Ibisobanuro bya qoran ntagatifu - Ibisobanuro bya Qur'an Ntagatifu mu rurimi rw'ikimariti - Muhammad Shafii Answaari.

numero y'urupapuro:close

external-link copy
6 : 2

اِنَّ الَّذِیْنَ كَفَرُوْا سَوَآءٌ عَلَیْهِمْ ءَاَنْذَرْتَهُمْ اَمْ لَمْ تُنْذِرْهُمْ لَا یُؤْمِنُوْنَ ۟

६. निःसंशय, इन्कार करणाऱ्यांना तुम्ही भय दाखवा किंवा दाखवू नका सारखे आहे, हे लोक ईमान राखणार नाहीत. info
التفاسير:

external-link copy
7 : 2

خَتَمَ اللّٰهُ عَلٰی قُلُوْبِهِمْ وَعَلٰی سَمْعِهِمْ ؕ— وَعَلٰۤی اَبْصَارِهِمْ غِشَاوَةٌ ؗ— وَّلَهُمْ عَذَابٌ عَظِیْمٌ ۟۠

७. सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्यांच्या हृदयांवर आणि कानांवर मोहर लावली आहे. आणि त्यांच्या डोळ्यांवर पडदा पडला आहे. आणि त्यांच्याकरिता मोठा भयंकर अज़ाब (शिक्षा-यातना) आहे. info
التفاسير:

external-link copy
8 : 2

وَمِنَ النَّاسِ مَنْ یَّقُوْلُ اٰمَنَّا بِاللّٰهِ وَبِالْیَوْمِ الْاٰخِرِ وَمَا هُمْ بِمُؤْمِنِیْنَ ۟ۘ

८. आणि लोकांपैकी काही म्हणतात, आम्ही अल्लाहवर आणि अंतिम दिवसावर ईमान राखले आहे, परंतु खरे पाहता ते ईमानधारक नाहीत. info
التفاسير:

external-link copy
9 : 2

یُخٰدِعُوْنَ اللّٰهَ وَالَّذِیْنَ اٰمَنُوْا ۚ— وَمَا یَخْدَعُوْنَ اِلَّاۤ اَنْفُسَهُمْ وَمَا یَشْعُرُوْنَ ۟ؕ

९. ते अल्लाहला आणि ईमान राखणाऱ्यांना धोका देत आहेत, परंतु खरे पाहता ते स्वतःलाच धोका देत आहेत आणि त्यांना समज नाही. info
التفاسير:

external-link copy
10 : 2

فِیْ قُلُوْبِهِمْ مَّرَضٌ ۙ— فَزَادَهُمُ اللّٰهُ مَرَضًا ۚ— وَلَهُمْ عَذَابٌ اَلِیْمٌ ۙ۬۟ — بِمَا كَانُوْا یَكْذِبُوْنَ ۟

१०. त्यांच्या मनात रोग आहे. अल्लाहने त्यांचा रोग आणखी वाढविला, आणि त्यांच्या खोट्या बोलण्यापायी त्यांच्यासाठी दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातना) आहे. info
التفاسير:

external-link copy
11 : 2

وَاِذَا قِیْلَ لَهُمْ لَا تُفْسِدُوْا فِی الْاَرْضِ ۙ— قَالُوْۤا اِنَّمَا نَحْنُ مُصْلِحُوْنَ ۟

११. आणि जेव्हा त्यांना सांगितले जाते की धरतीवर बिघाड निर्माण करू नका, तेव्हा ते उत्तर देतात की आम्ही तर केवळ सुधारक आहोत. info
التفاسير:

external-link copy
12 : 2

اَلَاۤ اِنَّهُمْ هُمُ الْمُفْسِدُوْنَ وَلٰكِنْ لَّا یَشْعُرُوْنَ ۟

१२. खबरदार! वास्तविक हेच लोक बिघाड निर्माण करणार १ आहेत, परंतु समज (ज्ञान) बाळगत नाही. info

(१) बिघाड सुधारणेच्या विरूद्ध आहे. कुप्र (सत्य धर्माचा इन्कार) आणि अपराध, दुराचारामुळे धरतीवर उत्पात व उपद्रव माजतो अर्थात बिघाड पसरतो आणि अल्लाहच्या आदेशाचे पालन केल्याने शांती सुबत्ता लाभते.

التفاسير:

external-link copy
13 : 2

وَاِذَا قِیْلَ لَهُمْ اٰمِنُوْا كَمَاۤ اٰمَنَ النَّاسُ قَالُوْۤا اَنُؤْمِنُ كَمَاۤ اٰمَنَ السُّفَهَآءُ ؕ— اَلَاۤ اِنَّهُمْ هُمُ السُّفَهَآءُ وَلٰكِنْ لَّا یَعْلَمُوْنَ ۟

१३. आणि जेव्हा त्यांना सांगितले जाते की इतर लोकां (अर्थात सहाबा) प्रमाणे तुम्हीही ईमान राखा, तेव्हा ते उत्तर देतात, काय आम्ही अशा प्रकारे ईमान राखावे, जसे मूर्ख लोकांनी राखले आहे? खबरदार! वास्तविक हेच लोक मूर्ख आहे, परंतु जाणत नाहीत. info
التفاسير:

external-link copy
14 : 2

وَاِذَا لَقُوا الَّذِیْنَ اٰمَنُوْا قَالُوْۤا اٰمَنَّا ۖۚ— وَاِذَا خَلَوْا اِلٰی شَیٰطِیْنِهِمْ ۙ— قَالُوْۤا اِنَّا مَعَكُمْ ۙ— اِنَّمَا نَحْنُ مُسْتَهْزِءُوْنَ ۟

१४. आणि जेव्हा ईमान राखणाऱ्यांशी भेटतात, तेव्हा म्हणतात की आम्हीदेखील ईमानधारक आहोत. आणि जेव्हा एकांतात आपल्या थोरा-मोठ्यां (सैतानी प्रवृत्तीच्या लोकां) जवळ जातात, तेव्हा म्हणतात, आम्ही तर तुमच्यासोबत आहोत. त्यांच्याशी तर आम्ही केवळ थट्टा-मस्करी करतो. info
التفاسير:

external-link copy
15 : 2

اَللّٰهُ یَسْتَهْزِئُ بِهِمْ وَیَمُدُّهُمْ فِیْ طُغْیَانِهِمْ یَعْمَهُوْنَ ۟

१५. सर्वश्रेष्ठ अल्लाहदेखील त्यांच्याशी थट्टा-मस्करी करतो आणि त्यांच्या विद्रोह आणि बहकण्यात आणखी जास्त वाढ करतो. info
التفاسير:

external-link copy
16 : 2

اُولٰٓىِٕكَ الَّذِیْنَ اشْتَرَوُا الضَّلٰلَةَ بِالْهُدٰی ۪— فَمَا رَبِحَتْ تِّجَارَتُهُمْ وَمَا كَانُوْا مُهْتَدِیْنَ ۟

१६. हे असे लोक आहेत, ज्यांनी मार्गभ्रष्टतेला, मार्गदर्शनाच्या मोबदल्यात खरेदी केले आहे. परंतु ना त्यांचा व्यापार १ फायदेशीर ठरला, ना ते मार्गदर्शन प्राप्त करू शकले. info

(१) या आयतीत ‘व्यापार’शी अभिप्रेत सरळ आणि सत्य मार्गाला सोडून मार्गभ्रष्टतेत पडणे अर्थात हा उघड असा हानिकारक सौदा आहे.

التفاسير: