हेही की त्यांन धरतीवर शक्ती-सामर्थ्य व सत्ताधिकार प्रदान करावा आणि फिरऔन आणि हामान व त्यांच्या सैन्यांना ते दाखवावे, ज्यापासून ते भयभीत आहेत. info
التفاسير:

external-link copy
7 : 28

وَاَوْحَیْنَاۤ اِلٰۤی اُمِّ مُوْسٰۤی اَنْ اَرْضِعِیْهِ ۚ— فَاِذَا خِفْتِ عَلَیْهِ فَاَلْقِیْهِ فِی الْیَمِّ وَلَا تَخَافِیْ وَلَا تَحْزَنِیْ ۚ— اِنَّا رَآدُّوْهُ اِلَیْكِ وَجَاعِلُوْهُ مِنَ الْمُرْسَلِیْنَ ۟

७. आणि आम्ही मूसाच्या मातेला वहयी (प्रकाशना) केली की त्याला दूध पाजत राहा आणि जेव्हा तुला त्याच्याविषयी काही भय जाणवेल तेव्हा त्याला नदीत वाहवून दे आणि कसलेही भय, शोक व दुःख करू नकोस. आम्ही निःशंसय, त्याला तुझ्याकडे परतवू आणि त्याला आपल्या पैगंबरांपैकी बनविणार आहोत. info
التفاسير:

external-link copy
8 : 28

فَالْتَقَطَهٗۤ اٰلُ فِرْعَوْنَ لِیَكُوْنَ لَهُمْ عَدُوًّا وَّحَزَنًا ؕ— اِنَّ فِرْعَوْنَ وَهَامٰنَ وَجُنُوْدَهُمَا كَانُوْا خٰطِـِٕیْنَ ۟

८. शेवटी फिरऔनच्या लोकांनी ते बालक उचलून घेतले, यासाठी की अखेरीस हेच बालक त्यांचे वैरी ठरले आणि त्यांच्या दुःखाचे कारण बनले. यात शंका नाही की फिरऔन आणि हामान व त्यांचे सैन्य मोठे अपराधी होते. info
التفاسير:

external-link copy
9 : 28

وَقَالَتِ امْرَاَتُ فِرْعَوْنَ قُرَّتُ عَیْنٍ لِّیْ وَلَكَ ؕ— لَا تَقْتُلُوْهُ ۖۗ— عَسٰۤی اَنْ یَّنْفَعَنَاۤ اَوْ نَتَّخِذَهٗ وَلَدًا وَّهُمْ لَا یَشْعُرُوْنَ ۟

९. आणि फिरऔनची पत्नी म्हणाली की हा तर माझ्या आणि तुमच्या नेत्रांची शितलता आहे. याची हत्या करू नका. फार संभव आहे की हा आम्हाला काही लाभ पोहचविल किंवा आम्ही याला आपलाच पुत्र ठरवावे, आणि हे लोक अक्कलच बाळगत नव्हते. info
التفاسير:

external-link copy
10 : 28

وَاَصْبَحَ فُؤَادُ اُمِّ مُوْسٰی فٰرِغًا ؕ— اِنْ كَادَتْ لَتُبْدِیْ بِهٖ لَوْلَاۤ اَنْ رَّبَطْنَا عَلٰی قَلْبِهَا لِتَكُوْنَ مِنَ الْمُؤْمِنِیْنَ ۟

१०. आणि मूसा (अलै.) च्या मातेचे हृदय व्याकुळ झाले,तर आम्ही तिच्या मनाला धीर दिला नसता.तर ती या गोष्टीची वास्तविकता अगदी स्पष्ट करण्याचा बेतात होती. हे अशासाठी की ती ईमान राखणाऱ्यांपैकी राहावी. info
التفاسير:

external-link copy
11 : 28

وَقَالَتْ لِاُخْتِهٖ قُصِّیْهِ ؗ— فَبَصُرَتْ بِهٖ عَنْ جُنُبٍ وَّهُمْ لَا یَشْعُرُوْنَ ۟ۙ

११. मूसा (अलै.) च्या मातेने त्या (बाळा) च्या बहिणीस सांगितले की तू याच्या पाठोपाठ जा, तेव्हा ती त्याला दुरुनच पाहत राहिली. आणि फिरऔनच्या लोकांना या गोष्टीची जाणीवही झाली नाही. info
التفاسير:

external-link copy
12 : 28

وَحَرَّمْنَا عَلَیْهِ الْمَرَاضِعَ مِنْ قَبْلُ فَقَالَتْ هَلْ اَدُلُّكُمْ عَلٰۤی اَهْلِ بَیْتٍ یَّكْفُلُوْنَهٗ لَكُمْ وَهُمْ لَهٗ نٰصِحُوْنَ ۟

१२. आणि त्या (बाळा) च्या पोहचण्यापूर्वीच आम्ही मूसाकरिता दायांचे दूध हराम (निषिद्ध) केले होते. ती (बहीण) म्हणाली की, काय मी तुम्हाला असे कुटुंब दाखवू जे या बाळाचे पालनपोषण तुमच्यासाठी करील आणि या बाळाचे हितचिंतक असेल. info
التفاسير:

external-link copy
13 : 28

فَرَدَدْنٰهُ اِلٰۤی اُمِّهٖ كَیْ تَقَرَّ عَیْنُهَا وَلَا تَحْزَنَ وَلِتَعْلَمَ اَنَّ وَعْدَ اللّٰهِ حَقٌّ وَّلٰكِنَّ اَكْثَرَهُمْ لَا یَعْلَمُوْنَ ۟۠

१३. अशा प्रकारे आम्ही त्या बाळाला त्याच्या मातेकडे परत पोहचविले यासाठी की तिचे नेत्र शीतल राहावेत आणि ती दुःखी होऊ नये. आणि तिने जाणून घ्यावे की अल्लाहचा वायदा सच्चा आहे. परंतु अधिकांश लोक जाणत नाही. info
التفاسير: